आहनाच्या लग्नात सहभागी झाले नरेंद्र मोदी

आहनाच्या लग्नात सहभागी झाले नरेंद्र मोदी

Last Updated: Tuesday, February 4, 2014, 13:35

अभिनेता धर्मेंद्र आणि `ड्रीमगर्ल` हेमा मालिनी यांची दुसरी मुलगी आहना देओलचा रविवारी शाही थाटात विवाह संपन्न झाला. आहनाचं लग्न वैभव व्होरा याच्यासोबत झाला. या लग्नाला अवघं बॉलिवूड, राजकीय नेते आणि बिझनेस जगतातील मोठमोठे दिग्गज उपस्थित होते. या विवाहसोहळ्याला भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे सुद्धा सहभागी होते.

राष्ट्रपती भवनासमोर महिलेचा निर्वस्त्र होण्याचा प्रयत्न

राष्ट्रपती भवनासमोर महिलेचा निर्वस्त्र होण्याचा प्रयत्न

Last Updated: Monday, February 3, 2014, 16:40

दिल्लीत राष्ट्रपती भवनासमोर भर दिवसा चौकात एक पुरूष आणि एका महिलेने निर्वस्त्र होण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान कार्यालयातही घुसण्याचा या महिला आणि पुरूषाने प्रयत्न केला.

किरण बेदी यांचा अरविंद केजरीवाल यांना टोला

किरण बेदी यांचा अरविंद केजरीवाल यांना टोला

Last Updated: Monday, February 3, 2014, 12:34

देशाचे पंतप्रधानपद हे प्रयोगशीलतेसाठी आणि नवशिक्यांसाठी नसून उत्तम प्रशासक असलेल्या व्यक्तीसाठी आहे, असा टोला किरण बेदी यांनी अरविंद केजरीवाल यांना नाव न घेता लगावला आहे.

राष्ट्रावादीचा निर्वाणीचा इशारा, काँग्रेसची धावाधाव सुरू

Last Updated: Monday, February 3, 2014, 10:51

राष्ट्रावादीनं जागावाटपासंदर्भात निर्वाणीचा इशारा दिल्यानंतर काँग्रेसची धावाधाव सुरू झालीय. याचपार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीबाबत काँग्रेसची स्क्रीनिंग कमिटीची पहिली बैठक दिल्लीत झाली.

हरियाणात मुख्यमंत्र्यांना तरुणाने थोबडले

हरियाणात मुख्यमंत्र्यांना तरुणाने थोबडले

Last Updated: Sunday, February 2, 2014, 23:18

एका तरुणानं भर गर्दीत हरियाणाचे मुख्यमंत्री भूपेंद्रसिंग हुडा यांच्या कानशिलात लगावली. पानिपत इथं विविध उद्घाटन कार्यक्रमांसाठी हुडा आले होते. त्यावेळी एका ओपन जिपमधून ते जनतेला अभिवादन करत जात होते. त्याच वेळी कमल मुखिजा नावाचा एक युवक सुरक्षाचक्र भेदून त्यांच्याजवळ आला आणि त्यानं हुडा यांच्या श्रीमुखात भडकवली.

गुजरात दंगल मुक्त, नरेंद्र मोदींची घोषणा

गुजरात दंगल मुक्त, नरेंद्र मोदींची घोषणा

Last Updated: Sunday, February 2, 2014, 16:45

गुजरात राज्य दंगामुक्त झाल्याचा दावा, गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी केला आहे. गुजरातमध्ये दहावर्षांपूर्वी प्रत्येक दिवशी दंगा होत होता. मात्र आता गुजरातमधील लोक मिळून मिसळून रहायला लागले आहेत.

काँग्रेस सर्वात जास्त विषारी - नरेंद्र मोदी

काँग्रेस सर्वात जास्त विषारी - नरेंद्र मोदी

Last Updated: Sunday, February 2, 2014, 16:22

काँग्रेस पक्ष सर्वात जास्त विषारी असल्याची टीका नरेंद्र मोदी यांनी केली आहे. सोनिया गांधी यांनी यापूर्वी काही लोक विषाची शेती करतात अशी टीका केली होती. या टीकेला नरेंद्र मोदी यांनी आज मेरठच्या सभेत उत्तर दिलं आहे.

मोदींच्या उपस्थित सत्यपालसिंह आज `खाकी`तून `खादी`त

मोदींच्या उपस्थित सत्यपालसिंह आज `खाकी`तून `खादी`त

Last Updated: Sunday, February 2, 2014, 15:49

मेरठमध्ये आज भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. या सभेतील प्रमुख आकर्षण म्हणजे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त सत्यपाल सिंह आज मोदींच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

विषाची शेती करणाऱ्यांना सत्ता देऊ नका - सोनिया

विषाची शेती करणाऱ्यांना सत्ता देऊ नका - सोनिया

Last Updated: Saturday, February 1, 2014, 23:05

विषाची शेती करणाऱ्या आणि विभाजनाचं राजकारण करणाऱ्यांच्या हाती सत्ता देऊ नका, असं आवाहन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी केलंय. कर्नाटकमधल्या गुलबर्ग्यात झालेल्या रॅलीमध्ये त्या बोलत होत्या. नरेंद्र मोदींचं नाव न घेता त्यांनी मोदींवर आणि भाजपवर कडाडून टीका केली.

डिझेल ५० पैशांनी महागले, सिलिंडर १०७ रूपयांनी स्वस्त

Last Updated: Sunday, February 2, 2014, 11:17

लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लोकांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेस सरकारने पावले उचलण्यास सुरूवात केलेय. अनुदानित सिलिंडरची संख्या ९ वरून १२केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी केंद्र सरकारकडून विनाअनुदानित सिलिंडरच्या किमतीत १०७ रुपयांनी कपात करण्यात आली. तर दुसरीकडे डिझेलमध्ये ५० पैशांनी वाढ करण्यात आलेय.