सलमान खानचे तुफान हिट चित्रपट
सलमान खान हा सध्या बॉक्स ऑफिसचा राजा मानला जातोय. मिडास राजाप्रमाणे सलमान ज्या गोष्टीला स्पर्श करतो, ती गोष्ट सोन्याची होऊन जात आहे. त्याच्या जाहिराती, बिग- बॉस, दस का दमसारखे शो आणि सिनेमा सगळ्या माध्यमांमध्ये तो लोकप्रिय होतोय. सलमानच्या सिनेमांना अर्थ असो वा नसो, त्याच्या चाहत्यांना फक्त सलमान खान हवा असतो. त्याच्यावर काळवीट शिकारीचा गुन्हा दाखल होवो, त्याच्या कारमुळे अपघात होऊन गरीबांचा मृत्यू होवो.. सलमानच्या लोकप्रियतेवर त्याचा काडीचाही परिणाम होत नाही. त्याची प्रेमप्रकरणं गाजली. त्याची मैत्री, त्याची दुश्मनी.. सगळ्यालाच लोकप्रियता मिळते. 20 वर्षांहून अधिक काळ तो सिनेमांत काम करतोय. त्याने आत्तापर्यंत 80 सिनेमे केले आहेत.
एक था टायगर
सलमानच हे करू शकतो. या वर्षीचा धमाकेदार हिट सिनेमा म्हणजे ‘एक था टायगर’. सिनेमाच्या पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई या सिनेमाने केली. पहिल्याच दिवशी या सिनेमाने 33 कोटी रुपयांची घसघशीत कमाई केली. ऋतिक रोशनच्या अग्निपथचा रेकॉर्ड या सिनेमाने तोडला. या सिनेमाद्वारे त्याने प्रथमच ‘यशराज फिल्म्स’सोबत काम केलं. 75 कोटी रुपयांमध्ये बनवलेल्या या सिनेमाने 200 कोटींपेक्षा अधिक कमाई केली.
बॉडीगार्ड
‘बॉडीगार्ड’ ही 2011 मध्ये रिलीज झालेली सलमानची फिल्म मल्याळम सिनेमाचा रिमेक होती. ही फिल्म बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या फिल्म्सपैकी एक ठरली. हा सिनेमा सलमानचा मेहुणा असणाऱ्या अतुल अग्निहोत्रीने प्रोड्युस केला होता. करीना कपूरसोबत सलमानची ही ऍक्शन पॅक्ड लव्हस्टोरी लोकांना खुश करून गेली
रेडी
‘रेडी’ हा पुन्हा सलमान खानच्या धमाल स्वभावामुळे सुपरहिट ठरलेला विनोदी सिनेमा. दबंगच्या यशानंतर हा सिनेमा हिट करून सलमान खानने आपला जमाना आणला. हा सिनेमा ऍक्स फिल्म नसून विनोदी आणि कौटुंबिक स्वरुपाचा होता. लोकांना या ही सिनेमात सलमान खान खूप आवडला. या सिनेमाने 184 कोटींचा उद्योग केला. या सिनेमात सलमानसोबत असिन, परेश रावल आणि महेश मांजरेकरही होते.
‘दबंग’ आणि ‘दबंग 2’
‘दबंग’ सिनेमाने सलमानच्या करिअरला नवी झळाळी दिली. 215 कोटी रुपये कमावणाऱ्या या सिनेमाने पहिल्याच आठवड्यात 80 कोटी रुपये कमाई करून दबंगने सलमान खानला मेगास्टार बनवलं. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या दबंग 2नेही तेवढंच धमाकेदार ओपनिंग करून सलमान खानला यशाच्या शिखरावर चढवलं. दबंगमधून सोनाक्षी सिन्हाने बॉलिवूडमध्ये पदार्पण करून प्रसिद्धी मिळवली.
वाँटेड
पुरी जगन्नाथ यांच्या तेलुगू सुपरहिट ‘पोकिरी’ सिनेमाचा हिंदी अवतार म्हणजे वाँटेड. 35 कोटींच्या बडेटमध्ये बनवलेल्या वाँटेडने 95 कोटींची कमाई केली होती. या सिनेमा सलमान खानसोबत आयेशा टाकिया, प्रकाश राज, विनोद राठोड आणि महेश मांजरेकरसारखे कलाकार होते. यातील सलमान खानचे डायलॉग्जही प्रसिद्ध झाले होते.
तेरे नाम
2003मध्ये रिलीज झालेल्या ‘तेरे नाम’ सिनेमात सलमान आणि नवोदित भूमिका चावला यांची जोडी होती. यातील सलमानची हेअर स्टाइल तरुणांमध्ये लोकप्रिय झाली होती. या सिनेमाची गाणीही सुंदर होती. सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या त्या वेळच्या प्रेमप्रकरणावर हा सिनेमा काढला असल्याचं म्हटलं जात होतं. या सिनेमाने 19.5 कोटी रुपयांची कमाई केली होती.
हम दिल दे चुके सनम
संजय लीला भन्सालीच्या 1999 साली आलेल्या ‘हम दिल दे चुके सनम’ या सिनेमात सलमान खान आणि ऐश्वर्या राय एकत्र काम करत होते. या सिनेमात सलमान आणि ऐश्वर्या यांचं प्रेमप्रकरण फुललं होतं. मात्र ना या सिनेमातही सलमानला ऐश्वर्या मिळाली नाही.. आणि प्रत्यक्ष आयुष्यातही... 17 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाने 32.5 कोटी रुपयांची कमाई केली होती. या सिनेमाने 2 राष्ट्रीय आणि 9 फिल्मफेअर पुरस्कार मिळवले होते.
हम आपके है कौन
‘हम आपके है कौन’ हा बॉलिवूडमधल्या परंपरेचा एक उत्तम परिपाक होता. अत्यंत कौटुंबिक, निखळ मनोरंजन करणारा हा सिनेमा 1994 साली आला होता. सलमान खान-माधुरी दीक्षित अभिनित या सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या सिनेमाने शोलेचा रेकॉर्ड मोडला होता. 100 कोटींची कमाई करणारा हा पहिला भारतीय सिनेमा होता. अवघ्या 5 कोटी रुपयांमध्ये बनलेल्या या सिनेमाने 135 कोटी रुपयांची कमाई केली होती. या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार तर मिळालाच... पण कौटुंबिक सिनेमाची नवी परिभाषा भारतीय सिनेसृष्टीला दिली.
मैने प्यार किया
‘मैने प्यार किया’ हा सलमान खानचा पहिला सोलो हिट सिनेमा. या सिनेमात प्रथनच त्याने प्रमुख भूमिका केली होती. हा सिनेमा कौटुंबिक प्रेमकथा होती. 1989 साली हा सिनेमा आला. त्या वर्षातला हा सिनेमा सर्वांत मोठा हिट सिनेमा होता. तसंच त्या दशकातला दुसऱ्या क्रमांकाचा तो सर्वाधिक हिट झालेला सिनेमा होता. त्या काळी या सिनेमाने 14 कोटी रुपयांची कमाई केली होती. या सिनेमासाठी सलमान खानला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.
/marathi/slideshow/सलमान-खानचे-ब्लॉकबस्टर्स_181.html/8