वर्ध्यात खाजगी बसला आग, 5 प्रवाशांचा होरपळून मृत्यू

Last Updated: Thursday, May 29, 2014, 17:12

जळगावहून नागपूरला येणाऱ्या बाबा ट्रॅव्हल्सच्या खाजगी बसला वर्धा जिल्ह्यातील तळेगाव जवळ अचानक आग लागली. या आगीत 5 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.

निवडणुकांमुळे खाजगी उड्डानसेवेला सुगीचे दिवस

Last Updated: Tuesday, April 15, 2014, 14:00

निवडणुकीचे दिवस आहेत... त्यामुळे बरेच धंदे तेजीत आहेत. त्यापैंकीच एक व्यवसाय म्हणजे खाजगी विमानं आणि हेलिकॉफ्टर भाड्यानं देण्याचा... या व्यवसायाला सध्या सुगीचे दिवस आलेत, असं म्हणायला हरकत नाही.

बस - कार - कंटेनर - टेम्पोला अपघात, १० ठार

Last Updated: Tuesday, February 4, 2014, 12:24

सातारा - पुणे रस्त्यावर एक विचित्र अपघात झालाय. एका गाडीला झालेल्या अपघातामुळे मागच्या गाड्यांनीह एकमेकांना धडक दिली आणि अपघातात तब्बल १० जणांना आपले प्राण गमवावे लागलेत तर ३६ हून अधिक जण जखमी झालेत. मृतांमध्ये तीन पुरूष आणि सात महिलांचा समावेश आहे.

ठाण्यात अश्लील चाळे करणाऱ्या ‘बॉस’ला चोप

Last Updated: Friday, December 13, 2013, 17:23

ठाण्यामध्ये एका खासगी विमा कंपनीत काम करणाऱ्या दोन मुलींची छेड काढणाऱ्या त्यांच्या बॉसला मुलींनी आणि त्यांच्या नातलगांनी चांगलाच चोप दिलाय.

इश्कजादे मोदी आणि महिलेचे वडील काकुळतीला...

Last Updated: Wednesday, November 20, 2013, 16:53

गुजरातच्या एका महिलेवर छुप्या पद्धतीनं सरकारी पाळत ठेवण्याच्या प्रकरणानं आता वेगळं वळण घेतलंय. ज्या महिलेवर पाळत ठेवण्यात आल्याचं म्हटलं जातंय त्या महिलेच्या वडिलांनी, या प्रकरणाच्या चौकशीचे काहीही गरज नसल्याचं म्हटलंय.

दिवाळीच्या मुहूर्तावर प्रवाशांची लूट!

Last Updated: Sunday, October 20, 2013, 22:09

दिवाळीच्या सणांमुळे खाजगी टूर-ट्रॅव्हल्स कंपन्या प्रवाश्यांची लूट करताना दिसत आहेत. नाशिकमधून गुजरातला जाण्यासाठी ट्रेन नसल्याने ट्रव्हल्स कंपन्या दुप्पट ते तिप्पट भाड्याची आकारणी करण्यात येतेय.

… अशी होते ‘एमसीए’ची निवडणूक!

Last Updated: Wednesday, October 9, 2013, 09:32

‘बीसीसीआय’शी संलग्न असलेली ‘एमसीए’ ही एक खाजगी क्रिकेट संघटना आहे. तरीही या संस्थेची निवडणूक ही लोकसभा आणि विधानसभेएवढीच रंगतदार ठरते.

मनसेची वाटचाल खाजगीकरणाच्या दिशेनेच!

Last Updated: Sunday, July 7, 2013, 19:47

खाजगीकरणाला विरोध करत नाशिक शहराची सत्ता काबीज करणाऱ्या मनसेची वाटचाल खाजगीकरणाच्या दिशेनेच सुरु झालीय. निमित्त आहे शहरातला खत प्रकल्प...

सरकारी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची पळवापळवी!

Last Updated: Wednesday, March 13, 2013, 18:07

नागपूरमधल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची चक्क पळवापळवी सुरू आहे. रुग्णांना खाजगी हॉस्पिटलमध्ये पळवून नेणा-या दलालांच्या टोळीचा पर्दाफाश झालाय. प्रसंगी मृत्यूची भीती दाखवून हे दलाल रुग्णांना पळवून नेत होते.

शरद पवारांच्या पुतण्यावर सरकारी विभागांची कृपा

Last Updated: Friday, March 1, 2013, 19:05

बारामतीमधल्या बारामती अॅग्रो शुगर कारखान्य़ावर सरकारी विभागांची मोठी कृपा झाली आहे. खाजगी कारखाना असूनही हा कारखाना नगरपालिकेच्या पाइपलाईनचा वापर करतोय. त्यासाठी भाडंही कमीच दिलं जातं.

`बोर्डाच्या परीक्षेसाठी खाजगी शाळांचे वर्ग मिळणार नाही`

Last Updated: Thursday, February 14, 2013, 08:49

आत्तापर्यंत पालक आणि मुलांना कोंडीत पकडणाऱ्या खाजगी शाळांनी आता तर चक्क राज्य सरकारलाच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय.

महाराष्ट्रात खाजगी विद्यापीठांना मार्ग मोकळा होणार?

Last Updated: Saturday, December 15, 2012, 17:33

राज्यातील खासगी विद्यापीठ स्थापनेचा मार्ग आता मोकळा होण्याची दाट शक्यता आहे. यापूर्वी विधेयकात आरक्षण नसल्यामुळे या विधेयकाला काही मंत्र्यांनीच विरोध केला होता.

‘जयप्रभा’ हेरिटेज नाही... लतादीदी जिंकल्या

Last Updated: Thursday, October 18, 2012, 10:05

‘जयप्रभा’ स्टुडिओवर महापालिका, चित्रपट महामंडळ किंवा इतर सिने व्यावसायिकांचा कोणताही हक्क नसल्याचं सांगत कोल्हापूरच्या दिवाणी कोर्टानं अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचा दावा फेटाळून लावलाय.

कत्तलखान्याच्या 'खाजगीकरणा'वर रणकंदन!

Last Updated: Saturday, August 18, 2012, 10:37

पुणे महापालिकेत कत्तलखान्याचा विषय सध्या चांगलाच पेटलाय. स्थायी समितीनं कोंढव्यातला जनावरांचा कत्तलखाना खाजगी संस्थेला चालवायला देण्याचा ठराव गुरुवारी मंजूर केला. त्यानंतर नवीन वादाला तोंड फुटलंय.

मुंबई मनपा शाळांचं अखेर खाजगीकरणच

Last Updated: Thursday, July 26, 2012, 22:31

मुंबई महापालिकेच्या शाळेतील विघार्थी गळतीची संख्या वाढत आहे. ही गळती रोखण्यासाठी पालिकेनं मनपा शाळा सेवाभावी संस्थाना दत्तक देण्याचा निर्णय घेतलाय. पालिका प्रशासनान हा प्रस्ताव स्थायी समितीत मंजूर केलाय.

पालिका शाळांचं खाजगीकरण?

Last Updated: Thursday, July 12, 2012, 15:22

मुंबई महापालिकेतील शाळेतील विघार्थ्यांची गळतीची संख्या वाढते आहे. विघार्थ्यांची ही गळती शाळांमधील शैक्षणिक दर्जा ढासळत असल्यामुळे पालिकेनं सेवाभावी संस्थाना शाळा दत्तक देण्याचा निर्णय घेतलायं.

मुजोर खासगी शाळांवर कारवाई होणार?

Last Updated: Thursday, July 5, 2012, 10:00

खासगी शाळांमध्ये गरीब विद्यार्थ्यांना २५ टक्के जागा राखीव ठेवण्याचा कायदा केंद्र सरकारने केलाय खरा, मात्र, पुण्यातील शाळांनी या कायद्याचा पुरता बोजवारा उडवलाय. इंग्रजी माध्यमाच्या शाळांची ही मुजोरी मोडून, गरीब विद्यार्थ्याना शिक्षणाचा हक्क मिळून देण्याचे मोठे आव्हान शिक्षण विभाग आणि महापालिकेपुढे आहे.