राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी जॉगिंग ट्रॅकचा बळी?

Last Updated: Wednesday, August 14, 2013, 18:30

नाशिकमध्ये राज ठाकरेंचं ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या गोदापार्कची लांबी वाढवण्यासाठी जागा अधिग्रहित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचवेळी मनसेचे नगरसेवक एका जॉगिंग ट्रॅकचा बळी देण्याच्या तयारीत आहेत.

खड्ड्यांना मी जबाबदार नाही - राज ठाकरे

Last Updated: Wednesday, August 14, 2013, 14:05

नाशिकच्या खड्ड्यांना मी जबाबदार नाही, तसंच याआधीचे खड्डे आणि रस्त्यांचं खापर माझ्यावर फोडू नका असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलंय.

`रिलायन्स फ्रेश` मॉलमध्ये सडक्या भाज्या!

Last Updated: Tuesday, August 13, 2013, 19:06

मॉल्समधून फळं आणि भाज्या खरेदी करत असाल, तर सावधान. या भाज्या नीट बघून मगच खरेदी करा. एका नामांकित कंपनीच्या दुकानात सडक्या आणि कुजक्या भाज्या सापडल्या आहेत.

कांद्याचे भाव वाढले नाहीत, वाढवले गेलेत!

Last Updated: Tuesday, August 13, 2013, 09:42

नाशिकच्या बाजारपेठांमध्ये कांद्याची कृत्रिम भाव वाढ केली जातेय. गेल्या माहिनाभरापासून कांद्याची आवक स्थिर असताना कांद्याचे भाव तीनशे पटीने वाढले असल्याचा निष्कर्ष केंद्रीय हॉर्टिकल्चर बोर्डाने काढलाय.

नाशिकला मंदीचा फटका, अनेकांवर बेकारीची कुऱ्हाड

Last Updated: Monday, August 12, 2013, 19:31

नाशिकची औद्योगिक वसाहत मंदीच्या फे-यात अडकत चालली आहे. गेल्या वर्षीपेक्षा सरासरी २० ते २५ टक्के उत्पादनात घट झाली आहे. याचा थेट परिणाम कामगारांवर होतोय. हजारो कंत्राटी कामगारांच्या डोक्यावर बेरोजगारीची कु-हाड कोसळण्याची भीती आहे.

का करत होता `तो` भिकाऱ्यांची हत्या?

Last Updated: Saturday, August 10, 2013, 21:19

शिर्डीत सिरीअल किलरला गजाआड केल्यानंतर राहाता न्यायालयान त्याला ४ दिवसांची पोलिस कोठडी सूनावलीय....कोठडीत पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच आरोपीन गुन्हा केल्याची कबूली देताना आपल खरं नाव राहण्याच ठिकाण तसच हत्या करण्यामागच कारणही स्पष्ट केलय...

मनसे नगरसेवकच नाशिकच्या महापौरांच्या विरोधात!

Last Updated: Saturday, August 10, 2013, 20:22

नाशिकला पाणी पुरवठा करणा-या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याने शहरातील पाणी कपात रद्द करण्याची घोषणा महापौरांनी केली. या घोषणेला आठ दिवस उलटून गेलेत. मात्र अद्यापही प्रशासनाने पाणी कपात दूर केली नसल्याने हतबल मनसेच्या नगरसेवकांनीच आता आंदोलनाचा इशारा दिलाय.

पाकड्यांना मुँहतोड जवाब द्या- अण्णा हजारे

Last Updated: Thursday, August 8, 2013, 15:30

पाकिस्तानच्या सैन्याने भारताच्या हद्दीत घुसून केलेल्या हल्ल्याला मुँहतोड जवाब दिला पाहिजे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केलाय.

प्रसिद्ध निसर्गचित्रकार शिवाजी तुपे यांचं निधन

Last Updated: Thursday, August 8, 2013, 09:29

प्रसिद्ध निसर्गचित्रकार शिवाजी तुपे यांचं आज पहाटे २.४५ वाजता निधन झालं. नाशिकच्या सोमवार पेठेतील त्यांच्या निवासस्थानी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून नंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

कांदा आणणार डोळ्यात पाणी

Last Updated: Tuesday, August 6, 2013, 09:46

दुष्काळामुळे उत्पादन कमी आणि मागणी जास्त अशा व्यस्त प्रमाणाच्या कात्रीत सापडलेल्या कांद्याचे भाव वधारलेत. त्यामुळे सर्वसामान्यांना कांदा रडवणार आहे.