रक्तदात्यांची नोंद वेबसाईटवर

Last Updated: Sunday, July 29, 2012, 23:54

मित्राला वेळेत रक्त मिळालं नाही, त्यामुळं तो तडफडून मेला. हे विदारक दृश्य पाहिलं खुशरू पोचा यांनी... त्यासाठी देशभरातल्या 50 हजार रक्तदात्यांची माहिती देणारी एक वेबसाईटच मग त्यांनी सुरू केली. त्यामुळे एका फोनवरही तुम्हाला कुठल्याही भागातल्या रक्तदात्याची माहिती मिळवता येणार आहे.

महापौरांच्या आधी, कुत्र्यांसाठी वाहन खरेदी

Last Updated: Saturday, July 28, 2012, 17:27

चंद्रपूर मनपातील वातावरण सध्या तापलंय. पण ही गरमागरमी राजकीय कारणावरून नाही तर ती आहे कुत्र्यांवरून. शहरात पिसाळलेल्या कुत्र्यांच्या संख्येत भरमसाठ वाढ झालीय. महापौरांनी कुत्रे पकडण्यासाठी नव्या वाहन खरेदीचे आदेश दिले.

ही शाळा की गुरांचा गोठा?

Last Updated: Friday, July 27, 2012, 11:32

उमरखेड नगरपालिकेची तातारशा बाबा उर्दू शाळा... इथं शिकत असलेली मुलं नाही तर बांधलेली गुरं दिसतील... शाळेच्या परिसरातली ही दृश्यं पाहिल्यांनंतर याला गुरांचा गोठा का म्हणू नये, असा प्रश्न पडतो. हे कमी की काय, एकाच खोलीत दीडशे विद्यार्थी बसवले जातात. त्याच खोलीत पोषण आहारही शिजवला जातो. ना शौचालय ना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था... आणि अशाच परिस्थितीत विद्यार्थी इथं शिक्षणाचे धडे गिरवत आहेत.

निकृष्ट बांधकामामुळे चौपदरी रस्ता खचला

Last Updated: Thursday, July 26, 2012, 17:09

औद्योगिक शहर असलेलं चंद्रपूर आंध्रप्रदेशाशी जोडलं जावं यासाठी सुमारे 100 किमी लांबीचा चार पदरी रस्ता बांधला जातोय. पण चंद्रपूरजवळच ताडाळी या गावी मधोमध हा रस्ता खचलाय. त्यामुळे हा महत्वाकांक्षी प्रकल्प सदोष बांधकाम आणि निकृष्ट दर्जामुळे वादाच्या भोव-यात सापडलाय.

मेंदूज्वराचं थैमान; महिन्यात १७ बालकं मृत्यूमुखी

Last Updated: Thursday, July 26, 2012, 08:06

नागपूर विभागातल्या सहा जिल्ह्यांमध्ये मेंदूज्वराचा उद्रेक झाला असून त्यामुळे गेल्या एका महिन्यात सतरा बालकांचा मृत्यू झालाय.

पावसाळ्यात सत्र सर्पदंशाचं...

Last Updated: Wednesday, July 25, 2012, 08:24

आत्महत्यांपेक्षा सर्पदंशामुळे शेतकरी दगावण्याचं प्रमाण अधिक आहे. सर्पदंशामुळे शेतकरी दगावण्याचं प्रमाण जास्त असलं, तरी त्यासाठी कुठलीही शासनस्तरावर दखल घेतली जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वत:च्या रक्षणासाठी काही ठोस पावलं उचलणं आवश्यक आहे.

गोंडवाना विद्यापीठ म्हणतं 'प्रणवदाच राष्ट्रपती'

Last Updated: Thursday, July 19, 2012, 18:22

चंद्रपूर-गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाचा अनोखा प्रताप पुढं आलाय. विद्यापीठाच्या एफवायबीएच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकात १४वे राष्ट्रपती म्हणून चक्क प्रणव मुखर्जींच्या नावाचा उल्लेख करण्यात आलाय.

बनावट औषधांचा खेळ, मनसेचा राडा

Last Updated: Wednesday, July 18, 2012, 21:39

कुठलाही आजार बरा करून देतो, असं सांगून लोकांना लाखो रुपयांचा गंडा घालणा-या औषध एजन्सीचा नागपुरात पर्दाफाश झालाय. एवढंच नाहीतर या बनावट औषधांमुळं काहींवर किडनी खराब होण्याची वेळ आली आहे.

नक्षलवादविरोधात सामान्यांचा प्रतिसाद

Last Updated: Wednesday, July 18, 2012, 18:59

गडचिरोलीत सुरक्षा दलांना नक्षलग्रस्तांशी मुकाबला करण्याबरोबरच नक्षलग्रस्तांच्या भीतीपोटी हिम्मत खचलेल्या ग्रामस्थांचं प्रबोधन करण्याची जबाबदारीही त्यांच्यावर आहे. दुर्गम भागात अनेक ठिकाणी CRPF ने आपले बेस कॅम्प उभारलेत

विदर्भाचंही होऊ शकतं 'इस्त्राईल' – गडकरींचा दावा

Last Updated: Thursday, July 19, 2012, 11:33

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि पूर्ती उद्योग समूहाचे संस्थापक नितीन गडकरी यांनी नुकताच ५० शेतकऱ्यांना घेऊन इस्त्रायलचा कृषी दौरा केला. त्यांनी विदर्भातही इस्त्रायलासारखी शेती होऊ शकेल, असा ठाम विश्वास विशेष चर्चासत्रात व्यक्त केलाय. 'पूर्ती’ उद्योग समूहातर्फे शेतकऱ्यांना विशेष सवलतीत सोलर पंपही दिले जाणार असल्याचं यावेळी त्यांनी जाहीर केलंय.