राज ठाकरेंचा झंझावाती दौरा उत्तर महाराष्ट्रात

Last Updated: Tuesday, April 2, 2013, 09:34

मराठवाडा-विदर्भानंतर आजपासून राज ठाकरेंचा झंजावाती दौरा उत्तर महाराष्ट्रात सुरू होतोय. आज राज ठाकरे नाशिकमध्ये येत असून चार दिवस खांदेशचा दौराही ते करणार आहेत.

अधिकाऱ्यांना चोपणारे आमदार करणार सूर्यवंशींच्या मारहाणीची चौकशी!

Last Updated: Sunday, March 31, 2013, 18:23

मंत्रालयातील पीएसआय मारहाणप्रकरणी नियुक्त केलेल्या चौकशी समितीत औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरचे आमदार आर एम वाणी यांचाही समावेश आहे. मात्र याच महोदयांनी त्यांच्या मतदारसंघातही अधिकाऱ्यांना मारहाण केल्याची अनेक प्रकरणं आहेत. त्यामुळे असे आमदार काय चौकशी करणार असा सवाल आता केला जात आहे.

महाराजांच्या नावाला विरोध नाही - मनसे

Last Updated: Saturday, March 30, 2013, 17:59

नाशिकमध्ये नव्यानं बांधकाम झालेल्या उड्डाणपूलाला शिवाजी महाराजांचे नाव देण्यासाठी मराठा संघटनांनी आंदोलन केलं. मराठा संघटनांनी आज आंदोलन करुन छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल असा नामकरण फलक झळकावला.

पोलिसाला मारहाण करणारा नगरसेवकाचा मुलगा अटकेत

Last Updated: Friday, March 29, 2013, 23:39

धुळे शहरातील सहाय्यक पोलीस निरीक्षकावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी विशेष पोलिस पथकानं फरार असलेले प्रमुख आरोपी देवा सोनारसह इतर चार जणांना अटक केली आहे.

चिल्लर पार्टी, मद्यधुंद मुला-मुलींचा धुडगूस

Last Updated: Friday, March 29, 2013, 16:42

धार्मिकनगरी म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये दारुपार्टी रंगल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नाशिकजवळच्या तळेगावातल्या ग्रीन रिसॉर्टवर ही पार्टी रंगली.

नाशिक मनपाकडूनच पाण्याची नासाडी!

Last Updated: Thursday, March 28, 2013, 22:08

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शहरात एक वेळ पाणी कपात सुरु आहे. मात्र आज चक्क पे एँड पार्क धुण्यासाठी महापालिकेनंच टँकर पाठवून पाण्याची नासाडी केल्यानं नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

धुळ्यात पोलीस हल्ला, दोघांवर गुन्हा दाखल

Last Updated: Wednesday, March 27, 2013, 16:34

धुळ्यात पोलीस अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय. एपीआय धनंजय पाटील यांच्या तलवारीचे वार करून हल्ला केला. याप्रकरणी हल्लेखोर देवा आणि भूषण सोनार यांच्यावर गुन्हा दाखल झालाय.

आश्रमातील कर्मचाऱ्यांकडून ३४ मुलींचा विनयभंग

Last Updated: Wednesday, March 27, 2013, 14:33

पेठरोडवरील जय आनंद निराश्रीत अनाथ बालगृहातील अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणी बालगृहात कार्यरत असणार्‍या चौघांविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खुनाचा प्रयत्न, मनसे नगरसेवकाला एक वर्षाची शिक्षा

Last Updated: Tuesday, March 26, 2013, 11:59

जळगाव महापालिकेतल्या त्यांच्या पक्षाचे एकमेव नगरसेवक ललित कोल्हे यांना जिल्हा सत्र न्यायालयानं एका खटल्यात वर्षभराच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावलीय.

...तर राज ठाकरे महाराष्ट्र विकून खातील’

Last Updated: Monday, March 25, 2013, 17:42

‘माझ्या हातात सत्ता द्या, महाराष्ट्र सुतासारखा सरळ करीन’ असे वेळोवेळी सांगणाऱ्या मनसे अध्य़क्ष राज ठाकरे यांच्या हातात सत्ता गेली तर मिलच्या जागांसह ते संपूर्ण महाराष्ट्र ते विकून खातील’, अशी खरमरीत टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी रविवारी नाशिक येथे केली.