इराक यादवी :अपहृत 40 भारतीयांपैकी एक पळून जाण्यात यशस्वी

Last Updated: Friday, June 20, 2014, 13:02

मीडिया रिपोर्टनं केलेल्या दाव्यानुसार, इराकमध्ये अपहरण करण्यात आलेल्या 40 भारतीयांपैकी एक व्यक्ती दहशतवाद्यांच्या तावडीतून स्वत:ची सोडवणूक करण्यात यशस्वी झालाय.

इराक यादवी : ‘आयएसआयएस’चा इतिहास...

Last Updated: Thursday, June 19, 2014, 13:17

इराकमध्ये सध्या सुरु असलेल्या अशांत परिस्थितीला ‘आयएसआयएस’ ही दहशतवादी संघटना जबाबदार आहे. ISIS नं क्रुरतेमध्ये अन्य दहशतवादी संघटनांना मागं टाकलंय.

इराकमध्ये यादवी स्वरुप, तेलसाठे धोक्यात

Last Updated: Wednesday, June 18, 2014, 08:07

इराकमध्ये सुरू झालेल्या यादवीनं आणखी गंभीर रूप धारण केलंय. इसिस या अतिरेकी संघटनेच्या फौजा राजधानी बगदादच्या जवळ पोहोचल्या आहेत. तेलसाठ्यांवर हल्ले करण्याची शक्यता आहे.

वीज दरवाढीचे संकट, मिनी मॅचेस्टरमधील कोट्यवधीची उलाढाल ठप्प

Last Updated: Friday, November 8, 2013, 23:19

राज्यातल्या यंत्रमागधारकांसमोर वीज दरवाढीचे मोठे संकट उभं राहिलय. वीज वितरण कंपनीकडं अनेकदा मागणी करुनही दरवाढ रद्द करण्यात न आल्याने इचलकरंजी शहरातील संतापलेल्या यंत्रमागधारकांनी गुरुवारपासून पाच दिवसांचा बंद पुकारलाय. त्यामुळं इचलकरंजीतील (मिनी मॅचेस्टर) कोट्यवधीची उलाढाल ठप्प झालीय.

आंध्र प्रदेश अंधारात, तेलंगणविरोधी आंदोलन कायम

Last Updated: Tuesday, October 8, 2013, 12:32

स्वतंत्र राज्य तेलंगण निर्मितीला मंजुरी मिळाल्यानंतर आंध्रमध्ये तीव्र पडसाद उमटले आहेत. जाळपोळ यासारख्या घटनानंतर आता वेगळीच समस्या निर्माण झाली आहे. वीज कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विजयनगरसह अनेक भाग अंधारात बुडाले आहेत. दरम्यान, तेलंगणविरोधकांच्या आंदोलनाची धग आजही कायम आहे.

‘पोळा’ सणावर महागाईचं सावट!

Last Updated: Thursday, September 5, 2013, 10:10

पोळा.. बळीराजासाठी सगळ्यात महत्वाचा सण... यंदा मात्र महागाई आणि अतिवृष्टीमुळं हा सण कसा साजरा करावा असा प्रश्न बळीराजाला पडलाय. शेतकऱ्यांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा, पारंपारिक आणि लोकसंस्कृतीचा वारसा असलेल्या पोळा सणावर यंदा महागाई आणि ओल्या दुष्काळाचं सावट आहे.

भारताने जगाचा भरोसा गमावलाय - रतन टाटा

Last Updated: Thursday, August 29, 2013, 08:58

जागतिक बाजारात भारताची पत पुन्हा सुधारावयाची असेल तर कोणाच्याही दबावाखाली न येता सरकारने आर्थिक धोरणे आहे तशीच राबविली पाहिजेत, असे मत ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनी व्यक्त केले आहे. रूपयाचा होणारे अवमूल्यन आणि घसरलेली पत यावर त्यांनी भारताच्या धोरणावर टीका केली.

परळीत धक्कादायक वास्तव

Last Updated: Thursday, February 21, 2013, 17:08

परळी वीज केंद्राचा पाण्याचा प्रश्न वारंवार उपस्थित होत असताना, दुष्काळ पाण्याचा नव्हे, तर नियोजनाचा असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय.

राजीनामा विषय संपला - शरद पवार

Last Updated: Thursday, September 27, 2012, 14:05

राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्या राजीनामा नाट्याच्यावर आता पडदा पडल्याचे राष्ट्रवादीने स्पष्ट केले आहे. राजीनाम्याचा विषय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी कधीच संपला आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.

दुष्काळ : केंद्राकडून राज्याला मदत - पवार

Last Updated: Saturday, August 4, 2012, 18:43

महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट असल्याने केंद्र सरकारकडून राज्याला सर्वतोपरी मदत दिली जाईल, असे आश्‍वासन आज केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिले. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं पक्ष पातळीवर दुष्काळ परिषदेचं आयोजन केले होते. त्यावेळी ही माहिती पवारांनी दिली.

भारत झाला उदार, युरोपातील देशांना मदत

Last Updated: Wednesday, June 20, 2012, 16:57

भारतावर कर्जाचा डोंगर असला तरी कर्जाच्या सापळ्यात सापडलेल्या १७ युरोपीय देशांच्या मदतीसाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या निधीसाठी भारत १० अब्ज डॉलरची मदत करणार आहे. भारताबरोबरच ब्रिक गटाचे सदस्य असलेल्या पाच देशांनी या निधीसाठी मदत करण्याचा निर्णय मंगळवारी घेतला.

अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी पंतप्रधानांचे प्रयत्न

Last Updated: Thursday, June 7, 2012, 08:27

डबघाईला आलेली अर्थव्यवस्था, रुपयाची घसरण आणि महागाई अशा वातावरणात विकासाला चालना देण्यासाठी सरकारनं पावलं उचलायला सुरुवात केली आहेत. काही महत्त्वाच्या घोषणा पंतप्रधानांनी केल्या आहेत. त्यामध्ये मुंबईत एलिव्हेटेड कॉरिडोअरचाही समावेश आहे.

दूध उत्पादकांचा आंदोलनाचा इशारा

Last Updated: Wednesday, April 18, 2012, 15:25

दूध संकलन करणा-या डेअरींनी कोट्यवधी रुपये बुडवल्याचा आरोप दूध उत्पादक शेतक-यांनी केला आहे. यासंदर्भात ग्वाल गद्दी नामक संघटनेनं २१ एप्रिलपासून आंदोलनाचा इशारा दिला आहे.

सरकारी शाळेतील विद्य़ार्थी नक्षलवादाकडे - रवीशंकर

Last Updated: Wednesday, March 21, 2012, 11:03

सरकारला सरकारी शाळा बंद करण्याची गरज आहे. कारण सरकारी शाळांमधून शिक्षण घेणारे विद्य़र्थी हे नक्सलवाद आणि हिंसेच्या मार्गावर चालत आहेत, असा शोध आर्ट ऑफ लिव्हींगचे प्रणेते श्रीश्री रवीशंकर यांनी लावला आहे.