Last Updated: Wednesday, February 27, 2013, 11:12
www.24taas.com, मुंबईअहमदनगर जिल्ह्यातल्या भिंगारमध्ये झालेली दगडफेक मनसेनं घडवून आणल्याचा सनसनसनाटी आरोप राष्ट्रवादीनं केलाय.
लोकप्रियता मिळवण्यासाठी मनसेची ही स्टंटबाजी असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलाय. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली मात्र दगडफेक केली नाही असा दावाही त्यांनी केलाय.
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शांतताप्रिय आहेत. त्यांनी असा काही प्रकार केलेला नाही. मनसेनेचे स्वतःवर हल्ला करून लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान, मनसेचे आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी किरण काळे यांनी फेटाळलेत... राष्ट्रवादी काँग्रेसने नगरमध्ये शांततेने आंदोलन केल्याचा दावा त्यांनी केलाय.. तसंच मनसेकडूनच गाडीतून दगड आणण्यात आल्याचा आरोपही काळे यांनी केलाय...
First Published: Wednesday, February 27, 2013, 11:12