माजी सहकारमंत्र्यांच्या मुलाचा `प्रताप`!

Last Updated: Thursday, August 22, 2013, 22:52

माजी सहकारमंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यांच्या मुलगा धवलसिंह याच्याविरोधात एकाच कुटुंबातल्या तिघांना जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय़.

मिनी बसने अचानक घेतला पेट

Last Updated: Tuesday, April 16, 2013, 20:58

शिर्डी जवळच्या राहाता इथं आज अचानक एका मिनी बसनं पेट घेतल्यानं मोठा गोंधळ उडाला होता. या बसमध्ये एकही प्रवासी नसल्यानं जीवितहानी टळली.

स्थानिकांनी लावली अनधिकृत झोपडपट्ट्यांना आग

Last Updated: Sunday, January 20, 2013, 16:00

मुलुंडच्या नीलमनगर परिसरातील अनधिकृत झोपडपट्टी जमीनदोस्त करण्यात आल्या. विशेष म्हणजे स्थानिकांबरोबर सर्वपक्षिय पदाधिका-यांनी या कारवाईत उत्स्फूर्तपणे भाग घेतला.

जळीतकांडाप्रकरणी पाच जणांना फाशी

Last Updated: Friday, November 30, 2012, 22:17

सोलापुरातल्या माढा जळीत कांडाप्रकरणी पाच जणांना फाशी सुनावण्यात आली आहे. तर दोघांची निर्दोष मुक्तता झाली आहे. फाशी झालेल्यांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.

गुजरात दंगल १० वर्षांची भळभळती जखम

Last Updated: Tuesday, February 28, 2012, 00:17

गुजरातच्या रक्तरंजित धार्मिक दंगलीला 10 वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र ही भळभळती जखम अजूनही सुकलेली नाही. दंगलीत हजारो निरपराधांची शिरकाण करण्यात आली आणि याच दंगलीचा राजकारणासाठी खुबीनं वापरही करून घेण्यात आला. न्यायाच्या दरबारात सुरु आहे युक्तिवादाची लढाई.

देहू रोड परिसरात जळीतकांड

Last Updated: Tuesday, February 21, 2012, 21:41

पिंपरी चिंचवडच्या पिंपळे सौदागरमध्ये एकीकडे चोरट्यांनी धुमाकूळ घातला असताना देहू रोड परिसर जळीतकांडानं हादरला आहे. या घटनेबाबात पोलीस माहिती देत नसल्यामुळे पोलिसांच्य़ा भूमिकेवर टीका होत आहे.

नाशिकमध्ये मनसे कार्यालय जाळलं

Last Updated: Thursday, February 9, 2012, 10:52

नाशिकमध्ये वाहनांचं जळीतकांड ताजं असतानाचं आता राजकीय पक्षांची उमेदवारांची प्रचार कार्यालयंही टार्गेट होऊ लागली आहेत. नाशिकच्या पवननगर भागात मनसेचं प्रचार कार्यालय जाळण्यात आलं आहे.

पुण्यामध्ये गुंडांचं जळीतकांड

Last Updated: Saturday, January 28, 2012, 17:31

पुण्याच्या धनकवडी परिसरात शुक्रवारी रात्री एक भयानक जळीतकांड घडलं. इथल्या गुलाब नगरमधील 'टॉरटॉईज क्लॉथ्स' नावाच्या दुकानावर १० ते १२ हत्यारबंद गुंडानी हल्ला केला. या गुंडांनी हे दुकान पेट्रोल टाकून पेटवून दिलं.

लातूरमध्ये हॉटेलियरचा गूढ मृत्यू

Last Updated: Monday, December 5, 2011, 03:55

लातूरमध्ये हॉटेल व्यावसायिक विजय मणियार यांचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मात्र, त्यांनी आत्महत्या केली नसून त्यांचा खून झाल्याची शंका वर्तवण्यात येतेय.