मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, मालगाडीमध्ये बिघाड

Last Updated: Saturday, March 8, 2014, 10:44

मध्य रेल्वेच्या वाहतुकाचा पुन्हा एकदा बोजवारा उडाला. सकाळीच लोकल वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला. लोकल ३० ते ४५ मिनिटे लेट असल्याने कार्यालयात जाणाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. कल्याण, ठाणे, भांडूप, कुर्ला या स्थानंकावर प्रचंड गर्दी झाली होती.

... आणि इराणमध्येही फेसबुक, ट्विटर पुन्हा दिसलं!

Last Updated: Wednesday, September 18, 2013, 09:01

इराणमध्ये सरकारनं घातलेल्या बंदीनंतर ‘सोशल वेबसाईटस्’ इथं बंद करण्यात आल्या होत्या... मग, इथं फेसबुक, ट्विटरवरची बंदी उठवली गेलीय का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना...

सिग्नल यंत्रणेत बिघाड; रेल्वे खोळंबली

Last Updated: Saturday, April 13, 2013, 10:35

मध्य रेल्वेच्या मार्गावर आज सकाळी पुन्हा एकदा वाहतूकीचा खोळंबा झालाय. ठाणे स्टेशनजवळ सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय.

तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत

Last Updated: Thursday, January 24, 2013, 08:46

गुरुवारी पहाटेच्या थंडीतच बदलापूरजवळ रेल्वेचा तांत्रिक बिघाड झालाय. त्यामुळे अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गांची वाहतूक खोळंबलीय.

सिग्नल यंत्रणेत बिघाड... मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Last Updated: Friday, December 14, 2012, 17:36

मुलुंड स्टेशनजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक अर्ध्या तासानं उशीरा होत आहे.

राज्यात अंधार, चार वीजनिर्मिती केंद्रात बिघाड

Last Updated: Wednesday, October 17, 2012, 14:59

शंभर दिवसात महाराष्ट्र लोडशेडींगमुक्त होणार अशी घोषणा करून काही दिवसच उलटत नाही, तोच महाराष्ट्र पुन्हा एकदा अंधारात गेला आहे.

`मरे` विस्कळीत; कल्याण स्टेशनवर गर्दीच गर्दी

Last Updated: Tuesday, September 4, 2012, 11:35

कल्याणमध्ये सकाळपासून मुसळधार पावसाला सुरूवात झालीय. त्यातच रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानं रेल्वेचा आणि प्रवाशांचा मात्र चांगलाच खोळंबा झाला होता. आता मात्र, सिग्नल यंत्रणा दुरुस्त करण्यात आलीय. रेल्वे वाहतूक मात्र अजूनही विस्कळीत आहे.

विधान परिषद निवडणूक - आघाडीत बिघाडी

Last Updated: Monday, May 7, 2012, 20:41

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे. परभणी-हिंगोली आणि नाशिक विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरोधात काँग्रेसनं उमेदवारी अर्ज दाखल केलेत.

विधानपरिषदेसाठी आघाडीत बिघाडी होणार?

Last Updated: Monday, May 7, 2012, 16:09

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे. परभणी-हिंगोली आणि नाशिक विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरोधात काँग्रेसनं उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

मध्ये रेल्वेवर दगडफेक, कर्जत सेवा ठप्प

Last Updated: Thursday, April 26, 2012, 11:09

अंबरनाथ लोकलमध्ये विठ्ठलवाडी रेल्वेस्थानकादरम्यान बिघाड झाल्याने वाहतूक काही वेळ खोळंबली. मात्र, लोकल उशीरा धावत असल्याचे पाहून संतप्त प्रवाशांनी अंबरनाथ येथे रेल्वे रोखल्या आणि गाड्यांवर दगडफेक केली. त्यामुळे वाहतुकीचा अधिकच खोळंबा झाला. मध्य रेल्वेच्या भोंगळ कारभाराविरोधात संताप व्यक्त होत आहे.

कोणतेही बटण दाबा, मत राष्ट्रवादीला

Last Updated: Tuesday, February 7, 2012, 17:12

कोल्हापूरमधील कागल तालुक्यातील हसूर खुर्द येथील मतदान केंद्रांवर यंत्रात बिघाड झाल्याने गोंधळ निर्माण झाला. मतदाराने कोणतेही बटण दाबले, तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह असलेल्या घड्याळ्यालाच मत पडत असल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर, गावकऱ्यांनी गोंधळ घातला.

आघाडीत बिघाडी, कोकणाकडे लक्ष

Last Updated: Saturday, January 28, 2012, 17:04

कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात आघाडी न होता बिघाडी झाली आहे. त्यामुळे शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत दोन्ही कॉंग्रेसचा कस लागणार आहे.

ठाणे: आघाडीत बिघाडी, बैठकीला आनंद परांजपेंची हजेरी

Last Updated: Thursday, January 26, 2012, 17:07

ठाण्यात आघाडीचं जागावाटप निश्चित झालं असंल तरी आठ वॉर्डवरुन मतभेद कायम आहेत. आज झालेल्या बैठकीतही त्याबाबत काहीच निर्णय होऊ शकला नाही. वॉर्ड क्रमांक १३, १५, ३६, ३७, ५४,५६, ५९, ६० या वॉर्डवरुन दोन्ही काँग्रेसमध्ये तीव्र रस्सीखेच आहे.

किरण बेदी यांच्या विमानाच्या इंजिनात बिघाड

Last Updated: Sunday, November 13, 2011, 06:13

नागपूर जेटलाईट विमानाचे इमर्जन्सी लॅंडिंग, रांची-मुंबई विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. रांची-मुंबई विमानातील सर्व प्रवासी हे सुखरूप आहेत. विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं.