वृषभ
Last Updated: Tuesday, December 31, 2013, 16:46
वृषभ
वृषभ - यशस्वीतेसाठी हे वर्ष चांगले आहे.
वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हे वर्ष आनंददायी आणि अनेक प्रकारे चांगले असेल. आपण हार्ड वर्किंग केल्यामुळे तुमच्यापुढे ज्या काही समस्या येतील तत्यावर तुम्ही सहज मात कराल. आपल्यापुढे आलेल्या समस्यांतून मार्ग किंवा तोडगा काढण्यासाठी वडीलधाऱ्या किंवा मोठ्या व्यक्तींशी नेहमी चर्चा करा. त्यातून तुम्हाला नवा मार्ग सापडेल. त्यामुळे तुम्ही चांगले नियोजन करून आपल्या कार्यात यशस्वी व्हाल. २०१४ या वर्षातील मध्यकाळ चांगला आहे. तुम्ही येणाऱ्या समस्यांवर सहज करू शकाल. मात्र, तुम्ही ताण किंवा काळजी अथवा चिंतीत असणाऱ्या गोष्टींवर नियंत्रण राखले पाहिजे. तुम्ही (रास) अत्यंत संवेदनशील आणि तापट आहात. १९ जूननंतर २०१४मधील तुमची स्थिती चांगली असेल. आपल्याला नवीन संधी प्राप्त होतील. त्यात यश मिळेल. तुम्ही व्यवसायाच्या दृष्टीने दीर्घकालीन गुंतवणूक करू शकता. यामुळे ती आपल्यासाठी फायदेशीर बाब असेल. आपल्या जीवनात नवीन संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे व्यवसायात भरभरात शक्य आहे. या वर्षात तुमचा जास्त प्रवास संभवतो. तुमचा वर्षभर प्रवास सुरू राहील. जे खेळाशी कनेक्ट आहेत.त्यांना या वर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची संधी मिळेल.