Last Updated: Thursday, January 9, 2014, 13:33
नवी दिल्लीमध्ये आम आदमी पक्षानं सत्ता स्थापन केल्याबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपचं अभिनंदन करतांना महाराष्ट्रात मात्र मनसेच ‘आप’चा बाप असल्याचं म्हटलंय. दिल्लीमध्ये काम न केल्याचा काँग्रेसला फटका बसला असंही राज ठाकरे म्हणाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या नाशिकच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर आहे. यावेळी पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरेंनी आपली मत मांडली.