... आणि क्रिकेटच्या देवासाठी पंतप्रधानही थांबले!PM Manmohan Singh Wait for Sachin on phone

... आणि क्रिकेटच्या देवासाठी पंतप्रधानही थांबले!

... आणि क्रिकेटच्या देवासाठी पंतप्रधानही थांबले!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनीही सचिन तेंडुलकरला त्याला जाहीर झालेल्या ‘भारतरत्न’ पुरस्काराबाबत फोनवरून शुभेच्छा दिल्या. मात्र यावेळी थोडा वेगळा प्रकार घडला.

सचिनवर फोनवरून शुभेच्छांचा वर्षाव होत होता. त्यामुळं सचिनचा फोन सतत बिझी होता. पंतप्रधानांनाही सचिनला शुभेच्छा देण्यासाठी बराचवेळ वेटींगवर राहावं लागलं.

अखेरीस राजीव शुक्लांना पंतप्रधानांनी फोनवरून सचिनला फोन जोडून देण्यास सांगितलं. अखेरीस पंतप्रधान आणि सचिन यांच्यात बातचीत होऊ शकली.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, November 16, 2013, 22:08


comments powered by Disqus