तुमचा गुरखाच करतोय `चोरी`, वाढली त्यांची `मुजोरी`

Last Updated: Friday, September 21, 2012, 20:06

ज्यांच्या भरोशावर पूर्ण घराच्या आणि परिसराच्या सुरक्षेची जवाबदारी सोपवून आपण निर्धास्त असतो अशा गुरखांनीच घरफोडी करण्याची घटना नागपुरात उघडकीस आली आहे.

अन् इथेही ढोल-लेझीमचा आवाज घुमला...

Last Updated: Friday, September 21, 2012, 19:42

नागपूरकर बाप्पाच्या सरबराईत कधीच काहीही कमी पडू देत नाहीत. पण इथल्या उत्सवात कायमच एक उणीव भासलीये ती म्हणजे पारंपारिक ढोल-ताशांच्या पथकाची.

ज्योतीकुमारीच्या बलात्काऱी खून्यांना फाशीच

Last Updated: Monday, September 17, 2012, 21:14

ज्योतीकुमारी चौधरीच्या बलात्कार आणि खून प्रकरणातल्या दोन आरोपींची फाशीची शिक्षा हायकोर्टानं कायम ठेवली आहे. या प्रकरणात कॅब ड्रायव्हर पुरुषोत्तम बोराडे आणि त्याचा मित्र प्रदीप कोकाडे यांना हायकोर्टानं दोषी ठरवलंय. बलात्कार आणि खून याप्रकरणी दोन्ही आरोपींना पुणे सत्र न्यायालयानं याआधीच दुहेरी फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याविरोधात आरोपींनी हायकोर्टात दाद मागितली होती.

नगरसेवकांची अकोला महापालिकेत तोडफोड

Last Updated: Monday, September 17, 2012, 20:37

वाहन घोटाळ्याच्या चौकशीची मागणी करत अकोला महानगरपालिकेत शिवसेना भाजपच्या नगरसेवकांनी जोरदार तोडफोड केलीय. वाहन बिल घोटाळ्यातील दोषींवरील कारवाईसाठी विरोधक आक्रमक झालेत. या प्रकरणावर बोलण्यास सत्ताधारी तयार नसल्यानं घोटाळ्याच्या शंकेला नक्कीच वाव मिळतोय.

सुदर्शन यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार

Last Updated: Sunday, September 16, 2012, 10:32

माजी सरसंघचालक के. एस. सुदर्शन यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. काल त्यांतं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. छत्तीसगडमधील रायपूरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

नागपूरमध्ये दुषित पाणीपुरवठा

Last Updated: Thursday, September 13, 2012, 18:05

जलवाहिन्या जुन्या आणि खराब झाल्यानं नागपुरातील काही वस्त्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने दुषित पाणी पुरवठा होतोय. शहरातील गळणाऱ्या जलवाहिन्यांमधून नागरिकांना फक्त गढूळ पाणीच नव्हे तर किडे देखील मिळत आहेत.

महाराष्ट्रात घुमणार `परप्रांतियां`च्या डरकाळ्या

Last Updated: Wednesday, September 12, 2012, 17:58

एके काळी १०,००० चित्ते असलेल्या भारतात मात्र स्वातंत्रोत्तर काळात हा प्राणी पूर्णपणे नामशेष झाला. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या शिकारीमुळे आज देशात एकही चित्ता उरला नाही. पण खाद्य शृंखलेत अतिशय महत्वाची भूमिका बजावणारा हा प्राणी आता देशात परत येतो आहे. नागपूरच्या एका महिलेच्या प्रयत्नांमुळे हे शक्य होणार आहे. दक्षिण आफ्रिका आणि नामिबिया देशातून आता भारतात चक्क चित्ते आयात होणार आहेत. आणि तेही कायम स्वरूपी वास्तव्याकरता.

अमरावतीत विषाणुजन्य आजाराचा कहर

Last Updated: Monday, September 10, 2012, 19:51

अमरावती जिल्ह्यातल्या वरुड तालुक्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही विषाणुजन्य आजारानं कहर केलाय. वेगवेगळ्या आजारानं मागील अडीच महिन्यात सतरा जणांचा मृत्यू झालाय. तर अद्याप शेकडो नागरिक खासगी आणि सरकारी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

शिक्षकांनीच केला अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार

Last Updated: Thursday, September 6, 2012, 12:37

शिक्षक दिनाच्या दिवशीच विद्यार्थी- शिक्षक या नात्याला काळीमा फासणारं कृत्य गडचिरोलीत समोर आलं आहे. शाळा दोन शिक्षकांनी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

विदर्भात पावसाचे २० बळी

Last Updated: Thursday, September 6, 2012, 10:43

विदर्भात गेल्या दोन दिवसांपासून पावसानं थैमान घातलंय. पावसामुळं २० जणांचा बळी गेलाय. विदर्भातल्या बहुतांश नद्यांना पूर आला असून अनेक धरणं भरून वाहू लागली आहेत.