जिया-सूरजचे ‘लिव्ह इन संबंध’!, Jiah Khan and suraj Pancholi`s Live in Relation

जिया-सूरजचे ‘लिव्ह इन संबंध’!

जिया-सूरजचे ‘लिव्ह इन संबंध’!
www.24taas.com, झी मीडिया,मुंबई

अभिनेत्री जिया खान आणि सूरज पांचोली यांचे प्रेमसंबंध होते. या प्रेमात आकंठ बुडालेले हे दोघे गेल्या वर्षभरापासून ‘लिव्ह इन संबंध’ ठेवून होते, अशी धक्कादायक माहिती मुंबई पोलिसांनी न्यायालयात दिली.

पोलिसांनी केलेल्या या खुलाशानंतर न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सूरजची १३ जूनपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली. बॉलीवूड अभिनेत्री जिया खान हिच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी बॉलीवूड अभिनेता आदित्य पांचोली याचा मुलगा आणि जियाचा प्रियकर सूरजला सोमवारीच अटक केली. त्याला रिमांडसाठी आज न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांच्या दाखल केलेल्या रिमांड अर्जात जिया आणि सूरजच्या प्रेमसंबंधाचा पोलिसांनी उलगडा केला आहे.

जियाच्या आत्महत्येनंतर तब्बल तीन दिवसांनी सापडलेल्या या प्रेमपत्रात सूरज आपल्याला मारहाण करायचा. तसेच धमकवायचा असा आरोप जियाने पत्रात केला आहे. एव्हढेच नव्हे तर या पत्रात तिने ठळकपणे नमूद केलेल्या ‘रेप’ या शब्दामुळे सूरजविरुद्ध आता लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करावा अथवा नाही याचाही पोलिसांना निर्णय घ्यायचा आहे, असेही रिमांड अर्जात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, ज्या हॉटेल ते दोघे राहिले होते. त्या हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज हस्तगत करण्यात आलेय. आत्महत्येच्या दिवशी जिया आणि सूरज हे हॉटेलमध्ये गेले होते. जियाच्या म्हणण्याप्रमाणे तिने गर्भपातही केला होता. हा मुद्दादेखील पोलिसांना तपासून पाहायचा आहे, असा युक्तिवाद सरकारी वकील ए. के. पचराणे यांनी केला. तसेच त्यासाठी सूरजला पोलीस कोठडीत पाठवावे अशी मागणी केली, ती न्यायालयाने मान्य केली. त्यामुळे आता या प्रकणात आणखी काय पुढे येते याकडे लक्ष लागले आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, June 12, 2013, 11:07


comments powered by Disqus