Last Updated: Wednesday, February 27, 2013, 15:15
www.24taas.com, मुंबईराज ठाकरेंच्या ताफ्यावरील दगडफेक आणि त्यानंतर मनसेनं घेतलेल्या भूमिकेला उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिलाय. राज ठाकरे यांचा मनसे हा पक्ष विरोधी पक्ष आहे.
विरोधी पक्षाला सरकारवर टीका करण्याचा अधिकार आहे. टीका करणा-या विरोधी पक्षाच्या नेत्यावर दगडफेक करणे चुकीचे असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
सरकारमधील पक्ष जर दगडफेक करीत असेल तर पोलिसांनी बाजूला व्हावं आम्ही आमच्या पद्धतीनं उत्तर देऊ असा दमही उद्धव यांनी राष्ट्रवादीला भरला आहे. मनसे आणि शिवसेनेत मतभेद असले तरी या प्रकरणी मनसेची बाजू योग्य असल्याचं उद्धव यांनी सांगितल आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या मागे उद्धव ठाकरे मोठ्या भावाप्रमाणे खंबीरपणे उभे राहिले आहेत.
First Published: Wednesday, February 27, 2013, 15:05