... आणि ती पुन्हा लिहू लागेल

Last Updated: Saturday, May 10, 2014, 18:56

रेल्वे अपघातात आपले दोन्ही हात गमावलेल्या मोनिका मोरेला आता लवकरच कृत्रिम हात बसवले जाणारेत. जर्मनीवरून पंधरा दिवसांमध्ये हे कृत्रिम हात येणार असून या हातांच्या माध्यमातून मोनिकाला हालचाल करणं शक्य होणार आहे. मोनिका आणि तिचे कुटुंबिय सध्या आनंदात आहेत. कारण लवकरच मोनिकाला कृत्रिम हात बसवले जाणारेत.

मोनिका मोरेला बसवणार कृत्रिम हात

Last Updated: Thursday, March 27, 2014, 20:13

घाटकोपर रेल्वेस्टेशनवर अपघातात दोन्ही हात गमावलेल्या मोनिका मोरेला येत्या पंधरा दिवसांमध्ये कृत्रिम हात बसवण्यात येणार आहेत. त्यासाठीच्या मोनिकाच्या वैद्यकीय चाचण्या केईएममध्ये सुरू आहेत. कृत्रिम हात बसवल्यानंतर मोनिका लिहू शकणार आहे, तसंच टायपिंगही करु शकणार आहे.

बॅटरीवर चालणारं हृदय... मानव अमर होणार?

Last Updated: Tuesday, March 18, 2014, 07:48

एका नव्या शोधामुळे आता, हृदयविकारग्रस्त रुग्णांचं आयुष्यही आणखी पाच वर्षांनी वाढू शकते. हा नवा शोध आहे एका कृत्रिम हृदयाचा...

फ्रान्समध्ये जगातील पहिलं कृत्रिम हृदयरोपण यशस्वी!

Last Updated: Monday, December 23, 2013, 09:20

जगात पहिल्यांदाच फ्रान्समध्ये एका ७५ वर्षीय पुरुषावर यशस्वीपणे कृत्रिम हृदयरोपण शस्त्रक्रिया करण्यात डॉक्टरांना यश आलंय. या शस्त्रक्रियेमुळं या वयोवृद्ध रुग्णाचं आयुष्य पाच वर्षांनी वाढविण्यात डॉक्टरांना यश मिळालं.

कांद्याचे भाव वाढले नाहीत, वाढवले गेलेत!

Last Updated: Tuesday, August 13, 2013, 09:42

नाशिकच्या बाजारपेठांमध्ये कांद्याची कृत्रिम भाव वाढ केली जातेय. गेल्या माहिनाभरापासून कांद्याची आवक स्थिर असताना कांद्याचे भाव तीनशे पटीने वाढले असल्याचा निष्कर्ष केंद्रीय हॉर्टिकल्चर बोर्डाने काढलाय.

कोल्हापुरात खतांची कृत्रिम टंचाई, शेतकरी हवालदील

Last Updated: Saturday, June 15, 2013, 21:55

कोल्हापुरात वरुणराजा बरसण्यास सुरुवात झालीय... शेतीच्या कामांनाही वेग आलाय.. मात्र शेतक-यापुढं उभं राहिलंय मोठं संकट... व्यापा-यांनी खतांची कृत्रिम टंचाई निर्माण केल्यानं बळीराजा अडचणीत सापडलाय..

कृत्रिम किडनीचं वरदान!

Last Updated: Tuesday, April 16, 2013, 10:17

होय, हे सत्य आहे. अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेतच कृत्रिम किडनी तयार केलीय. प्रयोग म्हणून त्यांनी ही किडनी जनावरांमध्येही प्रत्यारोपण करून पाहिली आहे.

कृत्रिम स्तनांमधून कोकेनची तस्करी!

Last Updated: Thursday, December 13, 2012, 19:37

नकली ब्रेस्ट इंप्लांटमधून कोकेन लपवून नेणाऱ्या पनामाच्या एका तरुणीला स्पेनमध्ये पकडण्यात आलं. या तरुणीकडे सुमारे दीड किलो कोकेन सापडलं आहे. याची किंमत साधारण ४२ लाख रुपये एवढी होते.

मुंबई पालिका पाडणार कृत्रिम पाऊस

Last Updated: Thursday, August 16, 2012, 23:30

मुंबईवर पाऊस बरसणार आहे. कारण पालिकेने तसा निर्णय केला आहे. पाणीटंचाईचं संकट दूर करण्यासाठी अखेर मुंबई पालिकेनं कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेत झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

पावसासाठी महापालिका घुसणार ढगात

Last Updated: Tuesday, July 31, 2012, 23:26

मुंबई महापालिकेन कृत्रिम पावसासाठी इस्त्रायल पॅटर्न वापरण्याचा निर्णय घेतलायं. यासाठी पालिकेनं इस्त्रायलमधील मेटऑर कंपनीच्या अधिकाऱ्यांबरोबर व्हीडीओ कॉन्फरन्सिगद्वारे चर्चा करण्याचा निर्णय घेतलाय.

साईभक्तांसाठी कृत्रिम धुकं

Last Updated: Friday, April 20, 2012, 21:22

शिर्डीच्या साईभक्तांना भर उन्हाळ्यातही थंडा थंडा कूल कूल वातावरणाचा अनुभव आता घेता येणार आहे. कारण साईभक्तांच्या दर्शनबारीत कृत्रिम धुके तयार करणारी यंत्रणा बसवण्यात आली आली आहे.