'प्रक्षुब्ध लिखाणापेक्षा, मन शांत करणारं लिहा'

Last Updated: Thursday, February 2, 2012, 13:16

८५ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वसंत आबाजी डहाके चंद्रपूरात दाखल झाले आहेत. आणि शहरातल्या वेगवेगळ्या साहित्यिक कार्यक्रमांना हजेरी लावली. सध्या नवी पुस्तकं, कथा, कादंबऱ्या हजारोंनी तयार होत आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली प्रक्षुब्ध लिखाण करण्यापेक्षा समाजमन शांत करणारं लिखाण झालं पाहिजे.

संगीतकार अनिल मोहिले यांचे निधन

Last Updated: Wednesday, February 1, 2012, 12:33

ज्येष्ठ संगीतसंयोजक अनिल मोहिले यांचे मुंबईत ७१ व्या वर्षी निधन झाले. व़ध्दापकाळाने राहत्याघरी त्यांचे निधन झाले. अनिल मोहिले आणि अरुण पौडवाल यांच्या जोडीनं संगीतबद्ध केलेली अनेक गीतं आजही आपल्या समरणात आहेत. त्यानंतर अनिलजींनी स्वतंत्रपणे अनेक चित्रपटांना संगीत दिलं आहे. मोहिले यांच्या निधनाने संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

पंतप्रधान कार्यालयाचं 'शुभ्र बिकिनी'त स्वागत !

Last Updated: Wednesday, January 25, 2012, 22:03

पूनम पांडेने आपलं लक्ष आता क्रिकेटवरून राजकारणाकडे वळवलं असावं. टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकल्यावर आपली नग्न छायाचित्रं प्रकाशित करण्याची हूल देणारी पूनम आता पंतप्रधान कार्यालयाचं ट्विटरवर स्वागत करण्यास आपल्या ‘खास’ स्टाईलने सज्ज झाली आहे.

नाट्य संमेलनात उत्साहाची उणीव

Last Updated: Saturday, January 21, 2012, 13:30

सांगलीत बालगंधर्व नाट्यनगरीत ९२ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला सुरुवात चागंली झाली आहे. मात्र, म्हणावी तशी गर्दी झालेली नाही. सुरूवातीला बेळगाव सीमावर्ती भागातील लोकांनी हंगामा केला. त्यामुळे काहीसे वातावरण गरम झाले होते. त्यातच निवडणुकीची आचारसंहिता असल्याने राजकीय नेतेमंडळीनीही या संमेलनाकडे पाठ फिरवलेली दिसून येत आहे. त्यामुळे उत्साहाची उणीव दिसून येत आहे.

काट्यांची असली तरी सुरेल मखमल...

Last Updated: Tuesday, January 17, 2012, 23:53

मराठी गझलप्रेमींसाठी एक खास खबर...सुरेश वाडकर आणि वैशाली माडे यांच्या आवाजात नटलेला 'काट्यांची मखमल' हा नवा अल्बम नुकताच लाँच झाला.

पनवेल आरटीओतर्फे 'कुटुंब रंगलय काव्यात'

Last Updated: Saturday, January 14, 2012, 22:36

पनवेल आरटीओतर्फे 'कुटुंब रंगलय काव्यात' या विसूभाऊ बापट यांच्या काव्यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी रस्ते सुरक्षाविषयक वात्रटिका आणि कविता सादर केल्या.

सुदेश भोसले लाइव्ह इन कॉन्सर्ट

Last Updated: Tuesday, January 10, 2012, 18:51

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या अविष्कार संगीत महोत्सवाचा समारोप प्रसिद्ध गायक सुदेश भोसले लाइव्ह इन कॉन्सर्ट या कार्यक्रमाने करण्यात आला. यावेळ अनेक हिंदी आणि मराठी गाणी सादर करुन सुदेश भोसले यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केलं. रसिकांनीही त्यांच्या गाण्यांना उत्स्फूर्त दाद दिली.

ए. आर. रेहमानच्या शिरपेचात मानाचा तुरा

Last Updated: Tuesday, January 10, 2012, 08:54

प्रसिध्द संगीतकार ए. आर. रेहमानबरोबर जर्मन ऑर्केस्ट्रा कार्यक्रम करणार आहे. त्यामुळे रेहमानच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. जर्मनी फिल्म बेबल्सबर्ग ऑर्केस्ट्रा रेहमानला मानवंदना देणार आहे आणि तिही त्याच्याच गाण्यांनी.

सांगलीमध्ये अविष्कार संगीत महोत्सव

Last Updated: Saturday, January 7, 2012, 19:58

दहाव्या अविष्कार संगीत महोत्सवाला सांगलीतल्या इस्लामपुरमध्ये सुरूवात झाली आहे. ‘साईज झिरो’ अर्थात परफेक्ट फ्युजन या तालवाद्य आणि नृत्याच्या कार्यक्रमानं या महोत्सवाची सुरूवात झाली.

गोयात रंगतली गझलेची सांज..

Last Updated: Tuesday, January 3, 2012, 15:41

गझल प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी. गझल सागर प्रतिष्टान आणि गोवा कला अकादमी यांच्या वतीने गोव्यात १४ आणि १५ जानेवारीला सहावे मराठी गझल संमेलन रंगणार आहे. ज्येष्ठ गझलकार घनश्याम धेंडे हे या संमेलनाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळणार आहे.