`कसाबचं शव परत करा, अन्यथा...`

Last Updated: Thursday, November 22, 2012, 16:28

अजमल कसाब याच्या फाशीचा बदला म्हणून भारतात हल्ले करण्यात येईल, अशी धमकीच पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटना ‘पाक तालिबान’नं दिलीय.

कसाब, हल्ला आणि इंग्लंड टीम

Last Updated: Thursday, November 22, 2012, 11:16

मुंबईवर कसाबने हल्ला केला आणि पुण्यात फाशी दिली त्यावेळी क्रिकेटमध्ये योगायोग जुळून आलाय. नक्की काय झालं, असा प्रश्न साहजिकच आहे. मात्र, हल्ल्याच्यावेळी इंग्लंड टीम भारतीय दौऱ्यावर होती. तर फाशीच्यावेळीही इंग्लंड टीम भारतात आहे.

पाकचा इन्कार, कार्यकर्ता मागणार कसाबचा मृतदेह

Last Updated: Wednesday, November 21, 2012, 19:29

मुंबई हल्ल्याप्रकरणी आज फाशी देण्यात आलेला क्रुरकर्मा अजमल आमीर कसाबचा मृतदेह घेण्यास पाकिस्तानने नकार दिला असताना पाकिस्तानमधील मानवाधिकार कार्यकर्ता हा मृतदेह घेण्यासाठी सरसावला आहे.

कसाबच्या फाशी,दफनचा काढला व्हिडिओ

Last Updated: Wednesday, November 21, 2012, 18:29

क्रुरकर्मा कसाबला गुप्तपणे फाशी देण्यावरून सरकारवर प्रश्नांचा भडीमार होत असताना मुंबई पोलिसांनी भविष्यात कोणत्या प्रकारच्या वादाला तोंड देण्यासाठी कसाबच्या फाशीच्या प्रक्रियेचा संपूर्ण व्हिडिओ तयार केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

कसाबचा प्रवास... पन्नास करोड ते पन्नास रुपये

Last Updated: Wednesday, November 21, 2012, 18:17

अजमल कसाब याला जेलमध्ये सुरक्षित ठेवण्यासाठी आत्तापर्यंत महाराष्ट्र सरकारनं पन्नास करोड रुपयांचा खर्च केला होता. पण, महत्त्वाची बाब म्हणजे याच कसाबच्या फाशीच्या शिक्षेसाठी लागलेत अवघे ५० रुपये...

`भारताचा दावा खोटा... पाकिस्तानला मिळालं पत्र`

Last Updated: Wednesday, November 21, 2012, 17:55

‘भारतानं अजमल कसाबच्या फाशीसंदर्भातील निर्णयाचं पत्र पाठवलं होतं आणि आम्ही त्याचा स्वीकारही केला’ असं म्हणत पाकिस्ताननं भारतानं केलेला दावा फेटाळून लावलाय.

निष्पापांचे बळी घेणारा कसाब फाशीपूर्वी भेदरला

Last Updated: Wednesday, November 21, 2012, 14:55

मुंबईत हल्ला करून १६२ निरपराध जीवांचे बळी घेणार क्रुरकर्मा कसाब समोर मृत्यूला पाहून भेदरला होता. फाशीच्या वेळी तो अस्वस्थ आणि गप्प होता, असे जेल प्रशासनातील सूत्रांनी सांगितले.

`माझ्या आईला माझ्या फाशीबद्दल कळवा`

Last Updated: Wednesday, November 21, 2012, 14:48

कसाब यानं आपल्याला दिल्या जाणाऱ्या फाशीच्या शिक्षेची माहिती पाकिस्तानात आपल्या आईला दिली जावी, असं तुरुंगाच्या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं.

कसाबला फाशी, व्यक्त करा तुमच्या भावना

Last Updated: Wednesday, November 21, 2012, 12:31

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील दोषी पाकिस्तानचा क्रुरकर्मा अजमल कसाब याला आज बुधवारी सकाळी साडेसात वाजता पुण्यातील येरवडा कारागृहात फाशी देण्यात आल्याची माहिती, राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिली. या प्रकरणी तुम्हांला काय वाटते आम्हांला सांगा आम्ही त्याला देऊ प्रसिद्धी....

कसाबला फाशी : पाकिस्तानी मीडियानं भूमिका घेणं टाळलं

Last Updated: Wednesday, November 21, 2012, 17:55

भारतात उघडउघडपणे कसाबच्या फासावर जाण्याच्या बातमीवर आनंद व्यक्त केला जातोय तिथं पाकिस्तानी मीडियानं मात्र कोणतीही भूमिका घेण्याचं सपशेल टाळलंय.

`कसाबला फाशी... अफजल गुरुचं काय?`

Last Updated: Wednesday, November 21, 2012, 10:59

कसाबच्या फाशीवर भाजपानं आनंद व्यक्त करत, मुंबई हल्ल्यातील पीडितांनी आज खऱ्या अर्थानं न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केलीय. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनीही हीच भावना व्यक्त करताना संसद हल्ल्यातील आरोपी अफजल गुरुचं काय? असा सवाल केंद्र सरकारला केलाय.