सव्वा कोटी लूटणारा फरार दरोडेखोर अटकेत

Last Updated: Sunday, October 7, 2012, 21:29

सिडकोतील सव्वा कोटीच्या दरोडा प्रकरणातील फरार संशयित आरोपी सोनल ऊर्फ लाल्या रोहिदास भडांगेला अटक करण्यात आलीये. नाशिक रोड परिसरातील मोरे मळ्यात आलेला असताना पोलिसांनी त्याला अटक केली.

जळगाव `एमआयडीसी`त वायुगळती; ३ जण अत्यवस्थ

Last Updated: Sunday, October 7, 2012, 14:10

जळगाव एमआयडीसीमध्ये वायूगळती झालीय. जवळजवळ ६० कामगारांना यामुळे चक्कर आणि उलट्यांचा त्रास जाणवतोय तर तीन कामगार अस्वस्थ आहेत.

सुरेश जैन यांचा जामीन अर्ज फेटाळला

Last Updated: Saturday, October 6, 2012, 22:43

जळगाव पालिकेच्या 29 कोटी 59 लाखांच्या घरकुल घोटाळ्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले आमदार सुरेश जैन यांचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयानं फेटाळला.

विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर `पाणी`...

Last Updated: Friday, October 5, 2012, 18:29

सर्वोच्च न्यायालयानं देशभरातील शाळांमध्ये मुलभूत सोयी येत्या सहा महिन्यांत पुरवण्याचे आदेश दिलेत. नाशिक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचे विद्यार्थी सध्या डोक्यावरून पाणी वाहून शाळेत आणतात... पाण्याच्या टाक्या आहेत पण, रिकाम्या...

नाशिककरांवर अजूनही पाणीकपातीचं संकट

Last Updated: Wednesday, October 3, 2012, 19:08

राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली तरी नाशिककरांची पाण्याची समस्या कायम आहे. नाशिकच्या बहुतेक भागांत अतिशय कमी दाबानं आणि अनियमित पाणी पुरवठा होतोय. त्यामुळे नाशिककर आता रस्त्यावर उतरु लागलेत. प्रशासन मात्र अजूनही आश्वासनापलीकडे काहीच देत नाही.

महागाईत चक्क सिलिंडरचीही चोरी!

Last Updated: Wednesday, October 3, 2012, 09:53

महागाईनं इतका कळस गाठलाय की आता चक्क गॅस सिलिंडर्सची चोरी होऊ लागलीय.

पोलीसाच्याच घरात सापडली 15 लाखाची दारू....

Last Updated: Monday, October 1, 2012, 19:30

धुळे शहरा पोलीस वसाहतीत राहणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या घरातून लाखो रुपयांचा विदेशी मद्यसाठा पोलिसांनी जप्त केला आहे.

पांढरेंपाठोपाठ प्रकल्पग्रस्ताचाही दणाणला आवाज...

Last Updated: Monday, October 1, 2012, 12:40

जळगाव जिल्ह्यातील निम्न प्रकल्प बांधकामाच्या दर्जाबाबत प्रकल्पग्रस्तांनी शंका उपस्थित केलीय. हे बांधकाम निकृष्ट असून त्याच्या चौकशीची मागणी प्रकल्पग्रस्तांनी केलीय. विशेष म्हणजे याच प्रकल्पाच्या गुणवत्तेविषयी सरकारला पत्र पाठवलंय.

नाशिक जिल्ह्यात इंधन भेसळीची `चावी`

Last Updated: Saturday, September 29, 2012, 08:17

नाशिक जिल्ह्यात नांदगाव पोलिसांनी इंधनात भेसळीसाठी बनावट चावी तयार करणाऱ्या सराफासह दोघांना ताब्यात घेतलंय. बनावट चावीने टँकरचे लॉक उघडून होणारी भेसळ आणि इंधन चोरी अजूनही थांबलेली नसल्याचं यातून स्पष्ट होतंय.

पांढरेंनी आणले खात्यातले घोटाळे चव्हाट्यावर

Last Updated: Monday, September 24, 2012, 14:05

जलसंपदा विभागातील मुख्य अभियंता विजय पांढरेंनी त्यांच्या खात्याताली घोटाळे चव्हाट्यावर मांडल्यानं अभियंत्यांचा रोष ओढवून घेतलाय. मागील वीस वर्षात 60 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा पांढरेंनी केलाय. राज्यातील 90 टक्के उपसा सिंचन योजना बंद असल्याचं त्यांनी तांत्रिकदृष्ट्या स्पष्ट केलंय. वादग्रस्त तेरा विषयांवर श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी त्यानीच केल्याने चांगलीच खळबळ उडाली