Thursday, July 10, 2025
Thursday, July 10, 2025
  • होम
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स बार
  • कल्लाबाजी
  • हेल्थ मंत्रा
  • युथ क्लब
  • भविष्य
  • फोटो
  • व्हिडिओ
  • Live TV
  • more
    • भविष्य
    • फोटो
    • व्हिडिओ
    • Exclusive
  • होम
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स बार
  • कल्लाबाजी
  • हेल्थ मंत्रा
  • ब्लॉगर्स पार्क
  • युथ क्लब
  • भविष्य
  • फोटो
  • व्हिडिओ
  • Exclusive

उद्धव ठाकरेंचं एक पाऊल पुढे....

`राज आणि मला एकत्र बसवून विचारा`, एकत्र येणार का?

`राज आणि मला एकत्र बसवून विचारा`, एकत्र येणार का?

www.24taas.com, मुंबई

मनसेसोबत एकत्र येण्याचे संकेत उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. शिवसेना पक्षप्रमुखपद स्वीकारल्यानंतर सामना वृत्तपत्राला दिलेल्या प्रदीर्घ मुलाखतीत त्यांनी हे संकेत दिले आहेत. उद्धव-राज एकत्र येतील काय? या प्रश्नावर उद्धव ठाकरेंनी, हा प्रश्न आम्हाला दोघांना एकत्र बसवून विचारा.

या प्रश्नाचे उत्तर दोघांना एकत्र देऊ द्या. असं दिलं. तसंच कोणी शिवसेनेसोबत मनापासून येणार असतील तर त्यांचे स्वागत आहे. असंही त्यांनी यावेळी मुलाखतीत सांगितलं. मराठी मतांच्या विभागणीबद्दल बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या शेवटच्या भाषणात व्यक्त केलेली खंतही यावेळी उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवली.

एकत्र येण्याचे संकेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिल्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोणती भूमिका मांडणार. याबाबत उत्सुकता लागली आहे. उद्धव ठाकरेंच्या निर्णयावर त्यांचे पी.ए. मिलिंद नार्वेकरांचा प्रभाव असतो. अशी नेहमी चर्चा असते. याबाबतही उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली.

राज ठाकरेंच्या भूमिकेकडं लक्ष

राज ठाकरेंच्या भूमिकेकडं लक्ष

www.24taas.com, मुंबई

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या मुलाखतीत मनसे-शिवसेना एकत्र येण्याबाबत संकेत दिले आहेत. मात्र आता ह्या गोष्टीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय प्रतिसाद याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.

अगदी वर्षभरापूर्वीच मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या प्रचारावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या मुंबईतील जांबोरी मैदानातील भाषणात सांगितले होतं. `बाळासाहेब तुमच्या साठी मी एक पाऊल काय, पण शंभर पाऊलंही पुढे यायला तयार आहे. पण, फक्त तुमच्यासाठी.` मात्र वर्षभराच्या आतच बाळासाहेबांचे निधन झाले. मात्र आता उद्धव ठाकरे यांनी एकत्र येणाबाबत सकारात्मक भुमिका घेतल्याने राज ठाकरे आता एक पाऊल पुढे टाकणार का? हाच प्रश्न साऱ्यांच्या मनात निर्माण झाला आहे.

एकत्र येण्याचे राज ठाकरे कोणती भूमिका मांडणार. याबाबत उत्सुकता लागली आहे. राज ठाकरेंच्या भूमिकेकडं साऱ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. उद्धव ठाकरे यांना तुम्ही आणि राज एकत्र येणार का असं प्रश्न विचारला असता त्यांनी फारच बोलकी प्रतिक्रिया दिली.

`प्रश्न महत्त्वाचा असा आहे की, एकत्र येण्याच्या पूर्वी दूर का गेलो? हा विचार होणं गरजेचे आहे. एकत्र येणार असू तर काय म्हणून एकत्र येतोय? मुख्य प्रश्न असा आहे की, आपण कोणाच्या विरुद्ध उभे आहोत? आपला राजकीय शत्रू कोण आहे? राजकारणातून आपल्याला कोणाला संपवायचं आहे? आणि त्याच्यासाठी कोणत्या दिशेनं जाण्याची गरज आहे?` असं उद्धव ठाकरेंनी सामनाच्या मुलाखतीत म्हटलंय.

एकत्र येण्याबद्दल उत्तरच हवं असेल तर त्यासाठी तुम्ही ‘दोघांना’ म्हणजे आम्हाला एकत्र आणून समोरासमोर बसवा. बाजूबाजूला बसवा. आणि मग, तुम्ही एकत्र येणार काय? हा प्रश्‍न दोघांना ‘एकत्र’ विचारलात तर बरं होईल. या प्रश्‍नाचं उत्तर दोन बाजूवरती अवलंबून आहे. एका बाजूवरती नाही. असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याविषयी जणू काही संकेतच दिले आहेत.

आम्ही एक पाऊल पुढे टाकत आहोत- संजय राऊत

आम्ही एक पाऊल पुढे टाकत आहोत- संजय राऊत

www.24taas.com, मुंबई

शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या सामनामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीत शिवसेना-मनसे एकत्र येणार का या त्यांच्या प्रश्नावर बरीच चर्चा सुरू आहे. त्यावरच सामनाचे संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भुमिका स्पष्ट केली आहे.

- राज ठाकरेंच्या भुमिकेकडे लक्ष लागुन राहिलं आहे.

- राज ठाकरेंबाबत केलं वक्तव्य

- राज्यात सत्तांतर होण गरजेच आहे - राऊत

- उद्याच्या मुलाखतीत आणखी माहिती देणार आहे

- बाळासाहेबांची भुमिका पुढे नेणार

- शिवसेनेची कुणी काळजी करू नये - राऊत

- उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर राऊत यांनी स्पष्ट केली भुमिका

- आम्ही एक पाऊल पुढे टाकत आहोत - संजय राऊत

- पत्रकारांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तेर मी आज देणार नाही, त्यासाठी काही काळ थांबावं लागणार आहे

- आजच्या मुलाखतीत सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली

संधी मिळाल्यास राज-उद्धव यांना एकत्र घेऊन बसेन- राऊत

संधी मिळाल्यास राज-उद्धव यांना एकत्र घेऊन बसेन- राऊत

www.24taas.com, मुंबई

`मला संधी मिळाल्यास या दोघांनाही एकत्र घेऊन बसेन,``शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मला तशी संमती दिल्यास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी नक्की चर्चा करीन, असे वक्तव्य शिवसेनेच खासदार संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.

`राज आणि उद्धव यांच्यात चर्चा घडवून आणेन.`त्यांना एकत्र येण्याचा प्रश्न दोघांना विचारीन.` असं म्हणत संजय राऊत आता स्वत: पुढाकार घेताना दिसत आहेत. त्यामुळे दोघांना एकत्र आणण्याविषयी संजय राऊत प्रयत्नशील असल्याचे दिसते. सामना या शिवसेनेच्या मुखपत्रात उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या मुलाखतीत सेना-मनसे एकत्र येणार का? या प्रश्नावर अनेक चर्चा सुरू असताना सामनाचे संपादक संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक गोष्टी स्पष्ट केल्या.

आम्ही एक पाऊल पुढे टाकत आहोत, त्यामुळे राज ठाकरे आता काय भुमिका घेणार हे देखील महत्त्वाचं असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.`राज्यात सत्तांतर होण गरजेच आहे.आणि त्यासाठी दोघांनी एकत्र येण्याची गरजेचे आहे. मात्र कुणीही शिवसेनेची काळजी करू नये, आम्ही बाळासाहेबांची भूमिका पुढे नेणार.` असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

मात्र संजय राऊत यांनी बाकी काहीही प्रश्नावर उत्तर देण्याचे टाळले, `बाकीच्या प्रश्नांची उत्तरे ही, उद्याच्या मुलाखतीत मिळतील, पत्रकारांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तेर मी आज देणार नाही, त्यासाठी काही काळ थांबावं लागणार आहे.` असं सांगून संजय राऊत यांनी सेनेचे भुमिका स्पष्ट केली आहे.

राज-उद्धव एकत्र आल्यास भाजपला आनंदच- मुंडे

राज-उद्धव एकत्र आल्यास भाजपला आनंदच- मुंडे

www.24taas.com, मुंबई

उद्धव आणि राज ठाकरेंना एकत्र आणण्यासाठी आता भाजपही सरसावले आहे. शिवसेना-मनसेचे एकत्रिकरण व्हावे ही भाजपचीच इच्छा असल्याचं भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी सांगितलं आहे. `मला वाटतं की उद्धव ठाकरे यांन त्यांचं मन स्पष्ट केलं आहे. आणि त्यांनी त्याचं पुढचं पाऊल पुढं टाकलं आहे, ते म्हणजे मनसे-शिवसेना एकत्र यावे यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे.`

`माझी याला तयारी आहे अशीच उद्धव ठाकरे यांची भुमिका घेतली आहे. जिथपर्यंत भाजपची भुमिका आहे. ती म्हणजे हे दोघं एकत्र आले तर भाजपला नक्कीच आनंद होईल.` त्यामुळे भाजप राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याकडे फारच सकारात्मक दृष्टीने पाहत आहे. कारण की राज ठाकरे यांनी महायुतीत प्रवेश केल्यास त्याच्या नक्कीच फायदा होईल असे भाजपला वाटते.

गोपीनाथ मुंडे यांनी पक्षाची भुमिका स्पष्ट केल्याने भाजप त्यांच्या या एकत्रिकरणासाठी अनुकूल आहे. मात्र त्या दोघांनाही एकत्र आणण्यासाठी भाजप किंवा मुंडें स्वत: काही प्रयत्न करणार का? याकडेही साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

राज ठाकरे महायुतीत येण्यास आठवलेंचा विरोध

राज ठाकरे महायुतीत येण्यास आठवलेंचा विरोध

www.24taas.com, मुंबई

`राज ठाकरे महायुतीसोबत आणि काँग्रेस आघा़डीसोबत नसल्यामुळे असा एक मतदार वर्ग आहे जो, तो मतदार दोघांनाही कव्हर करत नाही. अशा पद्धतीची मतं राज यांना मिळालेली आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांची मनसे आमच्यासोबत आल्याने आम्हाला तेवढी मतं मिळतील असे वाटत नाही.

`असा जर काही प्रयोग झालाच तर, म्हणजे राज ठाकरे यांनी महायुतीत येण्याचा प्रस्ताव मांडला तर, त्याविषयी आरपीआयला गंभीर होऊन विचार करावा लागेल, आणि मला माझ्या कार्यकर्त्यांशी बोलून काय ते ठरवावं लागेल. असं म्हणत रामदास आठवले यांनी राज ठाकरेंना विरोध दर्शवला आहे. त्यामुळे राज-उद्धव एकत्र येण्याबाबत आरपीआयने मात्र वेगळीच भुमिका घेतली आहे.`

आरपीयचे नेते रामदास आठवले यांना राज-उद्धव यांनी राजकीय दृष्ट्या एकत्र येऊ नये असे वाटते आणि त्यामुळेच त्यांना ही युती नामंजूर असून त्यांनी राज ठाकरेंना महायुतीत घेण्यास विरोध दर्शवला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या एकत्रिकरणाबाबत संपूर्ण राज्यात अनेक चर्चा सुरू आहेत.

अनेकांनी राज-उद्धव एकत्र यावेत असाच सूर लावला आहे. राज-उद्धव हे एकत्र आल्यास भाजपला आनंदच होईल असं म्हटले आहे. मात्र महायुतीतील घटक पक्ष असणाऱ्या आरपीआयने मात्र नाराजी व्यक्त केली आहे.

`त्या` विषयावर मी योग्य वेळी बोलेन- राज ठाकरे

`त्या` विषयावर मी योग्य वेळी बोलेन- राज ठाकरे

www.24taas.com, मुंबई

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय प्रतिसाद देतात, याकडे सर्वांच लक्ष होतं. मात्र, राज ठाकरे यांनी भाषणात त्यासंदर्भात उत्तर देण्यास टाळलं.

राज ठाकरे काय प्रतिसाद देणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. विविध वृत्तवाहिन्यांचे आणि वृत्तपत्रांचेही पत्रकार राज ठाकरेंची प्रतिक्रिया ऐकण्यासाठी उपस्थित होते. मात्र आपल्या भाषणात सुरुवातीलाच आपण या विषयावर बोलणार नसल्याचे संकेत राज ठाकरेंनी दिले. आज दादूंचा (उद्धव) दिवस नाही दादांचा (मधुकर सरपोतदार) दिवस आहे, असं आपल्या मिश्किल शैलीत राज ठाकरे म्हणाले. `त्या` विषयावर मी योग्य वेळी बोलेन, असं म्हणत राज ठाकरेंनी सर्व चर्चांना विराम दिला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या मुलाखतीत मनसे-शिवसेना एकत्र येण्याबाबत संकेत दिले आहेत. मात्र आता ह्या गोष्टीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय प्रतिसाद याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले होते. उद्धव-राज यांच्या एकत्र येण्याबद्दल अनेक तर्क-वितर्क सुरू असतानाच राज ठाकरेंनी मात्र योग्य वेळेची वाट पाहाण्याचं ठरवलं आहे.

आनंद दिघेंच्या भेटीसाठी राज ठाकरे गेले होते जेलमध्ये

आनंद दिघेंच्या भेटीसाठी राज ठाकरे गेले होते जेलमध्ये

www.24taas.com, मुंबई

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज एका खास कार्यक्रमात शिवसेनेचे माजी नेते मधुकर सरपोतदार यांच्या आठवणींना उजाळा देताना एक खास किस्सा सांगितला. जेव्हा मधुकर सरपोतदार आणि आनंद दिघे यांना नाशिकच्या जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यावेळेस, राज ठाकरे हे आनंद दिघेंची भेट घेण्यासाठी नाशिकच्या जेलमध्ये गेले होते. त्यावेळेसचा चीजचा खास किस्सा राज ठाकरे यांनी सांगितला.

‘मधुकर सरपोतदार म्हणजेच दादांना ‘चीज’ फार आवडत असे. त्यामुळे चीज आणि अनेक खाण्याच्या वस्तू घेऊन मी स्वत: जेलमध्ये दादांना आणि आनंद दिघेंना भेटण्यासाठी गेलो होते.’ ‘दादांना आणि आनंद दिघेंना भेटलो. त्यानंतर तेथील जेलर साहेबांना भेटलो आणि ते सगळं खाण्याचं साहित्य त्यांच्याकडे दिलं, म्हटलं दादांना आणि आनंद दिघेंना ह्या वस्तू द्या.’ ‘जेव्हा दादा जेलमधून सुटून बाहेर आले, त्यानंतर मी दादांना पुन्हा विचारलं की, दादा चीज खाल्लं की नाही? तेव्हा आमच्या पर्यंत चीज पोहचलंच नाही.’ ‘त्या चीजचं काहीच चीज झालं नाही. ते पोहचण्याच्या आधीच मधल्या मध्ये संपून गेलं.’ असं म्हणत राज ठाकरे यांनी आनंद दिघे आणि मधुकर सरपोतदार यांच्याविषयी जुन्या आठवणींना उजाळा दिला. मात्र त्यावेळेस राज ठाकरे स्वत: आनंद दिघेंच्या भेटीला गेल्याचे त्यांनी आर्वजुन सांगितले.

आज मधुकर सरपोतदार यांच्या स्मरणार्थ काढण्यात आलेल्या प्रतिष्ठानाच्या उद्घाटनासाठी उपस्थित होते. त्यावेळी राज ठाकरे यांनी मधुकर सरपोतदार आणि आनंद दिघे यांच्या आठवणींना उजाळा दिला. ‘मधुकर सरपोतदार यांना दादा म्हणून राज ठाकरे संबोधित असे. ‘दादा हे अतिशय हे प्रेमळ पण कडक शिस्तीचे असे होते. मात्र त्यांना एकूणच विनोदाचे वावडे होते. असं म्हणत राज ठाकरे यांनी त्यांच्या अनेक आठवणी जागवल्या. राज ठाकरे यांनी मधुकर सरपोतदारांच्या अनेक आठवणी सांगितल्या.

राज ठाकरे यांनी आज एका कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लावली होती. तेथे राज ठाकरे काय बोलणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. दिवसभर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र त्याविषयी आज काहीही बोलणार नसल्याचे राज ठाकरेंनी स्पष्ट केले. मात्र योग्य वेळ आल्यास नक्की बोलणार असं सांगून राज ठाकरे यांनी या सगळ्या चर्चेबाबत काहीही बोलण्यास नकार दिला. आजचा दिवस दादांचा(मधुकर सरपोतदार), दादूचा (उद्धव ठाकरे) नाही. असं म्हणत अनेक दिवसानंतर उद्धव ठाकरे यांचा दादू म्हणून उल्लेख केला त्यामुळे ही जवळीक वाढते आहे की, मिष्किलपणे उद्धव ठाकरेंना त्यांनी टोमणा मारला. याबाबत चर्चा मात्र चांगलीच रंगली.

  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8

More Slideshow

सोनी एक्सपिरिया झेड अल्ट्रा

लेनोवो के ९००

एलजी `फ्लूटर` फोन

हिरोईनची खलनायक भूमिका

आठवणीतले आर.डी.बर्मन

सोनीचा `एक्सपिरिया एम`

वयाच्या अगोदर नका होऊ म्हातारे!

मिररलेस कॅमेरा - गॅलॅक्सी एनएक्स

`फादर्स डे`

टाटाची नवीन मॉडेल

मोदींचा करिष्मा - अडवाणींचा वरचष्मा

प्रेमाचा पाऊस... पावसाची गाणी

First Prev .. 6 7 8 9 10  .. Next Last 

    © 1998-2014 Zee Media Corporation Ltd (An Essel Group Company), All rights reserved.

    Contact | Privacy | Legal Disclaimer | Register | Job with US | Complaint | Investor Info

    • News

      • Nation
      • State
      • World
      • South Africa
      • Sci Tech
      • Pics
      • Exclusive
      • Blogs
      • Archives
    • ENTERTAINMENT

      • Red Hot
      • Reviews
      • Movies
      • Glam Talk
      • Bookworm
      • TV
      • Celebrity
      • Romance
      • Pics
      • Videos
      • Add More
      • Exclusive
      • Blogs
    • SPORTS

      • Cricket
      • Football
      • World
      • Motorsports
      • Golf
      • Others
      • Softspot
      • Debate
      • Blogs
      • Exclusive
      • Pics
      • Videos
    • Business

      • Autos
      • Gadgets
      • Economy
      • Finance
      • Companies
      • Realestate
      • International
      • Technology
      • In Focus
      • Pics
    • Health

      • News
      • Diseases
      • Fitness
      • Healthy Eating
      • Low Cal Recipes
    • Bookworm

      • Latest Cover
      • Classics
      • Writer Profile
      • Enactments
      • Between The Lines
      • Book Review
      • Indian Award
      • Nobel Price
      • Booker Prize
      • Unforgettables
    • Recipes

      • Low Fat
      • Kitchen Tips
      • Storing Tips
      • Healing Food
      • Vegs
      • Non Vegs
      • Desserts
      • Drinks
    • Hindi

      • Home
      • देश
      • प्रदेश
      • दुनिया
      • खेल-खिलाड़ी
      • कारोबार
      • ज्ञान-विज्ञान
      • मनोरंजन
      • ज़ी स्पेशल
      • सेहत
      • तस्वीरें
      • वीडियो
      • भविष्यफल
    • Marathi

      • Home
      • मुंबई
      • महाराष्ट्र
      • भारत
      • विश्व
      • स्पोर्ट्स बार
      • कल्लाबाजी
      • हेल्थ मंत्रा
      • ब्लॉगर्स पार्क
      • युथ क्लब
      • Exclusive
      • फोटो
      • व्हिडिओ
      • भविष्य
    • Bengali

      • Home
      • Kolkata
      • State
      • Nation
      • World
      • Sports
      • Entertainment
      • Lifestyle
      • Blogs
      • Health
      • Photos
      • Videos
      • Slideshows
      • Weather
    • Ayurveda

      • Home
      • Health News
      • Introduction
      • History
      • Benefits
      • Herbs
      • Treatment
    • Investors Info

      • Home
      • About ZMCL
      • Listing Document
      • Shareholding Pattern
      • Presentations & Releases
      • Board of Directors
      • Financials-Annual
      • Financials-Quarterly
      • Q&A Transcripts
      • Code of Conduct
      • Notices
    /marathi/slideshow/उद्धव-ठाकरेंचं-एक-पाऊल-पुढे_188.html/8