पुन्हा झुरळांनी थांबविली रेल्वे!

Last Updated: Sunday, August 25, 2013, 08:33

रेल्वेनं प्रवास करतांना आपल्या सीटवर झुरळ आढळलं तर... नेहमीच्या प्रवासात झुरळांचं राज्य अनेक एक्स्प्रेस गाड्यांवर पाहायला मिळतं. असाच काहीसा अनुभव मुंबई-नागपूर दुरांतो एक्स्प्रेसच्या प्रवाशांना आला. झुरळांच्या हल्ल्यानं त्रस्त झालेल्या प्रवाशांना त्यांच्यापासून मुक्ती तर मिळाली नाहीच, पण त्यामुळं गाडी मात्र रोखली गेली.

वाळू माफियांने केली सरपंचांची हत्या

Last Updated: Saturday, August 24, 2013, 11:01

भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील मोहगाव देवी येथील सरपंचावर वाळू माफियाने जेवणाचे निमंत्रण देऊन विषप्रयोग करून त्यांची हत्या केली. या घटनेनंतर मोहगाव येथे तणाव निर्माण झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून गावात पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे.

सोळा वर्षीय तरुणीचा अंधश्रद्धेतून बळी

Last Updated: Wednesday, August 21, 2013, 23:22

अंधश्रद्धा निर्मुलनासाठी आयुष्यभर लढा देणा-या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनं सारा महाराष्ट्र सुन्न झालाय. त्याचवेळी नागपुरात एका सोळा वर्षांच्या तरुणीचा अंधश्रद्धेमुळं बळी गेलाय. कोणालाही संताप येईल अशी ही घटना.

पतीसमोर गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार!

Last Updated: Tuesday, August 20, 2013, 19:58

नागपूरच्या छोटा गोंदिया नामक भागात २० वर्षीय गर्भवती तरुणीवर तिच्या पतीसमक्ष सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. या गुन्ह्याबद्दल चारजणांना पोलिसांनी अटक केली आहे.

महसूल कर्मचाऱ्यांचा संप, सामान्यांचे हाल

Last Updated: Monday, August 19, 2013, 23:58

राज्यभरातले 70 टक्क्यांपेक्षा जास्त महसूल कर्मचा-यांनी आपल्या 24 प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारलाय. या संपामुळे पेन्शन, उत्पनाचा दाखलाकरता येणा-या सामान्य नागरिकांना मोठे हाल सहन करावे लागतायत.

पाणीपुरी की `गलिच्छ पुरी`!

Last Updated: Sunday, August 18, 2013, 19:01

पाणी पुरी म्हटलं कि प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं. मात्र बुलढाणा शहरात पाणीपुरीबाबत एक किळसवाणा प्रकार उघडकीस आलाय.

`मंत्रालयात बसलेले नक्षलवादी अधिक धोकादायक!`

Last Updated: Sunday, August 18, 2013, 17:41

वेगळा विदर्भ दिल्यास त्यावर नक्षलवाद्यांचा प्रभाव राहील ही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेली भिती निरर्थक असल्याचं आमदार बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

वाल्याचा झाला वाल्मिकी

Last Updated: Friday, August 16, 2013, 21:32

वाल्याचा वाल्मिकी झाल्याचं तुम्ही आता पर्यंत धार्मिक ग्रंथातून ऐकलं असेल....पण आजच्या काळातही ते अशक्य नसल्याचं इंदूरच्या श्री सदगुरु दत्त धार्मिक आणि पारमार्थिक ट्रस्टने दाखवून दिलंय...वाल्याचा वाल्मिकी झाल्याची अशीच एक कहाणी...

चंद्रपुरात पावसाचा पुन्हा धुमाकूळ

Last Updated: Friday, August 16, 2013, 12:31

आठवडाभर विश्रांती घेतलेल्या पावसानं चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा धुमाकूळ सुरु केलाय. मध्यरात्रीपासून विजांच्या कडकडाटासह कोसळत असलेल्या पावसानं जिल्ह्याला झोडपून काढलं आहे.

निवृत्तीनंतर आता लढा सन्मानासाठी...

Last Updated: Thursday, August 15, 2013, 16:28

आयुष्याची उमेदीची वर्ष सैन्यात देशसेवेसाठी खर्च केलेल्या जवानांना निवृत्तीनंतर हालाखीत जगावं लागतंय. अपुरं पेंशन, रोजगाराच्या कमी होत चाललेल्या संधी यामुळं त्यांच्या अडचणीत भर पडलीय. सरकारप्रमाणं समाजानंही आम्हाला सन्मान द्यावा अशी मागणी हे सैनिक करत आहेत.