Last Updated: Monday, March 11, 2013, 19:20
www.24taas.com, नाशिकखडसे-मनसे वादाचे पडसाद आता नाशिकमध्ये उमटण्यास सुरुवात झाली आहे. नाशिकमध्ये सत्तेची ‘सेटलमेंट’ अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मनपात भाजप आणि मनसेची युती अडचणीत येण्याची शक्यता आहे. मनसेला दिलेल्या पाठिंब्याबाबत भाजप पुनर्विचार करणार आहे. याबाबत भाजप नेत्यांची बैठक होणार आहे. आता यात मनसे काय भूमिका घेणार याकडं सगळ्याचं लक्ष आहे.
राज ठाकरे कशाप्रकारे पाठित खंजीर खुपसतात हे आता भाजपला कळलं असेल अशी खोचक प्रतिक्रिया शिवसेनेनं दिली आहे. मनसेला पाठिंबा देऊ नका, असं आम्ही आधीच भाजपला सूचित केलं होतं, आता भाजपाला अनुभव आला. अशा शब्दांत शिवसेनेने भाजपला मनसेवरून टोमणा मारला आहे.
First Published: Monday, March 11, 2013, 19:20