`मनविसे`चा रूपारेल कॉलेजात गोंधळ, MNS student sena on Ruparail college

`मनविसे`चा रूपारेल कॉलेजात गोंधळ

`मनविसे`चा रूपारेल कॉलेजात गोंधळ
www.24taas.com, मुंबई

मुंबईतल्या रुपारेल कॉलेजमध्ये मनविसेच्या क्रेडिट घेण्याच्या धावपळीमुळं विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. रुपारेल कॉलेजमध्ये आज टीवायबीएसस्सीची प्रॅक्टिकल सुरु होणार होती. मात्र यासाठी संपकरी प्राध्यापक पर्यवेक्षक म्हणून पोहचले नाहीत. मनविसे कार्यकर्त्यांनी कॉलेजमध्ये येऊन पर्यवेक्षकाला बोलावण्यासाठी फोनाफोनी केली. तरीही बराच काळ पर्यवेक्षक पोहचला नाही.

अखेर बारा वाजता पर्य़वेक्षक तिथे पोहचला. मात्र प्रॅक्टिकलला उशीर झाल्यानं दुपारी १२ नंतर परीक्षा देणार नाही असा आक्रमक पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला. यावेळी मनविसेचे कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांमध्ये वादावादी झाली. मनविसेच्या प्रयत्नामुळं रुपारेल कॉलेजमध्ये एफवायबीकॉमची परीक्षा सुरु झाली.

अनेक दिवसांपासून ही परीक्षा रखडलेली परीक्षा सुरु झाल्यानं त्याचं क्रेडिट घेण्यासाठी मनविसे कार्यकर्ते रुपारेल कॉलेजमध्ये पोहचले. त्यांच्या या क्रेडिट घेण्याच्या धावपळीमुळं ९ ते १२ वाजेपर्यंत थांबावं लागलं आणि परीक्षेला उशीर झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

First Published: Tuesday, March 12, 2013, 15:21


comments powered by Disqus