‘नवऱ्यांनो शौचालयं बांधून द्या, नाहीतर उपाशी राहा!’

Last Updated: Tuesday, October 9, 2012, 21:19

‘नवऱ्यांनो शौचालय बांधून द्या, नाहीतर उपाशी राहा’ असा इशारा दिलाय बुलढाण्यातल्या दिवठाना गावातल्या महिलांनी... महिलांनी ग्रामसभेत यासंदर्भातला ठराव पारीत केला. यामागणीचा विचार होईल आणि लवकरच हे गाव हगणदारीमुक्त होईल अशी आशा गावातल्या महिलांना आहे.

टार्गेट पूर्ण करण्यासाठी केली तरुणाला फसवून नसबंदी

Last Updated: Monday, October 8, 2012, 16:32

आपले वर्षाचे टार्गेट पूर्ण करण्याकरिता चाकरमानी वेगवेगळी शक्कल लढवतात. मात्र एक परिचारिका कुठल्या स्तराला जाऊ शकते याचा धक्कादायक प्रकार पाहायला मिळालाय. देवरी तालुक्यातील भानोडी प्राथमिक आरोग्य केंद्रात खोटी माहिती अर्जात भरून एका तरुणाची कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

ठाकरे कुटुंब उत्तर भारतीयच - निरुपम

Last Updated: Monday, October 8, 2012, 07:30

नागपूरला उत्तर भारतीय मेळाव्यात काँग्रेस खासदार यांनी पुन्हा ठाकरे घराण्यावर टीकेची झोड उठवली. ठाकरे कुटुंब उत्तर भारतातूनच आलं आहे, त्यामुळे त्यांनी उत्तर भारतीयांना सल्ला देऊ नये, असं वक्तव्य खासदार संजय निरुपम यांनी केलंय.

व्यापा-याची भरदिवसा गोळ्या मारून हत्या

Last Updated: Saturday, October 6, 2012, 17:34

नागपूरच्या मानेवाडा रोड वरी एका सराफा व्यापा-याची भरदिवसा गोळ्या मारून हत्या करण्यात आली. यामुळे परिसरात घबराट पसरली आहे.

सिंचन घोटाळा; अविनाश भोसले पुन्हा वादात

Last Updated: Wednesday, October 3, 2012, 09:36

गोंदिया जिल्ह्यातील धापेवाडा उपसा सिंचन योजनेत घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येतोय. त्यामुळे अविनाश भोसले पुन्हा एकदा चर्चेत आलेत.

आनंदवन ‘गॅस’वर...

Last Updated: Wednesday, October 3, 2012, 08:53

एका कुटुंबाला एका वर्षात फक्त सहा सिलिंडरवर अनुदान देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं नुकताच घेतलाय. या निर्णयामुळं एकत्र राहणाऱ्या कुटुंबांचं कंबरडचं मोडलंय. याचा फटका जसा सामान्य माणसाला बसलाय तसाच आनंदवनसारख्या सामाजिक प्रकल्पांनाही बसलाय.

बापूंच्या आठवणी जपणार कोण?

Last Updated: Tuesday, October 2, 2012, 11:39

आज गांधी जयंती... देशभरात गांधी जयंतीच्या निमित्तानं महात्मा गांधींना वंदन करण्यात येतंय. मात्र, वर्ध्यातला महात्मा गांधींचा सेवाग्राम आश्रम वेगळ्या कारणांमुळं चर्चेत आलाय.

बसला भीषण अपघात, १९ जण ठार तर १७ जखमी

Last Updated: Wednesday, September 26, 2012, 23:48

बुलडाण्यातल्या संग्रामपूर तालुक्यात पार्थुडा-शेगाव ही एसटी बस खिरोडा इथल्या पूर्णा नदीच्या पुलावरुन कोसळून झालेल्या भीषण अपघातात १९ जण ठार झालेत तर १७ प्रवासी जखमी झालेत. जखमींवर अकोला रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

कोळसा घोटाळ्याचं नागपूर कनेक्शन

Last Updated: Sunday, September 23, 2012, 08:06

कोळसा खाण घोटाळ्याचं नागपूर कनेक्शन पुन्हा एकदा समोर आलंय. कोळसा खाण घोटाळ्याच्या चौकशी प्रकरणी सीबीआयन आता धाडसत्र हाती घेतलंय. त्यात नागपूरात चार ठिकाणी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकलेत.

पत्नीचा अश्लील MMS बनवणाऱ्या पतीस अटक

Last Updated: Saturday, September 22, 2012, 14:19

आपल्या पत्नीचा अश्लील MMS तयार करून तिला ब्लेकमेल करणाऱ्या एका अधिकाऱ्याला नागपूर पोलिसांनी अटक केलीय. निशांत कल्लूलाथिल असं या आरोपीचं नाव आहे.