Last Updated: Thursday, August 22, 2013, 09:07
www.24taas.com, झी मीडिया, पुणेपुण्यातल्या फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि कबीर कला मंचच्या विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा प्रकार घडलाय. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केलीय.
FTII च्या स्टुडंट असोसिएशनच्या कार्यक्रमासाठी कबीर कला मंचच्या विद्यार्थ्यांना बोलावण्यात आलं होतं. या कार्यक्रमानंतर कबीर कला मंचच्या विद्यार्थ्यांमध्ये आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी FTII च्या विद्यार्थ्यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला.
या शाब्दिक चकमकीचं रुपांतर धक्काबुक्की आणि हाणामारीत झालं. यावेळी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला नक्षली संबंधांवरुन डिवचल्याचा आरोप, कबीर कलामंचच्या विद्यार्थ्यांनी केला आहे. कबीर कला मंच, FTII तसंच अभाविपच्या कार्यकर्त्यांना या हाणामारीनंतर जोशी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पुणे पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Thursday, August 22, 2013, 09:07