अखेर ज्योतिबाच्या सेवेतून ‘सुंदर’ची सुटका!

Last Updated: Thursday, May 29, 2014, 17:45

सुंदर हत्तीला दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टानं सुंदर हत्तीला जंगलात पाठवण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टानं विनय कोरेंची याचिका फेटाळून लावली आहे.

बिबट्यानं ६ वर्षीय मुलीला नेलं जंगलात

Last Updated: Saturday, December 21, 2013, 08:54

चंद्रपूर शहरातल्या जुनोना जंगल परिसरात रात्री उशीरा बिबट्यानं सरीता कौरासे या ६ वर्षांच्या मुलीला उचलून नेल्याची घटना घडलीय.

चला तर, नवी मुंबईतील विमानतळाचा प्रश्न मार्गी

Last Updated: Wednesday, October 30, 2013, 08:15

अखेर नवी मुंबईतील उलवे येथील विमानतळाचे घोडे गंगेत न्हाले आहे. होणार की नाही, याची चर्चा जोर धरत असताना सिडकोने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने सर्व कागदपत्रे पाहून खारफुटी तोडण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे ज्या प्रश्नावर विमानतळाचे टेक ऑफ रखडले होते. ते आता मार्गी लागले आहे. दरम्यान, नवी मुंबईतील जागांचे आणि घरांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

मुरबाडजवळ हेलिकॉप्टर कोसळलं, पाचही जण ठार

Last Updated: Sunday, September 29, 2013, 13:16

ठाणे ग्रामीण भागातील टोकवडे इथल्या नाणेघाट भागातील जंगलात एका हेलिकॉप्टरला अपघात झालाय. वीजेच्या तारेला धडकून या हेलिकॉप्टरला अपघात झालाय. मुंबईहून औरंगाबादकडे निघालेलं युनायटेड हॅचरीज कंपनीचं हे हेलिकॉप्टर होतं.

बॉम्बस्फोटाला वर्ष उलटलं; बॉम्बसूट कधी मिळणार?

Last Updated: Thursday, August 1, 2013, 11:22

पुण्यात जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांना आज एक वर्ष पूर्ण होतंय. स्फोटाच्या तपासाबाबत राज्याच्या सुरक्षा यंत्रणांची पाटी कोरीच आहे

चंद्रपुरात आढळल्या दोन हजार वर्षांपूर्वीच्या गुंफा!

Last Updated: Monday, July 1, 2013, 22:07

चंद्रपूर जिल्ह्यातल्या कोरपना तालुक्यात वर्धा नदीच्या खो-याशेजारी घनदाट जंगलात 2 हजार वर्षांपूर्वीच्या महापाषाण काळातल्या 2 गुंफा आढळून आल्यायत.

उत्तराखंड : महाराष्ट्रातील हे ९० जण आहेत सुखरुप!

Last Updated: Monday, June 24, 2013, 13:46

उत्तराखंडमध्ये अजूनही परिस्थिती बिकट आहे. या ठिकाणी अडकलेल्या पर्यटकांना आणि भाविकांना तिथून हलवण्यासाठी लष्कराचे आणि इंडो तिबेट बॉर्डर पोलीसांचे (आयटीबीपी) शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

गोष्ट...बालपण हरवलेल्या वाघाची !

Last Updated: Tuesday, May 7, 2013, 12:23

बालपणातील मौजमजा, स्वच्छंदीपणा आयुष्यातील पुढच्या संघर्षासाठी ऊर्जा देणारं इंधन असतं. हे बहुतेक वाघाचं कुटुंब विसरलं असेल. तुम्ही विसरु नका..... तुमच्या बछड्यांना स्वच्छंदी जगू द्या..

तेलाच्या गाळात खारफुटीचं जंगल घेतंय अखेरचा श्वास...

Last Updated: Tuesday, March 5, 2013, 09:01

मुंबईच्या माहूल भागात खारफुटीचं जंगल नष्ट करण्यासाठी खराब झालेल्या तेलाचा गाळ वापर करण्यात आलाय. सुमारे शंभर एकरांवरील वनसंपदा यामुळं धोक्यात आली असून वनविभाग मात्र कासवाच्या चालीनं वनसंपदा वाचवण्याचा प्रयत्न करतंय.

भारतीय क्रिकेट टीमने केली जंगलात प्रॅक्टीस

Last Updated: Tuesday, August 28, 2012, 14:05

अंडर १९च्या भारतीय टीमने विश्वविजेतेपद पटकावलं आणि साऱ्यांच्या नजरा त्यांच्याकडे वळाल्या.उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली भारतीय युवा संघाने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात धूळ चारली.

ताडोबात राज ठाकरे, पतंगराव आमने-सामने

Last Updated: Wednesday, May 30, 2012, 21:45

गेल्या काही दिवसांमध्ये व्याघ्र प्रकल्पात झालेल्या वाघांच्या शिकारी तसंच जंगलाला मोठ्या प्रमाणावर आग लागून झालेल्या नुकसानीचा आढावा राज ठाकरे घेणार आहेत. तर राज ठाकरेंच्या दौ-यापाठोपाठ आता वनमंत्री पतंगराव कदम हेही आज ताडोबा दौ-यावर जाणार आहेत.

फिरायला जायचेय... चला आंबा जंगलात..

Last Updated: Sunday, April 1, 2012, 18:27

कोल्हापूरातील आंबा परिसर हा पर्यटनस्थळ म्हणून नावारुपाला येतो आहे. शुद्ध हवा, घनदाट वृक्ष, पक्षांचा चिवचिवाट यामुळं पर्यटक आकर्षित होत आहेत.

ताडोबा जंगलच जाळून टाकलं...

Last Updated: Wednesday, February 22, 2012, 15:18

चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात रिसॉर्ट बांधण्यासाठी १८ एकर जंगल जाळण्यात आलं आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातल्या मोहर्ली गावाच्या हद्दीतलं जंगल जाळून नष्ट करण्यात आलं आहे.