सुरेश जैन यांच्या पतंगानं घेतली भरारी!

Last Updated: Monday, September 2, 2013, 14:38

घरकुळ घोटाळ्यासंदर्भात कारागृहात असलेले सुरेश जैन यांच्या खान्देश विकास आघाडीनं सर्वाधिक ३३ जागांवर विजय मिळवत जळगाव महापालिका निवडणुकीत सरशी मिळवलीय. सत्ता स्थापनेसाठी बहुमताचा आकडा ३६ असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

न्यायालयाचा अवमान केलेला नाही - राज

Last Updated: Tuesday, July 16, 2013, 16:39

मी न्यायालयाचा अवमान होईल असे कोणतेही वक्तव्य केलेले नाही. माझे मत न्यायमूर्तींच्या विरोधात नव्हते, असे प्रतिज्ञापत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उच्च न्यायालयात सादर केले आहे.

शिवसेना उमेदवारावर दिल्लीत हल्ला

Last Updated: Thursday, April 12, 2012, 15:20

दोन दिवसांपूर्वी दिल्लीत भाजपच्या उमेदवाराची हत्या केल्याची घटना असताना आज शिवसेनेच्या उमेदवारावर हल्ला करण्यात आल्याने राजकीय वातावरण तापले आहे. हा हल्ला चार जणांच्या टोळीने केल्याचे सांगण्यात येत आहे.

नागपूर शिवसेनेतला अंतर्गत वाद चव्हाट्यावर

Last Updated: Tuesday, February 28, 2012, 09:57

महापालिका निवडणुकांनंतर नागपूर शिवसेनेतला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. शिवसेना जिल्हाध्यक्ष शेखर सावरबांधे आणि शहराध्यक्ष सूरज गोजे यांच्यात हाणामारी झाली आहे.

सेनेनं मुंबई, ठाणे 'जिंकून दाखवलं'

Last Updated: Saturday, February 18, 2012, 13:18

मुंबई महापालिकेवर गेली १७ वर्षे फडकणारा शिवसेना-भाजप युतीचा भगवा पुन्हा एकदा फडकणार आहे. शिवसेनेच्या करून दाखवलंची टिंगल केली होती. मात्र, सेनेने जे काही करून दाखवलं त्याच्याच जीवावर पुन्हा मुंबई,ठाणे पालिका जिंकून दाखवली.

राजकीय नेते आणि स्टार मतदान बुथवर

Last Updated: Thursday, February 16, 2012, 17:24

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मान्यवर नेते मंडळी आणि स्टार मंडळी मतदान बुथवर आली होती. मुंबईत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे कुटुंबिय तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतदान केले.

बाळासाहेब-राज ठाकरेंनी केलं मतदान

Last Updated: Thursday, February 16, 2012, 13:40

मुंबई महानगरपालिकेसाठी आज सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. शहर आणि उपनगरांमध्ये शांततेत मतदान सुरू आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला. पहिल्या तीन तासांत ११ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

मतदारराजा दिवस तुझाच आहे!

Last Updated: Thursday, February 16, 2012, 13:13

आजचा दिवस आळसात घालवण्याची तुमची कितीही इच्छा असली तरी मतदान चुकवू नका असं आमचं आग्रहाचं सांगणं आहे. कारण आजचा निर्णायक क्षण तुम्ही चुकवलात तर परत पाच वर्षे ही नामी संधी मिळणार नाही हे लक्षात ठेवा. गेल्या पाच वर्षात तुमच्या प्रभागाची वाट ज्यांनी लावली असेल किंवा शहराचा सत्यानाश केला असेल त्यांना धडा शिकवण्याची ही वेळ आहे ती चुकवू नका.

मुंबईत स्टार प्रचारकांची मांदियाळी

Last Updated: Saturday, January 14, 2012, 16:26

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचं नाव पहिल्या नंबरवर असणार आहे. मुंबई भाजपनं मोदींना प्रचारासाठी आमंत्रित करणारं पत्र पाठवलंय. तर दुसरीकडे राष्ट्रवादीने शरद पवार यांनाही मैदानात उतरविण्याचा चंग बांधला आहे. काँग्रेसदेखील राहुल गांधींना प्रचारात उतरवण्याच्या विचारात आहे.

घड्याळाने साधली 'वेळ',आघाडीचा बसला 'मेळ'!

Last Updated: Wednesday, January 11, 2012, 08:21

मुंबई महापालिकेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होण्यासंदर्भात तिढा सुटला. मुख्यमंत्री निवासस्थान असलेल्या वर्षावर जवळपास अडीच तासांच्या बैठकीनंतर आघाडीवर शिक्कामोर्तब झाल्याचं वृत्त आहे.

राजचे मनसैनिक मुंबईत लढवणार सर्व जागा

Last Updated: Tuesday, January 10, 2012, 09:54

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबई महापालिकेच्या सर्व म्हणजे २२७ जागा लढवण्याचे निश्‍चित केल्याची सुत्रांकडून समजते. त्यामुळे आता कोणाला उमेदवार याकडे लक्ष लागले. कारण उमेदवारांची यादी २० जानेवारीला प्रसिध्द होण्याची शक्यता आहे. सर्व जागा मनसे लढवणार असल्याने किती जागा पदरात पडतात आणि सत्ता काबीज करणार का, याचीच चर्चा आहे.

'स्टार बस'चा रखडलेला मुद्दा

Last Updated: Thursday, December 29, 2011, 09:33

नागपूरच्या स्टार बसचा मुद्दा महापालिका निवडणूकीत पुन्हा गाजण्याची चिन्हे आहेत. मात्र समस्येकडं लक्ष देण्याऐवजी राजकीय पक्ष निवव्ळ आरोप प्रत्यारोप करत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे.

आता राज घेणार परीक्षार्थींची मुलाखत

Last Updated: Tuesday, December 20, 2011, 17:00

मनसेकडून नाशिक महापालिका निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची बेचैनी वाढू लागलीये. २६ डिसेंबरपासून स्वतः राज ठाकरे इच्छुकांची मुलाखत घेणार आहेत.

निवडणुकीची धुमशान

Last Updated: Thursday, December 15, 2011, 11:24

राज्यात नगरपालिका निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला आणि विरोधकांनी मरगळ झटकली. कारण वाढती महागाई, अण्णा फॅक्टर यामुळे कॉंग्रेस आघाडी बॅकफूटवर जाणार अस वाटत होतं. पण आता निवडणूक निकालानंतर वेगळं चित्र समोर आलं.