भारतात मोबाईल ग्राहकांची संख्या 71 कोटी 10 लाखांवर

Last Updated: Sunday, March 30, 2014, 20:56

जीएसएम नेटवर्कवर मोबाईल ग्राहकांची संख्या फेब्रुवारी महिन्यात एक टक्क्यांनी वाढली आहे, आता ही संख्या 71 कोटी 10 लाखांवर येऊन पोहोचली आहे.

आता कोणत्याही बँकेत बदलू शकता २००५ पूर्वीच्या नोटा

Last Updated: Tuesday, March 18, 2014, 08:32

आता आपण देशातल्या कोणत्याही बँकेच्या शाखेत जावून २००५ पूर्वीच्या नोटा (५०० आणि १००० सह) बदलू शकता. १ जानेवारी २०१५पर्यंत ही सेवा उपलब्ध आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं सर्व बँकांना तसे आदेश दिले आहेत की सामान्य नागरिकांची जुन्या नोटांपासून सुटका होण्यासाठी त्यांची मदत करा. विशेष म्हणजे नोट बदलण्याच्या संख्येची कोणतीही सीमा नाहीय.

‘जागो ग्राहक जागो’... बिल्डरपासून सावधान!

Last Updated: Tuesday, December 24, 2013, 21:32

आज राष्ट्रीय ग्राहक दिन... त्यानिमित्तानं ग्राहकांची सर्वाधिक फसवणूक कोण करतं, हे आम्ही जाणून घेतलंय. पुण्यात यामध्ये सगळ्यात वरचा क्रमांक पटकावलाय बिल्डर्सनी...

‘समुद्रा’ बारवर पोलिसांचा छापा, २२ मुलींना पकडलं

Last Updated: Thursday, December 5, 2013, 12:51

मुंबईतल्या नागपाडा इथल्या ‘समुद्रा’ या बारवर छापा मारून पोलिसांनी देहविक्रीचा धंदा करणाऱ्या २२ मुलींना अटक केलीय. पोलिसांच्या या विशेष कारवाईत २२ मुलींसह इतर ३९ जणांना पकडण्यात आलं.

`एटीएम`मधून पैसे काढायचेत?... मग लवकरच काढा!

Last Updated: Tuesday, October 8, 2013, 12:46

दसरा आणि दिवाळीच्या मुहूर्तावर काही नवी खरेदी करायचा प्लान असेल तर त्यासाठी लागणारे पैसे आत्ताच काढून ठेवा... कारण ऐन सणासुदीच्या काळात तुमचं एटीएम मशीन तुम्हाला दगा देऊ शकतं.

सणासुदीच्या मुहूर्तावर वीज ग्राहकांना शॉक

Last Updated: Friday, September 6, 2013, 12:13

सणासुदीच्या मुहूर्तावर राज्यातल्या वीज ग्राहकांना महावितरणनं शॉक दिला आहे. महानिर्मिती आणि महापारेषण कंपनीच्या थकीत रकमेसाठी वीज नियामक आयोगानं तब्बल ३ हजार ६८६ कोटी रुपये गुरुवारी मंजूर केलेत.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना लॉटरी?

Last Updated: Monday, August 5, 2013, 12:12

लोकसभा निवडणुका जवळ आल्यात... पडघम वाजायला सुरुवात झालीय. सरकारनं लोकांना खूश करण्याचे प्रयत्नही सुरू केलेत...

कॅडबरीमध्ये पिन! तक्रारकर्त्याला मिळणार ३० हजार!

Last Updated: Thursday, May 23, 2013, 19:55

सुप्रसिद्ध चॉकलेट कंपनी कॅडबरीवर त्रिपुरातील एका ग्राहकाने ३०,००० रुपयांचा दावा ठोकला आहे. त्याने विकत घेतलेल्या कॅडबरीमध्ये लोखंडी पीन निघाली होती.

एअरटेलला सात विभागात 'थ्री'जी ग्राहक बनविण्यास बंदी

Last Updated: Friday, April 12, 2013, 07:20

दूरसंचार सेवा देणाऱ्या एअरटेल या कंपनीला सुप्रीम कोर्टाने आज चांगलाच झटका दिला. एअरटेलला ७ विभागात नवे ३जी ग्राहक बनविण्यास आणि ३जी सेवा देण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

`मुंबईत व्होडाफोन बंद होणार नाही`

Last Updated: Tuesday, March 26, 2013, 11:46

‘व्होडाफोनचा परवाना आणखी १८ महिन्यांपर्यंत सुरू राहणार आहे. तोपर्यंत परवान्याला मुदतवाढ मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि आमचे हे प्रयत्न नक्कीच यशस्वी होतील’ असा दावा मोबाईल कंपनी व्होडाफोननं केलाय.

`आधार`च नाही तर गॅस सबसिडी कुठून मिळणार?

Last Updated: Thursday, January 31, 2013, 09:26

तेल कंपन्यांनी आधार कार्ड नसणाऱ्या ग्राहकांना सवलत मिळणार नसल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे ग्राहकांची मात्र पंचाईत झालीय.

भाडेवाढ मागे घ्या नाहीतर परिणाम वाईट, सरकारला धमकी

Last Updated: Friday, October 19, 2012, 11:06

टॅक्सी आणि रिक्षा भाडेवाढ ४८ तासांत मागं घेतली नाही तर सरकारविरोधात कोर्टात जाण्याचा इशारा मुंबई ग्राहक पंचायतीनं दिलाय.

गृहनिर्माण विधेयक मंजूर... बिल्डरांना वेसण

Last Updated: Tuesday, July 17, 2012, 10:52

बिल्डरांकडून ग्राहकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी विधानसभेत गृहनिर्माण नियामक प्राधिकरण स्थापण्याचं विधेयक मंजूर करण्यात आलं. यामुळं फसवणूक करणाऱ्या बिल्डरांना वेसण घालायला मदत होणार आहे.

महावितरणचा ग्राहकांना शॉक

Last Updated: Tuesday, June 19, 2012, 10:07

मुंबई महावितरणच्या ग्राहकांचे या महिन्यापासून आगामी सहा महिने वीज बिल प्रति युनिट २२ पैसे ते ६८ पैशांनी महागणार आहे. इंधन समायोजन आकारापोटी ही दरवाढ होत आहे.

नाशिककरांना दिलासा देणारा खाद्य महोत्सव

Last Updated: Saturday, May 5, 2012, 23:07

राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या वतीन नाशिकमध्ये दोन दिवसीय धान्य, खाद्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. शेतक-यांनी उत्पादित केलेला माल थेट ग्राहकांपर्यंत पोहचत असल्यानं शेतकरी आणि ग्राहक दोन्ही समाधानी आहेत.

आम्ही राजकारण करत नाही म्हणून...

Last Updated: Saturday, October 22, 2011, 15:55

विवेक पत्की
युनियनवाले म्हणतात की मीटर दुरूस्ती करण्यासाठी नवे इन्फ्रास्ट्रक्चर नाही. म्हणून मीटरमध्ये गडबड होते. सरकार तुमचंच आहे. युनियन तुमचीच आहे. मग, इन्फ्रास्ट्रक्चरची समस्या सोडवायची कुणी? ग्राहकांना कशासाठी भुर्दंड ?