गोव्यात तालिबानी प्रकार, चोरीच्या आरोपात मुलांची नग्न धिंड

Last Updated: Monday, June 2, 2014, 12:46

गोव्यातल्या कुडचडे इथं धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. इथल्या दोन मुलांना ‘काब दे रामा’ इथं नेवून (गावाचे नाव आहे ) चोरीच्या संशयावरुन अमानुष मारहाण केल्याच्या घटनेनं परिसरात खळबळ माजलीय. याबाबत स्वयंसेवी संस्थांनी आवाज उठवल्यानंतर पोलिसांनी तक्रार नोंदवत एकाला अटक केलीय, तर अन्य तीन आरोपी फरार आहेत.

श्रीनिवासन यांना सुप्रीम कोर्टाचा दणका

Last Updated: Tuesday, March 25, 2014, 12:20

बीसीसीआय अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना सुप्रीम कोर्टानं चांगलाच दणका दिला आहे. स्पॉट फिक्सिंगप्रकरणाचा नि:पक्षपातीपणे चौकशी होण्यासाठी श्रीनीवासन यांनी राजीनामा देणं गरजेचं आहे. त्यांनी अजून राजीनामा का दिला नाही, असा सवाल करत सुप्रीम कोर्टानं बीसीसीआयला फटकारलं आहे.

मुद्गल अहवालानं आवळला `मयप्पन`चा फास

Last Updated: Monday, February 10, 2014, 20:41

पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाचे माजी मुख्य न्यायाधीश मुकुल मुदगल यांनी आयपीएल स्पॉट फिक्सिंग घोटाळ्याचा अहवाल सादर केलाय.

आणखी एका न्यायमूर्तींवर इंटर्न तरुणीचा लैंगिक शोषणाचा आरोप

Last Updated: Saturday, January 11, 2014, 19:38

सुप्रीम कोर्टाच्या आणखी एका रिटायर्ड जजवर एका इंटर्न तरुणीनं लैंगिक शोषणाचा आरोप केलाय. यावेळी आरोपाच्या घेऱ्यात सापडलेत जस्टिस स्वतंत्र कुमार. दोन वर्षांपूर्वीचे हे प्रकरण असल्याचं सांगण्यात येतंय. ही तरुणी कोलकात्याच्या नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीची विद्यार्थिनी होती.

दबावानंतर न्या. गांगुली यांचा अखेर राजीनामा!

Last Updated: Tuesday, January 7, 2014, 09:25

लॉ इंटर्न तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून अडचणीत आलेले न्यायमूर्ती ए.के. गांगुली यांनी पश्चिम बंगाल मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदाचा अखेर राजीनामा दिलाय.

हत्तीणीच्या भाग्यात न्यायाची `पौर्णिमा` कधी ?

Last Updated: Monday, August 26, 2013, 17:26

पुण्यातली एक हत्तीण गेल्या पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. पुण्यातल्या पौर्णिमा हत्तीणीवर अक्षरशः उपासमारीची पाळी आलीय. या हत्तीणीचा मालक पळून गेल्यानं बेवारस झालेल्या या हत्तीणीला कुणीच वालीच उरला नाही.

पी. सत्यसिवम नवे सरन्यायाधीश

Last Updated: Friday, July 19, 2013, 14:02

भारताचे ४० वे सरन्यायाधीश म्हणून पी. सत्यसिवम यांनी शपथ घेतली. राष्ट्रपतीभवनातल्या दरबार हॉलमध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांना शपथ दिली.

दिल्ली गँगरेप : अल्पवयीन आरोपी दोषी!

Last Updated: Thursday, July 11, 2013, 13:54

दिल्ली गँगरेप प्रकरणात आज पहिला निकाल येण्याची शक्यता आहे. ‘ज्युवेनाईल जस्टीस बोर्डा’कडून हा निर्णय अपेक्षित आहे.

४२ वर्षांनी मिळाला न्याय

Last Updated: Monday, February 4, 2013, 20:08

ट्रकच्या अपघातात पाय गमावावा लागलेल्या एका मूकबधीर मुलाला तब्बल 42 वर्षांनी न्याय मिळाल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. अंबरनाथ जवळ वडोल गावात राहणा-या दिलीप म्हात्रे यांच्या लढ्याची ही कहाणी आहे.

दिल्ली गँगरेप : पाच जणांवर आरोप निश्चित

Last Updated: Saturday, February 2, 2013, 22:11

दिल्लीत चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आलेल्या पाच जणांवर फास्ट ट्रॅक कोर्टाने आरोपांवर शिक्कामोर्तब केलं आहे. त्यामुळे त्यांची शिक्षा आता अटळ झाली आहे.

दिल्ली गँगरेप : सहावा आरोपी ‘अल्पवयीन’च!

Last Updated: Monday, January 28, 2013, 17:03

दिल्ली बस गँगरेप प्रकरणातला सहावा आरोपी अल्पवयीन असल्याचं कोर्टात सिद्ध झालंय. शाळेच्या दाखल्याचा पुरावा ग्राह्य धरून कोर्टानं `त्या` आरोपीला अल्पवयीन मानलंय

बलात्कार दोषींना फाशीच्या शिक्षेची सूचना टाळली; वर्मा समितीचा अहवाल

Last Updated: Thursday, January 24, 2013, 12:45

दोषींच्या शिक्षेत वाढ करून ती २० वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि सामूहिक बलात्कारासाठी आजीवन कारावास अशा शिक्षेचा सूचना या समितीनं केलीय. पण, बलात्कारातील दोषींना फाशीची शिक्षा देण्यावर मात्र या समितीनं टाळाटाळच केलीय.

सरकारकडून मराठवाड्यावर पुन्हा अन्याय

Last Updated: Thursday, January 17, 2013, 19:03

मराठवाडा दुष्काळानं होरपळतोय. मात्र तरीदेखील सरकारकडून मराठवाड्यावर अन्याय होत असल्याचं दिसून येतंय. मराठवाड्यात जनावरांसाठी 11 तर अहमदनगरमध्ये 173 चारा छावण्या आहेत. त्यामुळे सरकारकडून असा दुजाभाव का होतोय? असा प्रश्न शेतक-यांकडून विचारला जातोय.

नयना पुजारीला न्याय मिळणार?

Last Updated: Friday, January 4, 2013, 20:29

दिल्लीतल्या सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर सगळा देश ढवळून निघालाय. असंच एक प्रकरण पुण्यातही घडलं होतं. नयना पुजारी नावाच्या सोफ्टवेअर इंजिनिअर तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिचा निर्घृण खून करण्यात आला होता.

नरेंद्र मोदींना झटका, याचिका फेटाळली

Last Updated: Wednesday, January 2, 2013, 18:07

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना मोठा झटका बसलाय. लोकायुक्त निवडीविरोधात गुजरात सरकारने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.

फेसबुक आले कामी, तिला मिळाला न्याय

Last Updated: Monday, December 17, 2012, 09:25

ठाणे जिल्ह्यातील एका विवाहितेला फेसबुकमुळे न्याय मिळाला आहे. याकामी तिला मदत झाली ती तिच्या मैत्रिणीची. सोशलनेटवर्किंग साईटमुळे तिच्या संसाराचा गाडा रूळावर येण्यास मदत झाली आहे. विवाह होऊनसुद्धा घरच्या मंडळींसमोर झुकून त्यांने पुन्हा विवाह केला आणि तिच्यावर अन्याय झाला.

सरन्यायाधीशपदी अल्तामस कबीर

Last Updated: Saturday, September 29, 2012, 17:09

देशाच्या सरन्यायाधीशपदी अल्तामस कबीर यांनी आज राष्ट्रपती भवनात शपथ ग्रहण केली. न्या. सरोस होमी कपाडिया यांच्याकडून अडीच वर्षानी कबीर यांनी सूत्रे स्वीकारली.

भारतीय खेळाडूवर अन्याय, विकास जिंकूनही हारला

Last Updated: Saturday, August 4, 2012, 10:40

ऑलिम्पिक बॉक्सिंगमध्ये 69 किलो वजनीगटात विकास कृष्णनला जिंकल्यानंतरही पराभूत घोषित करण्यात आलं आहे. विकासनं 13-11 नं अमेरिकन बॉक्सरवर विजय मिळवला होता.

कोर्ट केस जिंकण्यासाठी सोपा उपाय

Last Updated: Friday, June 29, 2012, 21:53

अनेक वर्षांपासून कोर्टात जर एखादी केस चालू असेल, तर ती लवकरात लवकर जिंकण्याचा एक उपाय आहे. जमीन-जुमला, घर यांचे कज्जे खटले ही बऱ्याच घरातील डोकेदुखी ठरत असतात. त्यातून घरातील वातावरण बिघडतं.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची 'हॉस्पिटॅलिटी' !

Last Updated: Saturday, March 24, 2012, 21:43

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयात कायमस्वरुपी नोकरी मिळेल या आशेने कंत्राटी तत्वावर काम करणा-या तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांची प्रशासनानं क्रूर चेष्टा केल्याचं समोर आलंय. कामावर कायमस्वरुपी करण्याऐवजी त्यांना नोकरीवरुनच काढून टाकण्यात आलंय.

'सोनिया गांधींना अमेरिकेतून हाकला'

Last Updated: Saturday, March 3, 2012, 16:37

अमेरिकेत उपचारासाठी गेलेल्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना तात्काळ अमेरिकेतून हाकलण्याची मागणी करण्यात आली आहे. ही मागणी अमेरिकेतील एका शीख संघटनेने अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांच्याकडे केली आहे. याबाबतचे एक निवेदन या संघटनेने हिलरी यांना दिले आहे.