कन्या
Last Updated: Tuesday, December 31, 2013, 16:46
कन्या
कन्या - जे काही चमकत आहे ते प्रेम आहे.
आपल्यासाठी हे वर्ष चांगले आहे. यावर्षीत जास्त खुशी प्राप्त होईल. खासकरून जुलैनंतर यावर्षात तुम्हाला बदल दिसून येईल. तो तुमच्यासाठी चांगला असेल. शनि ग्रह दुसऱ्या स्थानत प्रवेश केले. त्यामुळे आर्थिकदृष्टी तुम्हाला ते लाभदायक असणार आहे. जीवनातील काही घटनांमध्ये तुमचा आत्मविश्वास थोडासा कमी जाणवेल. असे असले तरी या वर्षात तुम्हाला मित्रांची गरज भासेल. ते तुमच्यापाठीमागे नेहमी असतील. २०१४मधील काही महिने तुमच्यासाठी चांगले नाहीत. मात्र, ते संपल्यानंतर तुमच्या जीवनात चांगला बदल घडून येईल. शांतता लाभेल. तुम्ही रोमॅंटीग जीवनाची योजना तयार कराल. कारण तुमचे ग्रह तुमच्या बाजुने आहेत. आपले कौटुंबिक जीवन आनंदी आणि खुशीचे असेल. २०१४मधील जुलैनंतर आपल्याला व्यक्तीगत विशेष लक्ष द्यावे लागेल. याच दरम्यान थोडासा तनाव येऊ शकतो. हे वर्ष काहीबाबत चांगले आहे. जे काम आपण व्हायला पाहिजे असे म्हणत असाल ते होईल.