Last Updated: Tuesday, March 12, 2013, 19:20
www.24taas.com,नवी दिल्लीयूपीएससी परीक्षेतून स्थानिक भाषा बाद करण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र राज्यात वाढता विरोध होतोय. शिवसेना आणि मनसे हे दोन्ही पक्ष यासाठी आक्रमक झालेत. शिवसेनेनं रस्त्यावर आंदोलन सुरू केलं असतानाच पक्षाच्या खासदारांनी संसदेत हा विषय लावून धरलाय.
पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री नारायण सामी यांना शिवसेनेच्या खासदारांनी निवेदन दिलंय. मनसेच्या आमदारांनी काल विधानभवनात राज्यपालांची गाडी अडवत आपला निषेध नोंदवलाय.
ही मागणी मान्य झाल्यास त्याचा हजारो मराठी भाषक विद्यार्थ्यांना फायदा होणार असल्यानं सरकारच्या निर्णयाकडे अनेकांचं लक्ष लागलंय.
काय आहेत बदल - मुख्य परीक्षेला २५ पेक्षा कमी विद्यार्थी असल्यास मराठीतून प्रश्नपत्रिका सोडवता येणार नाही.
- मुख्य परीक्षेच्या पात्रतेसाठी पूर्वी अनिवार्य असलेली मराठी भाषा वगळल्यामुळं केवळ इंग्रजीतूनच परीक्षा देणे बंधनकारक आहे.
- विशेष म्हणजे यापुढे वाड्.मयातून पदवी घेतलेल्यांनाच वाड्.मय विषय घेता येणार आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार मुख्य परीक्षेत फक्त एकच वैकल्पिक विषय घेता येईल.
- तसंच पदवीपर्यंत इंग्रजीचे शिक्षण घेतलेल्यांना मुख्य परीक्षा इंग्रजीतूनच द्यावी लागणार आहे.
- तसंच डॉक्टर आणि अभियंत्यांनाही केवळ इंग्रजीतूनच पश्नपत्रिका सोडवणे बंधनकारक करण्यात आलंय.
First Published: Tuesday, March 12, 2013, 19:20