`फोर्ब्स`च्या यादीत अंबानींचे `अँटिलिया' जगातील महागडे घर

Last Updated: Thursday, May 15, 2014, 15:53

भारतीय उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांचे मुंबईतील `अँटिला` हे गगनचुंबी आलिशान निवासस्थान जगातील सर्वांत महागडे घर ठरले आहे. याबाबत `फोर्ब्स`ने एक यादी प्रसिद्ध केली आहे.

यंदाची निवडणूक सर्वात महागडी, ३३४२६ कोटी खर्च!

Last Updated: Wednesday, May 14, 2014, 11:25

लोकसभा निवडणूक म्हणजे कोट्यवधींची उधळण हे पुन्हा दिसून आलंय. यंदाची निवडणूक तर सर्वांत महागडी ठरली आहे. निवडणुकीसाठी सरकारनं ३४२६ कोटी रुपये खर्च केले, तर विविध राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून ३० हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत. त्यामुळं एकत्रित ३३,४२६ कोटी रुपयांचा चुराडा या निवडणुकीत झाला आहे.

`आम आदमी पक्षा`ची पत्रकार परिषद महागड्या हॉटेलमध्ये!

Last Updated: Tuesday, January 7, 2014, 20:00

आम आदमी पक्षाचा अकोला जिल्ह्यात पहिलाच जाहीर कार्यक्रम होतोय. या कार्यक्रमासंदर्भात आयोजित `आप`ची पत्रकार परिषद शहरातील एका महागड्या हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यामुळं `आम आदमी पक्षा`च्या `खास` पणाची अकोल्यात चांगलीच चर्चा होतेय.

लाखात देखणी महागडी `लेखणी`...

Last Updated: Friday, January 3, 2014, 21:45

लाखात देखणी `लेखणी` म्हणजेच आता पेनही एखाद्या राज्याचे प्रतीक असू शकते हे ‘हेरॉड्स’ या कंपनीने लिमिटेड एडिशन असलेले महागडे आणि तितकेच आकर्षक पेन बाजारात आणले आहे.

गाडी घेताय, १ नंबर हवाय? तर काढा चार लाख रूपये!

Last Updated: Tuesday, December 10, 2013, 23:25

‘कार परवडली, पण नंबर प्लेट नको...’ अशी सध्या अवस्था झालीय. म्हणजे सामान्य माणसाला झेन, आयटेन, मारूती किंवा इको यासारख्या मोटारगाड्या जेवढ्या किंमतीला पडतात, जवळपास तेव्हढीच किंमत आता १ नंबर प्लेटसाठी मोजावी लागतेय. आवडीच्या नंबरसाठी चार-चार लाख रूपये मोजणारे हौशी कलाकार ठाण्यात आहेत.

बॉलिवूडचं सर्वात महागडं गाणं ‘धूम-३’मधील ‘मलंग’!

Last Updated: Sunday, December 8, 2013, 15:54

आपल्या वेगवेगळ्या स्टाईल आणि लूकनं लोकांना आकर्षित करणारा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान याचा आगामी चित्रपट धूम-३मध्येही आमीरनं स्वत:च्या लूकमध्ये अनेक प्रयोग केले आहेत. या चित्रपटातील ‘मलंग’ हे गाण बॉलिवूडमध्ये सर्वात महागडं गाणं म्हणून घोषित करण्यात आलंय. या गाण्याचा खर्च तब्बल ५ कोटी रुपयांच्या घरात गेलाय.

अंड्यांच्या किमतीत मोठी वाढ

Last Updated: Tuesday, December 3, 2013, 20:04

पहिल्यांदा कांदा, त्यानंतर टोमॅटोच्या किंमती वाढल्यानंतर आता अंड्याच्या किंमतीत मोठी वाढ झालीय. संडे असो वा मंडे , रोज खा अंडे, असे म्हणणे आता शक्य नाही. कारण अंडे महाग झाले आहे. एक डझन अंड्यांची किंमत जवळपास ६४ रुपयांच्या घरात गेलीय. आणि ख्रिसमसच्या तोंडावर अंड्याची किंमत जवळपास ७० रुपयांवरही जाण्याची शक्यता आहे.

बटाट्याचे भाव कडाडले, मुंबईकरांचे वडापाव तोंडचे पाणी पळवणार

Last Updated: Wednesday, November 6, 2013, 21:58

कांदा आणि टोमॅटोच्या पाठोपाठ आता बटाटाही ग्राहकांना रडवणार आहे. केंद्र सरकारने काद्याच्या किमान निर्यात दरात भरगोस वाढ केल्याने देशातून होणारी कांदा निर्यात पूर्णपणे ठप्प होणार आहे. एका टनाला ७१४७२ रुपये अशी विक्रमी दर देत कांदा उत्पादक शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. दरम्यान, बटाटा आणखी महाग झाल्यास मुंबईकरांचा आवडता वडापाव आणि बटाटा वडाही तोंडाचे पाणी पळवण्याची शक्यता आहे.

महागाईचा पुन्हा फटका, राजधानी, दुरान्तोचा प्रवास महागला!

Last Updated: Thursday, October 17, 2013, 15:43

राजधानी, दुरान्तो आणि शताब्दी एक्स्प्रेसचा प्रवास आजपासून महागलाय. या ट्रेन्समध्ये कॅटरिंगचे दर दोन टक्क्यांवरुन चार टक्क्यांवर वाढवण्यात आले आहेत. कॅटरिंगमधले हे दर जेवणाच्या मेन्यूमध्ये बदल केल्यामुळं आलाय. या गाड्यांच्या भाड्यामध्ये खाण्याची दरांचाही समावेश असतो.

म्हाडाचे घर झाले विक्रमी महागडे!

Last Updated: Monday, April 22, 2013, 20:01

सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या म्हाडाच्या घरांच्या सोडतीच्या किंमती अखेर ठरल्यायत. यावेळी म्हाडानं घरांच्या किमतीचे सगळे रेकॉर्डस मोडलेत. या घरांच्य किमतीनं सर्वसामान्यांचे डोळे नक्कीच पांढरे होणार आहेत.

महागाईत खाद्य तेलाचा होणार भडका

Last Updated: Tuesday, March 5, 2013, 20:24

कच्च्या खाद्य तेलाच्या आयात शुल्कात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे तेलाच्या किमतीत वाढ होण्याचे संकेत मिळाले आहे.

मुंबई लोकल नवीन रंगात, सेकंड क्लासही महागणार

Last Updated: Tuesday, November 20, 2012, 13:21

मुंबईच्या लाइफलाइनचा रंग आता बदलणार आहे. मुंबईच्या लोकल आता गडद जांभळ्या रंगात मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहेत. सुरुवातीला दोन नवीन लोकल मार्च-एप्रिल २०१३ पर्यंत मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात दाखल होतील. दरम्यान, सेकंड क्लासच्या तिकीट दरात वाढ होण्याची शक्यता आहे.

महागाईचा भडका उडणार!

Last Updated: Thursday, May 17, 2012, 15:06

डॉलरच्या तुलनेत रुपया काल निचांकी पातळीवर घसरल्यामुळे महागाईचा भडका उडण्याचे स्पष्ट संकेत दिसू लागलेत. कच्च्या तेलाची आयात महाग झाल्यामुळे इंधनाचे भाव गगनाला भिडण्याची शक्यताए. याचा फटका काल शेअरबाजारालाही बसला.

सामान्यांना आंबा 'अंबट'!

Last Updated: Saturday, May 5, 2012, 17:12

नैसर्गिक संकटामुळं फळांचा राजा आंबा यंदा सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. नवी मुंबईतल्या एपीएमसी मार्केटमध्ये रोज 30 ते 40 हजार पेट्या येत आहेत. मात्र अजून डझनाला किमान 400 रुपये मोजावे लागतायत. त्यामुळं आंबा खरेदी चैनीचं बनलंय.

महागाईचे चटके, सांगा कसं जगायचं?

Last Updated: Wednesday, April 4, 2012, 23:21

देशभरात महागाईचा वणवा हळूहळू पेट घेत असताना त्यात आता खाद्यतेलाच्या किमतीही वाढत चालल्यायत. खाद्यतेलाच्या भडकत जाणा-या किमती हे नवं सकंट मानल जातय. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाची वाढलेली मागणी, अपुरा पुरवठा आणि त्यातच रुपयाचं घसरतं जाणारं स्थान यामुळे खाद्यतेलाच्या किमती आणखीन भडकणार असल्याचे संकेत मिळत आहेत.