Last Updated: Wednesday, September 4, 2013, 22:08
भोंदुबाबाच्या उपचारामुळे नागपुरात एक महिलेचा कॅन्सर बळावल्याचा प्रकार `झी मीडिया`नं नुकताच उघडकीस आणलाय. आता त्यापाठोपाठ नागपुरात आणखी एका भोंदूबाबानं एका युवतीला 81 हजार रुपयांची फसवणूक केल्याचं समोर आलंय.
Last Updated: Wednesday, September 4, 2013, 14:36
चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा शहरात शेकडो गुंतवणूकदारांना बंटी-बबलीने फसविले आहे. `मनी मंत्र` नावाची एक शेअर गुंतवणूक करणारी कंपनी स्थापून या कंपनीने सुमारे ९० कोटी रुपयांचा गंडा घातला आहे.
Last Updated: Wednesday, September 4, 2013, 10:22
मुंबई आणि दिल्लीसह नागपूर सारख्या शहरात महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढताहेत. पीडितांमध्ये शाळांमधल्या विद्यार्थिनींचं प्रमाण अधिक आहे. मात्र या प्रकारांना आळा घालण्यासाठी नागपूर पोलिसांनी एक कौतुकास्पद युक्ती लढवलीय.
Last Updated: Wednesday, September 4, 2013, 10:28
चंद्रपूर मनपामध्ये सध्या सावळा गोंधळ सुरू असल्याचं चित्र आहे. चंद्रपूर मनपात सध्या काँग्रेसच्या महापौर आणि स्थायी समिती सभापती यांच्यात चांगलचं शितयुध्द सुरू आहे. याबाबत नोटीसच स्थायी समिती सभापतींनी काढलेय.
Last Updated: Monday, September 2, 2013, 12:38
जळगाव महापालिकेच्या ७५ जागांसाठी मतमोजणी सुरू झालीय. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, मनसे, तसंच खान्देश विकास आघाडीने यासाठी राजकीय प्रतिष्ठा पणाला लावलीय.
Last Updated: Sunday, September 1, 2013, 20:19
सतत कोसळणाऱ्या पावसाने गणेश मूर्तीच्या निर्मितीला अडथळे येत असल्याने नागपूरच्या मुर्तीकारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
Last Updated: Thursday, August 29, 2013, 11:35
महिलांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होतेय. घरगुती हिंसांचं प्रमाणही पुरोगामी महाराष्ट्रात वाढतंय. नुकतीच पहिला विवाह झाला असताना, दुसरीसोबत जबरदस्तीनं दुसरा विवाह करुन एका महिलेला तीन वर्ष घरात डांबून ठेवलं असल्याची घटना उघड झाली. अखेर पहिल्या पत्नीच्या मदतीनं त्या नराधमाच्या तावडीतून महिलेची सुटका करण्यात आली आणि आरोपीला अटक झाली.
Last Updated: Wednesday, August 28, 2013, 20:43
राजस्थानच्या जोधपूर येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोपात अडकलेल्या आसाराम बापूंच्या नागपुरातील आश्रमात आज अज्ञात युवकांनी दगडफेक करत तोडफोड केली.
Last Updated: Tuesday, August 27, 2013, 11:09
पुण्यातील चिल्लर पार्टीनंतर आता नागपुरात मदमस्त पार्टीत अल्पवयीन उच्चभ्रू मुली सहभागी झाल्याचे पुढे आले आहे. या मुली नशेत तर्र झाल्याने पोलीसही चक्रावलेत. पोलिसांनी मद्यधुंद अवस्थेतील १८ तरुणी आणि २५ तरुणांना ताब्यात घेतले आहे.
Last Updated: Tuesday, August 27, 2013, 10:17
खड्डे चुकवण्याचा प्रयत्न करताना पाठिमागून येणारा ट्रककडे तिचं दुर्लक्ष झालं आणि १७ वर्षीय शितल खंडाळकर या पळासखेड गावातल्या विद्यार्थिनीला आपले प्राण गमवावे लागलेत.
आणखी >>