शरद पवारांचा `यू टर्न`!

शरद पवारांचा `यू टर्न`!

Last Updated: Sunday, September 15, 2013, 20:38

अतिवृष्टीग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले पॅकेज अद्याप मिळालेलं नाही या प्रश्नाच्या उत्तरात पवारांनी मुख्यमंत्र्यांवर पूर्ण विश्वास व्यक्त केलाय.. शिवाय मुख्यमंत्री जे वक्तव्य करतात त्यावर ते विलंब झाला तरी अंमलबजावणी करतात असं पवारांनी म्हटलंय. ते यवतमाळमध्ये बोलत होते.

मानलेल्या मावशीने दिली दोघांना फाशी

Last Updated: Saturday, September 14, 2013, 19:17

मावशी म्हणजे आई प्रमाणेच मुलांवर प्रेम करणारी दुसरी आई असते. पण आपल्या बहिणींच्या मुलांना फाशी देण्याची घटना बल्लारपूर येथील शांतीनगर जाकीर हुसेन वॉर्डात घडली.

विदर्भवासियांची सरकारदरबारी पुन्हा थट्टाच!

विदर्भवासियांची सरकारदरबारी पुन्हा थट्टाच!

Last Updated: Thursday, September 12, 2013, 21:35

अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या विदर्भवासियांची सरकारनं पुन्हा एकदा थट्टा सुरू केली आहे. दहा वर्षांपूर्वीच्या पीडितांना मदत देण्याचं सोडून, सरकारनं नुकसाग्रस्तांचा आढावा घेण्यासाठी पथक पाठवलंय. खुद्द मुख्यमंत्र्यांनीच याची कबुली दिलीय.

एक बाप्पा... ३०० वर्षांपासून पाहतोय भक्तांची वाट!

एक बाप्पा... ३०० वर्षांपासून पाहतोय भक्तांची वाट!

Last Updated: Thursday, September 12, 2013, 16:21

चंद्रपूर शहरात एक गणपती ३०० वर्षांपासून भक्तांची वाट पाहतोय. ऐकून चक्रावलात ना? पण, हे खरं आहे.... हे वृत्त म्हणजे केवळ बातमी नसून धक्कादायक वास्तव आहे.

१७ वर्षांच्या शेजाऱ्याने केला ७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार!

Last Updated: Wednesday, September 11, 2013, 19:00

दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातल्या आरोपींना काय शिक्षा होणार याकडे सध्या सगळ्या देशाचं लक्ष लागलंय. त्याचवेळी नागुपरातही बलात्काराची एक घटना उघडकीस आलीय. या प्रकरणातली अत्याचारीत मुलगी केवळ 7 वर्षांची असून आरोपी 17 वर्षांचा आहे.

वर्धा जिल्ह्यात डेंग्यूची साथ,५२ जणांना लागण!

Last Updated: Wednesday, September 11, 2013, 13:07

ऐन सणात वर्ध्यात डेंग्यूच्या साथीनं डोकं वर काढलंय. जिल्ह्यात तापानं दोन मुलांचा बळी घेतला तर आतापर्यंत २६१ जणांच्या केलेल्या रक्त तपासणीत ५४ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचं उघड झालंय. यातील सात रुग्ण जे जिल्ह्याबाहेरील असल्याची महिती आहे.

शिवाजीराव मोघेंचा आघाडीला घरचा आहेर!

Last Updated: Tuesday, September 10, 2013, 19:48

सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तोडून स्वतंत्रपणे स्वबळावर निवडणूक लढण्याची मागणी करत, आघाडी सरकारला घरचा आहेर दिलाय. ते रामटेक लोकसभा क्षेत्राच्या केंद्रस्तरीय मतदार अभिकर्ता यांच्या मेळाव्यात बोलत होते.

लस समजून पाजलं अॅसिड, चिमुरडे भाजले

Last Updated: Sunday, September 8, 2013, 16:45

ई-जीवनसत्त्वाऐवजी हलगर्जीनं अॅसिटिक अॅसिडचे थेंब पाजल्यानं दोन बालकांच्या तोंडासह पोटातील भागही भाजल्याची संतापजनक घटना तिरोडा तालुक्यात घडली. इथल्या शेलोटपार गावी आयोजित आरोग्य शिबिरात हा धक्कादायक प्रकार घडला. दोन्ही बालकांवर नागपूर इथल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुलीसह आईची विहिरीत उडी घेवून आत्महत्या

Last Updated: Sunday, September 8, 2013, 15:25

वर्धा इथल्या मानस मंदिर परिसरात राहणाऱ्या एका शिक्षिकेनं आपल्या चार महिन्यांच्या चिमुकलीसह आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आलीय. आपल्याच घराच्या मागील विहिरीत या मायलेकींचा मृतदेह आढळल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

‘पोळा’ सणावर महागाईचं सावट!

‘पोळा’ सणावर महागाईचं सावट!

Last Updated: Thursday, September 5, 2013, 10:10

पोळा.. बळीराजासाठी सगळ्यात महत्वाचा सण... यंदा मात्र महागाई आणि अतिवृष्टीमुळं हा सण कसा साजरा करावा असा प्रश्न बळीराजाला पडलाय. शेतकऱ्यांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा, पारंपारिक आणि लोकसंस्कृतीचा वारसा असलेल्या पोळा सणावर यंदा महागाई आणि ओल्या दुष्काळाचं सावट आहे.