Last Updated: Wednesday, February 27, 2013, 18:30
www.24taas.com, अहमदनगर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अहमदनगर येथील बैठक काही वेळेपूर्वीच संपली. त्यानंतर राज ठाकरे काय आदेश देणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र राज ठाकरे यांनी त्यांची भूमिका अजूनतरी स्पष्ट केलेली नाही. `माझ्या ताफ्यावर झालेल्या दगडफेकीबाबत २ तारखेच्या सभेतच बोलणार...` माझ्या ताफ्यावर दगडफेक झाली.` असंही राज ठाकरेंनी स्पष्ट केलं.
अहमदनगर जिल्ह्यात झालेल्या दगडफेकीबाबत राज ठाकरेंनी पोलिसांना लक्ष्य केलं आहे. आपल्या ताफ्यावरील दगडफेकीबाबत पोलिसांना पूर्वकल्पना होती असा आरोप त्यांनी केला आहे. दगडफेक होत असताना पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेत कोणतीही कारवाई केली नाही असा आरोपही राज यांनी केला आहे.
अहमदनगरमध्ये पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात त्यांनी हा आरोप केला आहे. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्य़ांना कोणताही आदेश न देताच बैठक संपवली आणि औंरगाबादकडे रवाना झाले आहे.
First Published: Wednesday, February 27, 2013, 18:19