दुर्देवी घटना: उष्माघात आणि अन्न-पाण्याविना त्यांनी सोडले प्राण

Last Updated: Tuesday, June 10, 2014, 19:12

नागपूरमध्ये उष्माघातानं संपूर्ण कुटुंबाचाच बळी घेतल्याचं निष्पन्न झालंय. ६७ वर्षांचे रशीद मोहम्मद आणि त्यांच्या ६३ वर्षांच्या पत्नी बिल्कीस बानो यांचा मृत्यू झालाय. रशीद मोहम्मद यांचा ३ दिवसांपूर्वी उष्माघातानं मृत्यू झाला होता. त्यांच्या पत्नी या नेत्रहीन असून अथंरूणाला खिळल्या होत्या. रशीद यांच्या मृत्यूनंतर उपासमारीनं त्यांचा मृत्यू झाला.

सुनेच्या जाचाला कंटाळून वृद्ध दाम्पत्याची आत्महत्या

Last Updated: Sunday, March 16, 2014, 23:59

सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील बासुंबे गावात, मुलाच्या आणि सुनेच्या जाचाला कंटाळून वृद्ध दांपत्याने आत्महत्या केली.

आबांच्या तासगावमध्ये शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या

Last Updated: Saturday, March 15, 2014, 20:28

अवेळी पाऊस आणि गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या गारपीटीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाकडून मदत झालेली नाही. शेतीचे नुकसान आणि कर्जबारामुळे शेतकरी त्रस्त आहेत. सांगलीमधील तासगावमधील एका शेतकरी दाम्पत्याने गारपीटीने नुकसान झाल्यामुळे आत्महत्या केली.

अॅसिड टाकून वृद्ध दाम्पत्याची हत्या

Last Updated: Monday, January 6, 2014, 15:56

श्रीगोंदे तालुक्यातील पिंपळगाव पिसा शिवारातील कुकडी कालव्याजवळ राहणारे रंगनाथ गणपत भोसले (७०), सरस्वती रंगनाथ भोसले (६५) या वृद्ध शेतकरी जोडप्याची अॅसिड टाकून क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे.

याला काय म्हणायचं, मुलगी रडली...त्यांनी काढली विकायला

Last Updated: Tuesday, November 19, 2013, 08:40

आपलं बाळ कितीही हट्टी असलं किंवा रडलं तरी कोणी ते विकायला काढेल का? नाही ना! परंतु ही वास्तव घटना घडलेय प्रगत अशा अमेरिकेत. अमेरिकेत एक धक्कादायक बाब पुढे आली आहे, बाळ रडलं म्हणून त्याला चक्क विकायला काढलं.

दाम्पत्याने काढला मोलकरणीचा नग्न MMS

Last Updated: Monday, November 18, 2013, 19:37

घरकाम करायला माणसं मिळत नाही, ही बाब जरी खरी असली तरी आपल्या घरातील मोलकरणीने काम सोडू नये म्हणून ओदिशातील एका दाम्पत्त्याने एक शरमेने मान खाली घालणारे कृत्य केलं आहे. या दाम्पत्याने मोलकरणीचे कपडे काढून तिला नग्न केले आणि तिचा एमएमएस काढल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

नवविवाहित दाम्पत्याची आत्महत्या

Last Updated: Thursday, August 8, 2013, 11:42

चंद्रपुरातील जयहिंद चौक भागात एका नवविवाहित दाम्पत्याने विष पिउन आत्महत्या केल्याची घटना घडलीये. सकाळी त्यांच्या घरमालकांनी त्यांचा दरवाजा ठोठावला असता कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही ज्यानंतर आतमध्ये या दोघांचे मृतदेह आढळून आले.

नव दाम्पत्यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ

Last Updated: Thursday, July 25, 2013, 07:28

पिंपरी-चिंचवडमध्ये हिंजवडी परिसरात एका नव विवाहित दाम्पत्याचा मृतदेह आढळल्यानं एकच खळबळ उडालीय. मोहन चौधरी आणि त्यांची पत्नी नैनु चौधरी असं या नवविवाहित दाम्पत्याचं नाव आहे.

भाडेकरू ठेवणं वृद्ध दाम्पत्याच्या जीवावर बेतलं

Last Updated: Wednesday, July 11, 2012, 14:09

औरंगाबादमध्ये एका वृद्ध दाम्पत्याला स्वत:च्याच घरात डांबण्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय. या वृद्ध दाम्पत्याला घरात कोंडणारा दुसरा-तिसरा कोणी नसून हा त्यांचाच भाडेकरू आहे.

शिर्डीत हॉटेलमध्ये दाम्पत्याची आत्महत्या

Last Updated: Saturday, January 7, 2012, 12:08

बँकेच्या कर्जाला कंटाळून एका जोडप्यानं गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार शिर्डीतल्या हॉटेल साई धनप्रतापमध्ये उघड झालाय. राजेंद्र आणि अर्जना निम्बेकर असं या दाम्पत्याचं नाव आहे.