मंत्र्याने दिला महिला पत्रकारावर सामूहिक बलात्काराचा आदेश

Last Updated: Tuesday, April 22, 2014, 13:18

पुरुषी मानसिकतेचा हीन आणि धक्कादायक प्रकार रशियाच्या कनिष्ठ सभागृहात पाहायला मिळाला. रशियाच्या कनिष्ठ सभागृहाचे डेप्युटी स्पीकर ब्लादिमीर जिरिनोवोस्की यांनी भर पत्रकार परिषदेतच एका महिलेला धडा शिकवण्यासाठी तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्याचा आदेश देऊन टाकला.

मोदींच्या नावाने मंदिर उभारले.. `नमो` `नमो`चा गजर सुरूच..

Last Updated: Monday, April 14, 2014, 12:40

राजकारणी, क्रिकेटर्स आणि सिनेमातील कलाकार यांचे चाहते जगभरात दिसून येतील, पण जालंधरमध्ये एक असा व्यक्ती आहे जो भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींचा खूप मोठा चाहता आहे.

पहिली पसंती, राजकीय प्रचार `व्हॉट्सअॅप्स`वर

Last Updated: Tuesday, March 4, 2014, 12:58

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकारणी नेते प्रचारांसाठी वेगवेगळे फंडे वापरताना आपण पाहिलेचं आहेत.

अरविंद केजरीवालांना काँग्रेस, भाजपची कायदेशीर नोटीस

Last Updated: Saturday, February 1, 2014, 17:40

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दोन दिवसांत माफी मागावी नाही तर राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसनं केलीय. केजरीवाल यांनी काल भ्रष्ट नेत्यांची यादी जाहीर केलीय. त्यामध्ये सोनिया गांधी, शरद पवार, नरेंद्र मोदी, नितीन गडकरींह दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. त्यामध्ये काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांचंही नाव आहे.

राजकारणी आणि फोन टॅपिंगचं हत्यार!

Last Updated: Friday, November 22, 2013, 10:02

राजकारणात फोन टॅपिंगचं एक वेगळं महत्व आहे. सत्ताधारी नेहमी विरोधकांच्या चालींना शह देण्यासाठी फोन टॅपिंगच्या माध्यमातनं पाळत ठेवत असते. काही दिवसांपूर्वीच भाजप नेते अमित शहा या प्रकारात चर्चेत आलेत. सध्याच्या निवडणुकीच्या धामधुमीत तर अनेक नेत्यांना आपलं दूरध्वनी संभाषण रेकॉर्ड होत असल्याचा संशय आहे. फोन टॅपिंगची भिती वाटतेय.

भारतातले राज्यकर्ते `मूर्ख` : भारतरत्न प्रो. राव

Last Updated: Monday, November 18, 2013, 10:40

प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि भारतरत्न सी.एन. आर. राव यांनी विज्ञान क्षेत्रासाठी कमी निधी दिला जात असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केलीय. याला जबाबदार असलेल्या राजकीय नेत्यांना त्यांनी ‘मूर्ख’ म्हणून संबोधलंय.

मिळून खाणाऱ्या सर्वपक्षीय नेत्यांवर गुन्हा दाखल

Last Updated: Thursday, October 3, 2013, 10:32

बीडमधली जिल्हा मध्यवर्ती बँक गैरव्यवहार प्रकरणी बीड जिल्ह्यातल्या सर्वपक्षीय नेत्यांविरोधात अखेर गुन्हे दाखल झालेत.

`काश्मीरमधील शांततेसाठी लष्कर देतं मंत्र्यांना लाच!`

Last Updated: Tuesday, September 24, 2013, 19:56

जम्मू-काश्मीरमध्ये शांतता नांदावी यासाठी, स्वातंत्र्य मिळाल्यापासून लष्कराकडून काही मंत्र्यांना पैसे दिले जात असल्याचा गौप्यस्फोट माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह यांनी केलाय. त्यामुळे एकच खळबळ उडालीय...

गणेशोत्सवातून राजकीय हेतू साध्य!

Last Updated: Monday, September 9, 2013, 19:01

यंदाच्या गणेशोत्सावाला विशेष महत्व आहे. कारण २०१४ मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका... राजकीय पक्षांना आपला जनसंपर्क वाढविण्यासाठी गणेशोत्सवासारखी दुसरी चांगली संधी मिळणार नाही. त्यामुळंच सर्वच राजकीय पक्षांचं इच्छुक उमेदवार सध्या सार्वजनिक गणेश मंडळांना भरघोस आर्थिक मदत देतांना दिसतायत.

`राजकारणी सडलेल्या मनोवृत्तीचे असतात!`

Last Updated: Tuesday, July 30, 2013, 17:26

पिंपरी चिंचवड मध्ये महापालिकेचे प्रभारी आरोग्य प्रमुख डॉक्टर अनिल रॉय यांनी खालच्या पातळीवर जाऊन राजकारण्यांवर केलेल्या वक्तव्यामुळे एकच खळबळ माजलीय.

राजकीय नेत्यांना गंडा घालणाऱ्याला अटक

Last Updated: Monday, March 25, 2013, 22:09

गरीब असल्याचं सांगत, आयएएस परिक्षेच्या कोचिंगसाठी आर्थिक मदत उकळणा-या एका मिस्टर नटवरलालला चंद्रपूर पोलिसांनी अटक केली आहे.

ह्या आहेत सगळ्यात आकर्षक राजकारणी महिला...

Last Updated: Thursday, March 14, 2013, 17:08

जगातील सर्वात आकर्षक राजकीय महिलांमध्ये पाकिस्तानच्या परराष्ट्रीय मंत्री हिना रब्बानी-खार यांनी पहिलं स्थान पटकावलं आहे.

नेत्यांना खरोखरच साहित्यसेवेची काळजी आहे?

Last Updated: Friday, January 4, 2013, 15:09

साहित्य संमेलनांमध्ये राजकारण्यांचा वाढता वावर आता अनेकांच्या टीकेचा विषय होऊ लागला आहे... यंदाचं चिपळूण साहित्य संमेलनही त्याला अपवाद असणार नाही.

साहित्य संमेलनावरून राजकारण्यांचा तमाशा

Last Updated: Tuesday, December 11, 2012, 22:06

अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदावरुन निर्माण झालेला राजकीय वाद आता वैयक्तिक पातळीवर पोहचलाय. राष्ट्रवादीचे सरचिटणीस रमेश कदम यांनी भास्कर जाधवांनाही त्यांच्याच शब्दांत उत्तर दिल्यानं हा वाद आणखी पेटण्याची चिन्हे आहेत.

राष्ट्रवादीचे मंत्री जाधव-तटकरे आमने-सामने

Last Updated: Thursday, December 6, 2012, 16:32

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे जवळचे विश्वासू आणि कोकणातील नेते जलसंपदामंत्री सुनील तटकरे आणि नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांच्यातील वाद उफाळून आला आहे. जाधव यांनी तटकरेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय. मात्र, हा प्रयत्न जाधवांनाच अडचणीत आणणारा ठरण्याची शक्यता आहे.

राजकारणी तर जादूगारांसारखेच, ९० कोटी कुठे गेले- राज

Last Updated: Saturday, November 10, 2012, 21:34

राज्यातल्या कथित घोटाळ्यांवर प्रथमच उघड भाष्य करताना राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत मंत्र्यांवर तोंडसुख घेतलं आहे...

पक्षातल्या तरूणांना डावलू नका, नाहीतर- अजितदादा

Last Updated: Saturday, November 10, 2012, 21:18

पक्षातल्या तरुणांना डावलू नका, असा सल्ला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलाय. जळगावमध्ये उत्तर महाराष्ट्रातल्या पक्ष कार्यकर्त्यांचं मार्गदर्शन शिबिर शुक्रवारी झालं.

राजकारण्यांना नक्षलवादी बनून गोळ्या घाला- परेश रावल

Last Updated: Tuesday, November 6, 2012, 12:23

एक दर्जेदार अभिनेता अशी ख्याती मिळवलेले परेश रावल यांच्या सहनशीलतेचा आज अंत झाला. आणि त्यांनी त्यांचा संताप व्यक्त केला.

राजकारणीच विकतायेत साखर कारखाने- अण्णा

Last Updated: Tuesday, May 22, 2012, 19:13

राज्यातील १८ सहकारी साखर कारखाने मोडीत काढून राजकारण्यांनी तेच कारखाने कवडीमोल भावात खरेदी केले असा आरोप करत अण्णा हजारे यांनी सहकारमंत्री हर्षवर्धन पाठील यांच्यावर जळगावात निशाणा साधला.