मुंबई गॅंग रेप : एकाला अटक, चार फरार - पोलीस आयुक्त, gang rape : Mumbai Police Commissioner press conference

मुंबई गँगरेप : एकाला अटक, चार फरार - पोलीस आयुक्त

मुंबई गँगरेप : एकाला अटक, चार फरार - पोलीस आयुक्त
www.24taas.com, झी मीडिया,मुंबई

मुंबईतील सामूहिक बलात्काराची घटना अतिशय निंदनीय आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्यांने आपला गुन्हा कबुल केला आहे. तर यातील चार जण फरार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी दिली.

एका साप्ताहिकाचे दोघे पत्रकार काल संध्याकाळी ६ ते ६.३० शक्तीमील परिसरात गेले होते. पीडित तरुणी एका इंग्रजी मासिकात प्रशिक्षणार्थी पत्रकार असून ती तिच्या एका सहका-यासोबत शक्तीमिल परिसरात असाईमेंटवर गेली होती. तेथे त्यांना पाच अनोळखी तरूणांनी हटकले. पाच जणांपैकी दोघांनी तिच्यासोबत असलेल्या सहका-याला धमकी देत धरून ठेवले आणि उर्वरित तिघांनी तिच्यावर बलात्कार केल्याची प्राथमिक चौकशीत माहिती मिळाल्याचे आयुक्त सत्यपाल सिंह यांनी सांगितले.

शक्तीमील येथे पाच जणांनी पीडित तरुणींवर आळीपाळीने बलात्कार केला. ही घटना सायंकाळी ६.३० वाजता घटना घडली आहे. सर्व आरोपी या परिसरातील आहेत. यातील एका आरोपींनी गुन्हा कबुल केला आहे. त्यांने अन्य चार जणांची नावे समजली सांगितली. ते फरार आहेत. त्यांचा शोध पोलीस घेतील. त्यासाठी पोलीस पथक तयार करण्यात आले आहे.

पिडीत मुलगी स्वत:हून ८ वाजता रूग्णालयात गेली. त्यानंतर तिनेच ८.३० वाजता पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. तिने दिलेल्या माहितीनंतर पाज जणांची रेखाचित्र तयार करण्यात आलीत. ही रेखाचित्र प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर त्यावरून एका आरोपीला अटक करण्यात आली. त्यानंतर त्यानेच अन्य साथीदारांची नावे सांगितले. त्यादृष्टीने तपास सुरू आहे, असे सत्यपाल यांनी सांगितले.

बलात्काराची घटना ही अतिशय निंदनीय घटना आहे. आम्ही त्यांना जास्तीत जास्त शिक्षा देण्यासाठी चौकशी करू. आरोपीला किमान २० वर्षांची शिक्षा होऊ शकते. हे सर्व आरोपी २० ते २२ वयोगटातील आहेत, असे ते म्हणालेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Friday, August 23, 2013, 14:09


comments powered by Disqus