Last Updated: Thursday, April 11, 2013, 21:34
माझा महाराष्ट्र बिघतोय, असं आता वाटू लागलेय. इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बेताल वक्तव्य केलं आणि राज्यातील विचारांचा गलका झाला. अजित पवार चुकले. त्यांनी माफी मागण्यास उशीर केला. तोपर्यंत मीडियामुळे अजित पवारांची टगेगिरीची भाषा देशात पोहोचली. चहुबाजुनी टीका होऊ लागली. टीका करणे योग्य आहे. मात्र, टीकाही बेताल व्यक्तव्याच्या भाषेतच होऊ लागली. त्याचवेळी राजकीय नेत्यांच्या अकल्लेचे तारे समस्त जनतेला कळले. राजकारणात मुरलेले नेते बरळतायेत असंच चित्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. हे भक्कम असलेल्या लोकशाहीला घातक आहे.