'गंभीर' विकेट भारतासमोर जिंकण्याचं आव्हान

Last Updated: Sunday, February 12, 2012, 17:25

अॅडलेड वन डे मध्ये भारताला गौतम गंभीरच्या रूपाने चौथा धक्का बसला. या सीरीजमध्ये फारशी चमकदार कामगिरी करू न शकलेला गौतम गंभीरने मात्र चांगली फटकेबाजी करत होता.

इंडियाची हाराकिरी

Last Updated: Friday, January 27, 2012, 15:36

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये अ‍ॅडलेड येथे सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने पुन्हा बाजी मारली आहे. टीम इंडियाची हाराकीरी दिसून आली. सचिन तेंडुलकर पुन्हा अपयशी ठरला आहे. १३ रन्स करून तंबूत परतला आहे. ५०० रन्सचं आव्हान टीम इंडियाला आता पेलणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे पराभवाकडे वाटचाल असल्याचे दिसून येत आहे.

टीम इंडियाला पहिला धक्का

Last Updated: Friday, January 27, 2012, 11:30

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये अ‍ॅडलेड येथे सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव १६७ रन्सवर घोषित केला आहे. त्यामुळे टीम इंडियासमोर ५०० रन्सचे टार्गेट आहे.

रिकी पॉन्टिंगचे अर्धशतक

Last Updated: Friday, January 27, 2012, 13:06

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये अ‍ॅडलेड येथे सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात १५४ रन्सच्या बदल्यात ५ विकेट गमावल्या आहेत. तर रिकी पॉन्टिंगने अर्धशतक केले.

विराटचे शतक, इंडिया ऑलआऊट

Last Updated: Thursday, January 26, 2012, 14:57

टीम इंडियाच्या विराट कोहलीने झुंजार शतक फटकावून टीमला नवा सूर दाखवून दिला आहे. कसोटी कारर्कीदीतील विराटचे पहिले शतक आहे. ऑस्ट्रेलियात सचिन, लक्ष्मण, द्रविड, सेहवाग यांच्यासारख्या खेळाडूंनी नांगी टाकली असताना विराट खेळी करून टीम इंडियाची इज्जत राखली आहे.

विराटची खेळी, साहा आऊट

Last Updated: Thursday, January 26, 2012, 11:33

विराट कोहली आणि बुध्दीमान साहाने शतकी भागिदरी केली. त्यामुळे टीम इंडियाच्या ६ बाद २२५ रन्स झाल्या. मात्र, ऑस्ट्रेलियाने साहाची विकेट घेवून पुन्हा एक जोरदार धक्का दिला.

सचिन आऊट, विराटचे अर्धशतक

Last Updated: Thursday, January 26, 2012, 10:28

अॅडलेड टेस्टच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाने पुन्हा नांगी टाकली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने पुन्हा निराशा केली आहे. तो २५ रन्सवर आऊट झाला. ऑस्ट्रेलियाच्या ६०४ रन्सचा पाठलाग करताना टीम इंडियाची दमछाक झाली आहे. १४५ रन्सवर ५ विकेट गेल्या आहेत.

द्रविड बाद, टीम इंडिया पुन्हा ढेपाळली

Last Updated: Wednesday, January 25, 2012, 13:38

अॅडलेड टेस्टमध्ये जिथे ऑस्ट्रेलियाने जबरदस्त बॅटींगचा नमुना पेश केला त्याच अॅडलेड टेस्टमध्ये टीम इंडियाचे बॅट्समन पुन्हा एकदा ढेपाळले आहेत फक्त पहिल्या ५० रन्सच्या आतच टीम इंडियाचे दोन महत्त्वाचे फंलदाज तंबूत परतले.

टीम इंडियाला रडवलं, पहिला डाव घोषित

Last Updated: Wednesday, January 25, 2012, 13:39

अॅडलेड टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियन बॅट्समने टीम इंडियाच्या बॉलिंगची अक्षरश: पिसे काढली. पॉण्टिंग आणि क्लार्क बाद झाल्यानंतर टीम इंडिया बाकीच्या फंलदाजांना झटपट बाद करेल अशी आशा होती, मात्र ऑस्ट्रेलियाच्या तळाच्या बॅट्समननी अगदी नांगर टाकून बॅटींग केली.

ऑस्ट्रेलिया आणि व्दिशतके....

Last Updated: Friday, January 27, 2012, 08:17

अॅडलेड टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाच्या कॅप्टन मायकेल क्लार्क आणि रिकी पॉन्टिंग यांनी नॉट आऊट डबल सेंच्युरी केली आहे. या दोघांची पार्टनरशिप टीम इंडियाला डोकेदुखी ठरली आहे. टीम इंडिया बॅकफूटवर गेली आहे. ओपनर वॉर्नर, कोवन आणि शॉन मार्श या टॉप तीन बॅट्समनला झटपट आऊट करण्यात टीम इंडियाच्या बॉलर्सना यश आलं. मात्र, त्यानंतर यश आलं नाही.

पहिला दिवस ऑस्ट्रेलियाचा आणि शतकांचा....

Last Updated: Tuesday, January 24, 2012, 13:38

ऍडलेड टेस्टमध्ये पहिला दिवस ऑस्ट्रेलियाच्या नावावर राहिला. ऑस्ट्रेलियानं पहिल्या दिवसअखेर ३ विकेट गमावून ३३५ रन्स केले. क्लार्क आणि पॉन्टिंगची नॉट आऊट सेंच्युरी, दोघांनी चौथ्या विकेट्साठी केलेली २५१ रन्सची पार्टनरशिप यामुळं पहिल्या दिवशी टीम इंडिया बॅकफूटवर गेली आहे.

चौथ्या टेस्टमध्ये ऑसींची खराब सुरवात

Last Updated: Tuesday, January 24, 2012, 10:29

ऑस्ट्रेलिया टीम इंडियाला व्हाईट व्हॉश देण्यासाठी आजपासून अँडलेड टेस्टमध्ये सज्ज झाली आहे. पण आज चौथ्या टेस्टच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाची फंलदाजी सुरवातीलाच गडबडली. लचं पर्यंत ऑसींनी आपल्या ३ विकेट गमावल्या होत्या. त्यात दोन विकेट आर. अश्विनने घेतली तर एक विकेट झहीर खानने मिळवली.