मनसेच्या रेल्वे इंजिनाला दोन पेग लागतात - हर्षवर्धन जाधव, MNS VS Harshvardhan Jadhav

मनसेच्या रेल्वे इंजिनाला दोन पेग लागतात - हर्षवर्धन जाधव

मनसेच्या रेल्वे इंजिनाला दोन पेग लागतात - हर्षवर्धन जाधव
www.24taas.com,औरंगाबाद

मनसेला रामराम केल्यानंतर आज आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पहिल्यांदाच जाहीर शक्तीप्रदर्शन केलं. यावेळी राज ठाकरेंच्या मनसेवर तोंडसुख घेतले. मनसेचं रेल्वे इंजिन दोन पेग पिल्याशिवाय चालतच नाही, अशी जहरी टीका जाधव यांनी कन्नड येथे केली.

हर्षवर्धन जाधव मित्र मंडळ स्थापन करण्याच्या या कार्यक्रमात त्यांनी मनसेवर सडकून टीका केली.. मनसे म्हणजे नवनिर्माण नाही तर भ्रमनिरास असल्याची टीका त्यांनी केली. त्याचबरोबर राष्ट्रवादीची राज ठाकरेंवर टीका योग्यच असल्याचं सांगत त्यांनी राज ठाकरेंची इंजिन दोन पेग पिल्याशिवाय चालतच नाही अशी जहरी टीका केली.


तसंच राज ठाकरे यांना त्यांनी जॉनी वॉकरची उपमा देत आपल्यासाठी सर्व पक्षांची दारे उघडी असल्याची भूमिका त्यांनी मांडली. हर्षवर्धन जाधवांच्या या कार्यक्रमाला पूर्वाश्रमीचे मनसे नेते प्रकाश महाजन यांची उपस्थिती होती. मनसेला रामराम केलेले काही स्थानिक नेतेही हर्षवर्धन जाधव यांच्यासह स्टेजवर होते.

First Published: Wednesday, February 27, 2013, 19:12


comments powered by Disqus