अहमदनगरमध्ये पाणी पेटले, आमदारांचे आत्मदहन?

Last Updated: Tuesday, November 27, 2012, 15:37

अहमदनगरमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय. पाण्याच्या प्रश्नावर भाजप आमदार राम शिंदे यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करुन राम शिंदे यांना ताब्यात घेतलं यावेळी पोलीस आणि शिंदे यांच्यात जोरदार धक्काबुक्की झाली.पाणीप्रश्न चांगलाच पेटलाय. शेतक-यांनी मुळा प्रकल्पाच्या दोन्ही कालव्यांचे दरवाजे उघडून पाणी सोडलयं.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी हेलिकॉप्टर

Last Updated: Tuesday, November 27, 2012, 07:44

ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये आता हेलिकॉप्टरचा वापर सुरु झालाय. ऐकून आर्श्चय वाटवं असेल... पण हे खरं आहे. नाशिक जिल्ह्यातल्या मुंढे गाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत हेलिकॉप्टरचा वापर झालाय. दरम्यान, ही सफर घडवून आणणाऱे चंद्रकांत गतीर हे बिनविरोध सरपंच झालेत.

एक फोन फिरवला... अन् झाली नगराध्यक्षांची निवड

Last Updated: Thursday, November 22, 2012, 20:29

येवला तालुका म्हणजे भुजबळांचा बालेकिल्ला, तालुक्यातील सत्ताकेंद्र भुजबळांच्या ताब्यात आहे. म्हणूनच भुजबळ म्हणतील तोच उमेदवार पदावर असतो. येवल्यामध्ये नुकत्याच नवीन नगराध्यक्षांची निवड झालीय आणि तीही फोनवरून.

पैठणीच्या शिरपेचात मानाचा तुरा

Last Updated: Sunday, November 11, 2012, 19:04

येवल्याच्या पैठणीवर आणखी एक मानाचा तुरा खोवला गेलाय. विणकर शांतीलाल भांडगे यांना पैठणीतील संशोधनासाठी राष्ट्रपतींच्या हस्ते संत कबीर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. विशेष म्हणजे भांडगे परिवाराला आत्तापर्यंत पैठणीच्या संशोधनासाठी पाच राष्ट्रीय पुरस्कार मिळालेत.

पक्षातल्या तरूणांना डावलू नका, नाहीतर- अजितदादा

Last Updated: Saturday, November 10, 2012, 21:18

पक्षातल्या तरुणांना डावलू नका, असा सल्ला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलाय. जळगावमध्ये उत्तर महाराष्ट्रातल्या पक्ष कार्यकर्त्यांचं मार्गदर्शन शिबिर शुक्रवारी झालं.

भुजबळांनीच केलाय ओबीसींवर अन्याय- शेलार

Last Updated: Wednesday, November 7, 2012, 22:44

सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी दोन दिवसांपूर्वी ओबीसी समाजावर अन्याय होत असल्याची टीका केली होती. भुजबळांच्या या वक्तव्याचा त्यांचे एकेकाळाचे खंदे समर्थक राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष गजानन शेलारांनी चांगलाच समाचार घेतलाय.

राज ठाकरे नाशिककरांना दिलेलं आश्वासन विसरले?

Last Updated: Tuesday, November 6, 2012, 21:06

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या नाशिकच्या दौ-यावर आहेत. नाशिककरांनी सत्ता दिल्यास दर महिन्याला नाशिकला भेट देऊन कामकाजाची पाहणी करेनं अस आश्वासनं देणा-या राज ठाकरेंची गेल्या 9 महिन्यांतील ही केवळ दुसरी भेट आहे.

राज ठाकरेंविरूद्ध जामीनपात्र वॉरंट

Last Updated: Monday, November 5, 2012, 11:58

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरूद्ध जळगाव जिल्हा सत्र न्यायालयानं दुस-यांदा जामीनपात्र वॉरंट बजावण्यात आला आहे.

मी `ओबीसी` असल्यामुळे...- छगन भुजबळ

Last Updated: Sunday, November 4, 2012, 22:32

मी ओबीसी असल्यामुळे हेतूपुरस्सर मला टार्गेट करण्यात येत असल्याची टीका सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळांनी केली. गेल्या ६ महिन्यांपासून त्यांच्यावर सातत्यानं आरोप होत असल्यामुळे त्यांनी आपली बाजू मांडण्यासाठी हे विधान केलं.

पोलीस पत्नीच्या गूढ मृत्यूनंतर पतीची आत्महत्या

Last Updated: Saturday, November 3, 2012, 13:50

पत्नीच्या संशयास्पद मृत्यूनंतर 24 तासात पतीनेही आत्महत्या केल्याची घटना घडलीये. नाशिकच्या श्रमिकनगर परिसरात प्रशांत पाटील या 32 वर्षींय व्यक्तीनं गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवलीये.