`तालिबान आयेगा और नरेंद्र मोदी जायेगा`- सिमीची धमकी

Last Updated: Monday, May 19, 2014, 12:13

भारताचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सिमी या दहशतवादी संघटनेच्या निशाणावर आहेत ही गोष्ट पुन्हा समोर आली आहे. `स्टूडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया`च्या म्हणजेच सिमीच्या दहशतवाद्यांना भोपाळच्या कोर्टात हजर करत असतानाच, दहशतवाद्यांनी मोदींच्या विरोधात घोषणा तर दिल्याच, पण मोदींना मारण्याची धमकी देखील दिली.

रहिवासाचा दाखला नाही, तर पास नाही; रेल्वेची सक्ती

Last Updated: Tuesday, April 29, 2014, 22:32

आता नव्यानं रेल्वेचा पास काढणार असाल किंवा जुनाच पास रिन्यू करून घेणार असाल तर तुम्हाला त्यासाठी तुमचा रहिवासी दाखला दाखवावा लागणार आहे.

अलाहाबादमध्ये भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या

Last Updated: Thursday, March 20, 2014, 18:46

उत्तर प्रदेशमधील अलाहाबादमध्ये भारतीय जनता पक्षाच्या युवा नेत्याची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. हत्या झाल्यानंतर संपूर्ण अलाहाबादमध्ये तणाव निर्माण झाल्याचे वृत्त आहे.

`अल्ला... हा शब्द मुस्लिमांसाठी; इतरांनी तो वापरू नये`

Last Updated: Tuesday, October 15, 2013, 16:58

‘अल्ला’ हा शब्द फक्त मुस्लिमांसाठीच आहे इतर धर्मियांना तो वापरता येणार नाही, असा धक्कादायक निकाल मलेशियातील एका कोर्टानं दिलाय. महत्त्वाचं म्हणजे, हा निकाल देणारे कोर्टाचे तीन जजही मुस्लिम धर्मीयच आहेत.

`अल्ला` शब्द मुस्लिमांखेरीज कुणी वापरायचा नाही!

Last Updated: Monday, October 14, 2013, 15:53

‘अल्ला’ हा शब्द मुस्लिमांखेरीज अन्य कुणी वापरू नये, असा निकाल मलेशियामधील न्यायालयाने दिला आहे. २००९ मधील स्थानिक न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार येथील हेराल्ड या ख्रिश्चन वर्तमानपत्राने अल्ला शब्द वापरण्यास परवानगी देण्यात आली होती.

यूपी सरकार दबले, दुर्गाशक्ती नागपाल यांचे निलंबन मागे

Last Updated: Monday, September 9, 2013, 11:14

उत्तर प्रदेशमधील मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे सरकार दबावामुळे अखेर दबले. वाळूमाफियांच्या विरोधात उघडउघड मोहीम उघडणार्‍या महिला आयएएस अधिकारी दुर्गाशक्ती नागपाल यांचे निलंबन उत्तर प्रदेश सरकारला अखेर मागे घ्यावे लागले आहे.

तरुणीला भर चौकात जाळण्याचा प्रयत्न

Last Updated: Tuesday, August 27, 2013, 21:35

उत्तर प्रदेशमध्ये एका तरुणीला भर चौकात जीवंत जाळण्याचा प्रयत्न झाला आहे. या हल्ल्यातून तरुणी बचावली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

दुर्गा निलंबन -केंद्र, राज्य सरकारला नोटीस

Last Updated: Saturday, August 3, 2013, 08:32

उत्तर प्रदेशमधील गौतमबुद्ध नगर जिल्ह्यातील आयएएस अधिकारी दुर्गा शक्ती नागपाल यांच्या निलंबनप्रकरणी हस्तक्षेपास हायकोर्टाचा नकार दिलाय. मात्र, अवैध बांधकामाबाबत काय कारवाई केली, अशी विचारणा अलाहाबाद हायकोर्टानं उत्तर प्रदेश सरकारकडे केली आहे.

`जातीनिहाय रॅली काढाल तर याद राखा`

Last Updated: Thursday, July 11, 2013, 16:01

उत्तरप्रदेशात जातीनिहाय रॅलीज नकोत असा आदेश उच्च न्यायालयाने दिला. जातीनिहाय रॅलीज सुरू आहेत त्या तातडीने थांबवण्यात याव्यात असा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलाय.

गर्दीला दुर्घटनेचा शाप

Last Updated: Monday, February 11, 2013, 23:40

कुंभ मेळ्यासाठी देशविदेशातून लाखो भाविक अलाहाबादमध्ये दाखल झाले. अत्यंत शांततेत हा कुंभमेळा पार पडत असतांनाच एका दुर्घटनेचं त्याला गालबोट लागलं.

रेल्वे ब्रिज ठिकठाक, चेंगराचेंगरीमुळे अपघात - रेल्वेमंत्री

Last Updated: Monday, February 11, 2013, 14:38

अलाहाबाद रेल्वे स्टेशनवरील फुट ओव्हर ब्रिज तुटला नसल्याचा दावा रेल्वेमंत्री पवनकुमार बंन्सल यांनी केलाय. फुटओव्हर ब्रिजची रेलिंगसुद्धा तुटली नसल्याचं रेल्वेमंत्र्याचा दावा आहे. स्टेशनवरील चेंगराचेंगरी तुफान गर्दीमुळं झाल्याचा दावा त्यांनी केलाय.

सोनिया गांधी, नरेंद्र मोदींचा कुंभमेळा दौरा रद्द

Last Updated: Monday, February 11, 2013, 08:30

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीं आणि भाजपचे नेते आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा कुंभमेळा दौरा रद्द करण्यात आलाय.

अलाहाबाद दुर्घटनेत २२ ठार, १० जण जखमी

Last Updated: Monday, February 11, 2013, 07:39

कुंभमेळाव्याला आलेल्या भाविकांवर दुखाचा डोंगर कोसळला. अलाहाबाद रेल्वे स्टेशनवर झालेली गर्दी आणि फलाटाचा कठडा कोसळून झालेल्या अपघातात २२ जण ठार तर १० जण जखमी झालेत. रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

‘A’ फॉर अल्लाह, ‘B’ फॉर बंदूक, पाकची ABCD

Last Updated: Monday, June 25, 2012, 19:16

पाकिस्तानात उच्चशिक्षित दहशतवाद्यांची मोठ्या प्रमाणात पैदास कशी होते, याचे ‘पोलखोल’ लंडनमध्ये डेमोक्रसी फोरमने भरवलेल्या परिषदेत पाकिस्तानातील अणुशास्त्राचे अभ्यासक परवेज हुडभॉय यांनी केले आहे. तिथे मुलांना बालवयातच ‘A’ फॉर ‘अल्लाह’, ‘B’ फॉर ‘बंदूक’, ‘J’ फॉर ‘जिहाद’, ‘T’ फॉर ‘टकराओ’ अशी ABCD शिकवली जाते असे त्यांनी सांगितले.

अलाहबादमध्ये नौकाडुबी, दोन भाविकांना जलसमाधी

Last Updated: Saturday, March 17, 2012, 10:44

अलाहबाद येथे संगमावर भाविकांना वाहून नेत असलेली होडी बुडून महाराष्ट्रातील २ भाविकांचा मृत्यू झाला आहे. संध्याकाळच्या वेळेस या नौकेतून १४ भाविक संगमामध्ये डुबकी घेण्यासाठी निघाले होते. हे सर्व भाविक महाराष्ट्रातील होते.

निवडणुकीच्या रिंगणात चहावाला

Last Updated: Wednesday, February 8, 2012, 10:07

निवडणूक लढवायची असल्यास मोठ्या प्रमाणात पैसा आणि मनुष्यबळ लागते. त्याचसोबत ‘गॉडफादर’चा आशिर्वादही महत्वाचा असतो. नाशिकमध्ये मात्र चहाचा टपरीवाला निवडणुकीच्या रंगणात उतरला आहे.