Last Updated: Wednesday, February 27, 2013, 10:20
www.24taas.com, मुंबईअहमदनगरमध्ये राज ठाकरे यांच्या ताफ्यावरील दगडफेकीचे पडसाद मुंबईतही उमटले... मनसे आमदार राम कदम आणि मनसैनिकांनी मुंबईत ठिकठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऑफिसला टार्गेट केलं...
राष्ट्रवादी काँग्रेसचं मुंबईतलं मुख्यालय, दादर, माहीम, वांद्रे, सायन कोळीवाडा, गोरेगाव परिसरातल्या ऑफिसची तोडफोड करण्यात आली... शिवाय राष्ट्रवादीच्या होर्डिंग्सलाही लक्ष्य करण्यात आलंय.. दुसरीकडे मनसे आमदार राम कदम यांनी आपल्या समर्थकांसह खारच्या लिकिंग रोड इथं अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला काळं फासलं.
शिवाय राज यांच्या ताफ्यावरील दगडफेकीचा निषेध करण्यासाठी जाळपोळही केली... यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली...
राज यांच्या ताफ्यावरील दगडफेक प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माफी मागावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा राम कदम यांनी दिलाय..
First Published: Wednesday, February 27, 2013, 10:12