दर्डांच्या कंपन्यांवर छापे

Last Updated: Wednesday, September 5, 2012, 08:33

कोळसाकांडावरून संसदेचं कामकाज ठप्प असताना सीबीआयनं कोळसा खाण कंपन्यांच्या कार्यालयांवर ठिकठिकाणी छापे टाकले. त्यातच भाजप नेते किरीट सोमय्यांनी ज्यांच्यावर आरोप केलेत त्या काँग्रेस खासदार विजय दर्डांच्या कंपन्यांवर छापे टाकल्यानं खळबळ उडालीय.

महिलेवरील वक्तव्यावरून मंत्री ढोबळेंना मारहाण

Last Updated: Monday, August 27, 2012, 09:15

नागपूर येथील अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाच्या समारोपाला मारहाणीचे गालबोट लागलं आहे. स्त्री अत्याचारासंदर्भात आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल राज्याचे पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांना संमेलनाच्या समारोपाच्या वेळी मारहाण झाली.

...अरेरे राज्यातील लोडशेडिंग आणखी वाढणार

Last Updated: Monday, August 20, 2012, 17:13

दुष्काळाने पिचलेला महाराष्ट्र आता लोडशेडिंगमुळे भरडून निघणार आहे. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील ७ संचापैकी ४ संच बंद पडले आहेत.

पारंपरिक अवैध धंदे पोलिसांच्या उठले जीवावर

Last Updated: Monday, August 20, 2012, 08:34

अवैध धंद्यांविरोधात मोहिम राबवणाऱ्या पोलिसांवरच स्थानिक जमावानं हल्ला केल्याची घटना चंद्रपुरात घडलीय.

कायदा हद्दपार, सुरू `पटियाला पेग बार`

Last Updated: Saturday, August 18, 2012, 08:43

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही नागपुरातल्या म्हाडा कॉलनीत असलेला पटियाला पेग बार राजरोसपणे सुरुच आहे. हा बार बंद करण्याबाबत महिलांनी मोठं आंदोलन केलं होतं. शिवाय बार बंद करण्याचा मुद्दा उच्च न्यायालयातही गेला होता.

सन्मान... बळीराजाच्या सख्याचा!

Last Updated: Friday, August 17, 2012, 17:00

बळीराजाचा जिवाभावाचा मित्र म्हणजे बैल... शेतकऱ्यांचं खऱ्या अर्थानं दैवतच... बैलांचा सन्मान, कौतुक सोहळ्याचा सण म्हणजे पोळा... ग्रामीण भागातल्या मोठ्या उत्साहानं हा सण आज साजरा होतोय.

भाजपच्या जुगारी नगरसेवकाला अटक

Last Updated: Thursday, August 9, 2012, 16:22

नागपूरमध्ये पोलिसांनी एका जुगार अड्ड्यावर धाड टाकून भाजपच्या नगरसेवकाला अटक केल्यानं एकच खळबळ उडाली. पोलिसांच्या गुन्हे शाखेनं वसंतराव नाईक झोपडपट्टीतल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकली होती.

भारतात हरवले पाकिस्तानी नागरिक!

Last Updated: Thursday, August 9, 2012, 13:16

गेल्या १७ वर्षात नागपुरात आलेल्या नऊ हजार पाकिस्तानी नागरिकांपैकी सात हजार पाकिस्तानी गायब आहेत. नागपूर पोलिसांना या पाकिस्तानी नागरिकांचा ठावठिकाणा नाहीये.

अकोल्यात काम करायला अधिकारीच नाहीत!

Last Updated: Thursday, August 9, 2012, 08:18

अकोला जिल्हा परिषद आणि महापालिका या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्था राज्यात आपल्या बेभरवशाच्या कारभारानं प्रसिद्ध आहेत. मात्र आपल्या बेभरवशी कामकाजासाठी प्रसिद्ध असणा-या या दोन्ही संस्थांचा कारभार रामभरोसे चाललाय की काय? असा प्रश्न सध्या निर्माण झालाय.

पदाचा गैरवापर करून वाळू उपसा घोटाळा

Last Updated: Wednesday, August 8, 2012, 08:19

नागपुरात पदाचा गैरवापर करत मोठ्या प्रमाणात वाळू उपसा प्रकरणात घोटाळा झाल्याचे उघडकीस आलंय. या प्रकरणात खनिकर्म विभागाच्या दोन कर्मचा-यांसह तिघांना अटक करण्यात आली आहे.