झी २४ तासचा दणका; ‘कारभाऱ्यां’ना चपराक!

Last Updated: Tuesday, October 23, 2012, 16:54

गोदावरी नदीवर बांधण्यात आलेल्या 11 बंधा-यांच्या कामात पैशाचा मोठा गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारीवरून राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव, अर्थ खात्याच्या प्रधान सचिवासह 26 अधिकाऱ्यांवर न्यायालयाच्या आदेशानंतर सोमवारी रात्री उशीरा गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांसाठी शासनाचा वैरण विकास कार्यक्रम

Last Updated: Tuesday, October 23, 2012, 09:13

दुष्काळी तालुक्यामध्ये चारा टंचाईच्या समस्येला तोंड देण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाने वैरण विकास कार्यक्रमावर जोर दिला आहे. धुळे जिल्ह्यातील सहा हजार शेतकऱ्यांना मका, ज्वारी अशा वैविध्यपूर्ण वैरण पिकांचं बियाणं मोफत देण्यात येत आहे. या उपक्रमामुळे चाऱ्याची समस्या बऱ्याच अंशी सुटण्यास मदत होणार आहे.

`झेंडूची फुले` शेतकऱ्यांच्या साथीला

Last Updated: Monday, October 22, 2012, 09:19

पावसाअभावी फुलांचं उत्पादन घटल्यानं आवक कमी झाली पर्यायी यंदा फुलांना चांगला दर मिळतोय. दसरा आणि दिवाळीतही शेतक-यांना चांगले दर मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून दुष्काळात शेतक-यांना झेंडुनं चांगली साथ दिलीय. जळगांव जिल्ह्यातील शेतक-यांना झेंडुला ३० ते ४० रुपये दर मिळाल्याने इथला शेतक-यांचे प्रयत्न यशस्वी झालेत.

शिळ्या अन्नापासून बायोगॅस निर्मिती

Last Updated: Sunday, October 21, 2012, 11:57

एलपीजी गॅसच्या गगनाला भिडणाऱ्या किंमती आणि सबसिडी गॅसच्या संख्येवर आणलेली मर्यादा लक्षात घेऊन खानावळ चालवणाऱ्या जळगावच्या अनिल भोळेंनी यावर रामबाण उपाय शोधून काढलाय.

नाशिक जिल्ह्यात काळाबाजार रोखण्यास टाळाटाळ!

Last Updated: Wednesday, October 17, 2012, 18:30

रेशन वस्तूंचा काळाबाजार रोखण्यासाठी नाशिकमध्ये जीपीएस यंत्रणा सक्षमपणे राबवण्यात येत होती. त्याचा योग्य परिणामही जिल्ह्यात दिसत होता. काळाबाजार रोखणारी ही यंत्रणा सर्व जिल्ह्यात राबवण्य़ासाठी मात्र टाळाटाळ करण्यात येतेय.

नाशिकध्ये आंदोलकांचंच अतिक्रमण

Last Updated: Tuesday, October 16, 2012, 18:46

मुलभूत सुविधा पुरवण्याचा विषय असो किंवा जकात हटवण्याचा... प्रत्येकवेळी आंदोलनाचे इशारे देणाऱ्या उद्योजकांनीच अतिक्रमण केल्याचं समोर आलंय. सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीतल्या ३३५ हून जास्त छोट्या मोठ्या उद्योगांनी अनधिकृतपणे वाढीव बांधकाम केलंय. मात्र यावर प्रशासनाचा अंकुश दिसत नाहीय.

नाशिकमध्ये संपांचा सुकाळ

Last Updated: Monday, October 15, 2012, 22:02

मेडिकल दुकानांनी संप मागे घेतला असला, तरी येत्या काही दिवसांत सर्वसामान्य़ांना अनेक संप आणि बंदला सामोरं जावं लागणार अशी चिन्हं आहेत. पेट्रोलपंपधारकांबरोबरच एसटी आणि पोस्टातल्या कर्मचा-य़ांनीही संपाचा इशारा दिलाय.

नाशिक जिल्हा रुग्णालयच रुग्णशय्येवर!

Last Updated: Monday, October 15, 2012, 19:08

अत्यावश्यक ओषधे आणि तांत्रिक सुविधा नसल्याने नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात रुग्णाची हेळसांड होते आहे. गेल्या आठवड्यात व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणाने मृत्यू झाल्याने त्याचा संताप रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर निघाला आहे.त्यामुळे नाशिक जिल्हा रुग्णालयच सध्या रुग्णशय्येवर असल्याची चर्चा रंगली आहे.

हप्तेखोर नायब तहसीलदार, वाळू उपसा जोरदार

Last Updated: Monday, October 15, 2012, 18:25

राज्यभर वाळू उपसा बंद असताना जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर तालुक्यातील नद्यांमधून उघडपणे वाळू उपसा सुरू आहे. विशेष म्हणजे नायब तहसीलदाराच्या हप्तेखोरीमुळं अमळनेर तहसील कार्यालयाचं पितळ उघडं पडलंय.

दोनशे मुलांचा स्वयंपाक दहा मिनिटांत!

Last Updated: Wednesday, October 10, 2012, 19:08

नाशिक शहरातील अनाथ मुलींसाठी कार्य करणाऱ्या आधाराश्रम या संस्थेनं सोलर एनर्जीचा वापर करत इंधनबचतीचा आदर्श घालून दिला आहे. तब्बल दोनशे अनाथ मुलींचा स्वयंपाक अवघ्या दहा मिनिटात होतोय. याच स्वयंपाकासाठी महिन्याकाठी तीस सिलेंडरचा खर्च पँराबोलिक सोलर सिस्टममुळे वाचत आहे.