Last Updated: Thursday, June 13, 2013, 12:04
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईअभिनेत्री जिया खान आणि सूरज पांचोली यांचे प्रेमसंबंध होते. हे आता अधिकृत स्पष्ट झालेय. सूरजने आपले जियासोबत लिव्ह इन संबंध असल्याचे स्पष्ट कबुली दिलेय.
दरम्यान, दोघे गेल्या वर्षभरापासून ते दोघे लिव्ह इन संबंध ठेवून होते, अशी धक्कादायक माहिती मुंबई पोलिसांनी न्यायालयात दिली होती. पोलिसांनी केलेल्या या खुलाशानंतर न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सूरजची १३ जूनपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली.
बॉलीवूड अभिनेत्री जिया खान हिच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी बॉलीवूड अभिनेता आदित्य पांचोली याचा मुलगा आणि जियाचा प्रियकर सूरजला सोमवारीच अटक केली. त्याला रिमांडसाठी आज न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांच्या दाखल केलेल्या रिमांड अर्जात जिया आणि सूरजच्या प्रेमसंबंधाचा पोलिसांनी उलगडा केला होता.
सूरज जियाच्या आत्महत्या प्रकरणातला संशयित आरोपी आहे. आज त्याची पोलीस कोठडीची मुदत संपते. ती वाढवून द्यावी, अशी मागणी जुहू पोलीस अंधेरी न्यायालयाकडे करण्याची शक्यता आहे. आपले लिव्ह इन संबंध असल्याचे पोलीस कोठडीतल्या चौकशीत सुरजने ही माहिती दिल्याचे उपायुक्त चेरिंग दोरजे यांनी दिली. दरम्यान, त्याने जियासोबतच्या संबंधांबाबत तिची आई राबिया खान यांनी केलेल्या आरोपांबाबत काय खुलासे केले, हे मात्र सांगण्यास त्यांनी नकार दिला.
आत्महत्येआधी जियाने सहा पानी पत्र लिहिले होते. आत्महत्येच्या तीन दिवसांनंतर ते खान कुटुंबीयांच्या हाती लागले. यात सूरजसोबतच्या तणावपूर्ण प्रेमसंबंधांबाबत जियाने लिहिले होते. तसेच यासोबत जियाने लिहिलेली पाच पत्रे सुरजच्या घरून पोलिसांनी हस्तगत केली आहेत. या पत्रांमधील मजकूर, त्याचा अर्थ पोलीस लावत आहेत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, June 13, 2013, 12:04