राज 'गडी बावचळलायं' - अजित पवार, Ajit pawar Vs Raj Thackeray

राज 'गडी बावचळलायं' - अजित पवार

राज 'गडी बावचळलायं' - अजित पवार
www.24taas.com,मुंबई

नौटंकी करणाऱ्यांना जशास तसे उत्तर देऊ, असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हाणलाय. जर कोणी असे समजत असेल तर उत्तर देण्याची धमक आमच्यात आहे, हेही लक्षात ठेवा, असा इशारा राज यांना पवार यांनी दिला.

अजित पवार यांचे मुंबईतल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात भाषण सुरू होते. त्यावेळी राज ठाकरेंवर जोरदार टीका अजित पवार यांनी केली. मनसे आणि राष्ट्रवादीमधल्या राड्यावर अजितदादा काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

पवार यांनी राज ठाकरे यांची नौटंकी सुरू असल्याचे म्हटले आहे. गडी बावचळाय. एकीकडे मराठीसाठी भांडायचे आणि दुसरीकडे गुजरातचा पुळका तर कधी बिहाचे कौतुक करायचे. नौटंकी करणाऱ्यांना कडक उत्तर देऊ, असा शाब्दीक इशारा यावेळी त्यांनी दिला. काम करणाऱ्यांनाच जनता निवडून देते, हेही लक्षात ठेवा, सल्ला राजना अजित पवारांनी दिला. त्यामुळे राज आता काय उत्तर देतात हे २ तारखेला होणाऱ्या सभेकडे लक्ष लागलेय.

दरम्यान, या संघर्षाचं मूळ आहे ते राज ठाकरे आणि अजित पवार या दोन दिग्गज नेत्यांमधील संघर्षात. राज्याच्या दौ-यावर असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे जाहीर सभांमधून उपमुख्यमंत्री अजित पवारांना टीकेचं लक्ष्य करतायेत. गेल्या काही दिवसांत ही टीकेची पातळीही घसरलीय. त्याचे काल रात्री पडसाद उमटलेत. राज यांच्या ताफ्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्यानंतर संघर्ष टीपेला पोहचला. जाळपोळीच्या घटनाही घडल्यात.

First Published: Wednesday, February 27, 2013, 19:00


comments powered by Disqus