Last Updated: Saturday, March 9, 2013, 13:07
केंद्र सरकार संमतीनं शारिरीक संबंधांचं वय १८ वरून १६वर आणण्याच्या विचारात आहे. म्हणजे मुलगा आणि मुलगी १६ वर्षांपेक्षा जास्त वयाचे असतील, तर त्यांना परस्पर संमतीनं लैंगिक संबंध ठेवता येणार आहेत. सध्या ही वयोमर्यादा १८ वर्षांची आहे. क्रिमिनल कोडमध्ये सुधारणा करून वयोमर्यादा घटवण्याचा सरकारचा विचार आहे आणि त्याला कॅबिनेटची संमती मिळण्याचीही शक्यता आहे.